जिंदगी जिंदाबाद
    No Result
    View All Result
    No Result
    View All Result
    जिंदगी जिंदाबाद
    No Result
    View All Result

    वाह… वाह रामजी, व्हॉटसऍपवरून ‘दिलसे दिलकी सगाई’!

    admin by admin
    September 18, 2016
    in Uncategorized
    2
    वाह… वाह रामजी, व्हॉटसऍपवरून ‘दिलसे दिलकी सगाई’!


    google8cce13a29fce06be whatsapp-love_1473865955‘लग्न
    म्हणजे केवळ अडीच अक्षरे नव्हेत, सात पावलांनी जोडले जाणारे जन्मभराचे ऋणानुबंध, आयुष्यातला एक अनोखा मनस्वी प्रसंग, काही क्षण हृद्याच्या कप्प्यात साठविण्यासाठीच, तर काही क्षण डोळ्यांच्या पापण्यांवर ओथंबण्यासाठीच, आयुष्यभर जतन करण्यासाठीच आनंदी सोहळे साजरे करतांना… ‘साथ आणि आशिर्वाद हवेत तुम्हा सज्जनांचे’ असे एक कवी म्हणतो. खरंच आहे, लग्न हे फक्त अक्षर नव्हे तर प्रेमाच्या सावलीत आयुष्यभर सोबत राहण्याचा एक आगळावेगळा सोहळा.नात्याचं हे रेशमबंध जुळवतांना पालक मोठी काळजी घेतात.असं म्हणतात की, या रेशीमगाठी स्वर्गात बांधल्या जात असतात.आपण फक्त निमित्ताने एकत्र जुळतो.या अनोळखी प्रेमाच्या रेशीमगाठी या भूतलावर व्हॉटसऍपवर जुळविण्यात येत असल्याचे आपल्याला सांगितल्यास आश्‍चर्य वाटेल.पण हे खर आहे. ‘जन्मबंध’ असे या राज्यभर सुरु असलेल्या व्हॉटसऍप ग्रुपचे नाव आहे. १४ महिन्याच्या कालावधीत या ग्रुपवर १५ लग्ने तर ८ साखरपुडे उरकून झालेत हे विशेष !
    व्हॉटसऍपवर ‘जन्मबंध’ हा ग्रुप अखिल भारतीय सोमवंशी सहस्रार्जुन क्षत्रिय समाजातील उपवर तरूण-तरूणींसाठी १४ महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आला होता. मुळात आपल्या पाल्याचे लग्न जुळवितांना त्याच्या योग्य साथीदाराची निवड करण्यामध्येच अनेक पालकांचा बहुतांश वेळ जातो.त्यासाठी बर्‍याचदा अनेकांना भटकंती देखील करावी लागते.परंतु आता यासाठी आवश्यक असणारा समन्वय आणि संवाद मोबाईलच्या रूपाने सहज शक्य झाला आहे.सोशल मिडीयाच्या या उपयोगामुळे आता शेकडो मैल लांब असलेली माणसं देखील जवळ आली आहेत.कुठल्याही समुदायाने आयुष्यभराच्या रेशीमगाठी जुळविण्यासाठी तंत्रज्ञानाचा असा सकारात्मक उपयोग केल्याचा कदाचित हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असावा.

                                                    अशी जुळतात बंधने 

    अखिल भारतीय सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाजातील काही बांधवांनी ‘जन्मबंध’ नावाने टप्प्या टप्प्याने ११ व्हॉटसऍप ग्रुप सुरू केले.यातील दोन ग्रुप महिलांसाठी तर अन्य पुरूषांचे आहेत. या ग्रुपवर आपल्या पाल्याच्या वधु किंवा वराच्या शोधात असणारी वडिलधारी मंडळी फोटोसह उपवराचे संपूर्ण परिचयपत्र टाकत असतात. आपल्याला अपेक्षित असा मुलगा किंवा मुलीचे परिचयपत्र समोर आल्यानंतर दोन्ही परिवारातील संवाद थेट सुरू होतो. या संवादाच्या प्रक्रियेमध्ये ऍडमीन हे मध्यस्थीची भूमिका पार पाडतात. सर्व गोष्टी मनाप्रमाणे जुळून आल्यास लग्न ठरते. ग्रुप सुरू झाल्याच्या १४ महिन्याच्या कालावधीत आतापर्यंत १५ लग्ने लागली आहेत तर ८ जणांचे साखरपुडे झाले आहेत.

