google8cce13a29fce06be ‘लग्न म्हणजे केवळ अडीच अक्षरे नव्हेत, सात पावलांनी जोडले जाणारे जन्मभराचे ऋणानुबंध, आयुष्यातला एक अनोखा मनस्वी प्रसंग, काही क्षण हृद्याच्या कप्प्यात साठविण्यासाठीच, तर काही क्षण डोळ्यांच्या पापण्यांवर ओथंबण्यासाठीच, आयुष्यभर जतन करण्यासाठीच आनंदी सोहळे साजरे करतांना… ‘साथ आणि आशिर्वाद हवेत तुम्हा सज्जनांचे’ असे एक कवी म्हणतो. खरंच आहे, लग्न हे फक्त अक्षर नव्हे तर प्रेमाच्या सावलीत आयुष्यभर सोबत राहण्याचा एक आगळावेगळा सोहळा.नात्याचं हे रेशमबंध जुळवतांना पालक मोठी काळजी घेतात.असं म्हणतात की, या रेशीमगाठी स्वर्गात बांधल्या जात असतात.आपण फक्त निमित्ताने एकत्र जुळतो.या अनोळखी प्रेमाच्या रेशीमगाठी या भूतलावर व्हॉटसऍपवर जुळविण्यात येत असल्याचे आपल्याला सांगितल्यास आश्चर्य वाटेल.पण हे खर आहे. ‘जन्मबंध’ असे या राज्यभर सुरु असलेल्या व्हॉटसऍप ग्रुपचे नाव आहे. १४ महिन्याच्या कालावधीत या ग्रुपवर १५ लग्ने तर ८ साखरपुडे उरकून झालेत हे विशेष !
व्हॉटसऍपवर ‘जन्मबंध’ हा ग्रुप अखिल भारतीय सोमवंशी सहस्रार्जुन क्षत्रिय समाजातील उपवर तरूण-तरूणींसाठी १४ महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आला होता. मुळात आपल्या पाल्याचे लग्न जुळवितांना त्याच्या योग्य साथीदाराची निवड करण्यामध्येच अनेक पालकांचा बहुतांश वेळ जातो.त्यासाठी बर्याचदा अनेकांना भटकंती देखील करावी लागते.परंतु आता यासाठी आवश्यक असणारा समन्वय आणि संवाद मोबाईलच्या रूपाने सहज शक्य झाला आहे.सोशल मिडीयाच्या या उपयोगामुळे आता शेकडो मैल लांब असलेली माणसं देखील जवळ आली आहेत.कुठल्याही समुदायाने आयुष्यभराच्या रेशीमगाठी जुळविण्यासाठी तंत्रज्ञानाचा असा सकारात्मक उपयोग केल्याचा कदाचित हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असावा.
अशी जुळतात बंधने
अखिल भारतीय सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाजातील काही बांधवांनी ‘जन्मबंध’ नावाने टप्प्या टप्प्याने ११ व्हॉटसऍप ग्रुप सुरू केले.यातील दोन ग्रुप महिलांसाठी तर अन्य पुरूषांचे आहेत. या ग्रुपवर आपल्या पाल्याच्या वधु किंवा वराच्या शोधात असणारी वडिलधारी मंडळी फोटोसह उपवराचे संपूर्ण परिचयपत्र टाकत असतात. आपल्याला अपेक्षित असा मुलगा किंवा मुलीचे परिचयपत्र समोर आल्यानंतर दोन्ही परिवारातील संवाद थेट सुरू होतो. या संवादाच्या प्रक्रियेमध्ये ऍडमीन हे मध्यस्थीची भूमिका पार पाडतात. सर्व गोष्टी मनाप्रमाणे जुळून आल्यास लग्न ठरते. ग्रुप सुरू झाल्याच्या १४ महिन्याच्या कालावधीत आतापर्यंत १५ लग्ने लागली आहेत तर ८ जणांचे साखरपुडे झाले आहेत.
ग्रुपवर देशभरातील समाजबांधव
११ व्हॉटसऍप ग्रुपच्या माध्यमातून देशभरातील साधारण ११०० समाजबांधव एकत्र आले आहेत. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेशसह अन्य राज्यातील समाजबांधव सदस्य आहेत. या ग्रुपचे ऍडमीन गणेशसा बिचवे (धरणगाव मो.९४०३५४९२४५), अनिलसा दाणेज (धरणगाव ९३२६६१४७७७), प्रकाशसा कट्यारे (नामपुर ८९८३७००३४०), कपिलसा दाणेज (सिन्नर ८३०८३८९११८), पंकजसा दाणेज (पारोळा ९८९०८६१६१८), अमोलसा पहेलवान (येवला ९८८१५८९९४०), परेशसा चौटे (पारोळा ९४२३४९२१२१), धीरज पेटकर (संगमनेर८९२८२५८६५०) हे आहेत.
लवकरच वधु-वर मेळावा
अखिल भारतीय सोमवंशी सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजातील तरूण व काही समंजस समाजबांधवांनी व्हॉटसऍप ग्रुपच्या माध्यमातून सुरू केलेल्या अभिनव प्रयोगाला यश मिळाल्यानंतर आता लवकरच खान्देशात वधु-वर परिचय मेळावा घेण्यात येणार आहे.त्या दृष्टीने समाजातील मान्यवरांचे प्रयत्न सुरु आहेत.मागील १४ महिन्याच्या कालावधीत अनपेक्षित व उत्सफूर्त असा प्रतिसाद मिळाला. कुठलीही धावपळ न करता घरबसल्या अनेकांचे विवाह जुळून आलेत.
Can other caste participate in JANMA BANDH, who do not believe in caste?
Very good