                                      ग्रुपवर देशभरातील समाजबांधव

    ११ व्हॉटसऍप ग्रुपच्या माध्यमातून देशभरातील साधारण ११०० समाजबांधव एकत्र आले आहेत. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेशसह अन्य राज्यातील समाजबांधव सदस्य आहेत. या ग्रुपचे ऍडमीन गणेशसा बिचवे (धरणगाव मो.९४०३५४९२४५), अनिलसा दाणेज (धरणगाव ९३२६६१४७७७), प्रकाशसा कट्यारे (नामपुर ८९८३७००३४०), कपिलसा दाणेज (सिन्नर ८३०८३८९११८), पंकजसा दाणेज (पारोळा ९८९०८६१६१८), अमोलसा पहेलवान (येवला ९८८१५८९९४०), परेशसा चौटे (पारोळा ९४२३४९२१२१), धीरज पेटकर (संगमनेर८९२८२५८६५०) हे आहेत.

    लवकरच वधु-वर मेळावा

    अखिल भारतीय सोमवंशी सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजातील तरूण व काही समंजस समाजबांधवांनी व्हॉटसऍप ग्रुपच्या माध्यमातून सुरू केलेल्या अभिनव प्रयोगाला यश मिळाल्यानंतर आता लवकरच खान्देशात वधु-वर परिचय मेळावा घेण्यात येणार आहे.त्या दृष्टीने समाजातील मान्यवरांचे प्रयत्न सुरु आहेत.मागील १४ महिन्याच्या कालावधीत अनपेक्षित व उत्सफूर्त असा प्रतिसाद मिळाला. कुठलीही धावपळ न करता घरबसल्या अनेकांचे विवाह जुळून आलेत.

    IMG-20151231-WA0010 IMG-20151231-WA0009

    Tags: jalgaonmarreagewhatsappजळगावदिलसे दिलकी सगाईलग्नव्हॉटसऍपवरून लग्न
    Previous Post

    आमीर…तू या देशामुळेच आमीर खान आहेस रे !

    Next Post

    इसीसचा जळगाव जिल्ह्यातही शिरकाव

    Next Post
    इसीसचा जळगाव जिल्ह्यातही शिरकाव

    इसीसचा जळगाव जिल्ह्यातही शिरकाव

    Comments 2

    1. Praveen Bansi says:
      10 years ago

      Can other caste participate in JANMA BANDH, who do not believe in caste?

      Reply
    2. pranjal patil says:
      10 years ago

      Very good

      Reply

    Leave a Reply to Praveen Bansi Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    No Result
    View All Result

    Recent Posts

    • सोहराबुद्दीन चकमक : रक्तरंजित धुकं !
    • गुजरात फाईल्स : राजकारण्यांचा बेगडी बुरखा फाडणारं पुस्तक !
    • हरेन पांड्या खून प्रकरण : मोदींवर आरोप ते सुप्रीम कोर्टाचा निकाल…!
    • सोहराबुद्दीन बनावट चकमक : अनेक अनुत्तरीत प्रश्नांची मालिका !
    •  ‘अत्त दिप भवं’ ! 

    Recent Comments

    • मनोहर चौधरी on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • Harshal Talele on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • अमोल पाटील on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • Vasudeo Borole on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • पाटील चंद्रशेखर on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !

    Archives

    • November 2019
    • September 2019
    • July 2019
    • June 2019
    • May 2019
    • April 2019
    • February 2019
    • January 2019
    • December 2018
    • November 2018
    • October 2018
    • September 2018
    • August 2018
    • July 2018
    • June 2018
    • May 2018
    • April 2018
    • March 2018
    • February 2018
    • January 2018
    • December 2017
    • November 2017
    • October 2017
    • September 2017
    • April 2017
    • March 2017
    • January 2017
    • December 2016
    • October 2016
    • September 2016
    • August 2016
    • July 2016
    • June 2016
    • May 2016
    • April 2016
    • March 2016
    • February 2016
    • January 2016
    • December 2015
    • November 2015
    • October 2015
    • August 2015
    • July 2015
    • June 2015
    • May 2015
    • April 2015
    • March 2015
    • February 2015
    • January 2015

      © 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

      No Result
      View All Result

        © 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.