जिंदगी जिंदाबाद
    No Result
    View All Result
    No Result
    View All Result
    जिंदगी जिंदाबाद
    No Result
    View All Result

    ‘त्या’ साहित्यिकांचे पुरोगामित्व बेगडी !

    admin by admin
    September 18, 2016
    in Uncategorized
    2
    ‘त्या’ साहित्यिकांचे पुरोगामित्व बेगडी !

    dadari
    स
    र्वात आधी उत्तर प्रदेशातील दादरीच्या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे, हे आधी स्पष्ट करून पुढे लिहितो.दादरी हत्याकांडानंतर देशासह राज्यातील अनेक साहित्यिकामध्ये शासनाला पुरस्कार परत करण्यासाठी जणू चढाओढच सुरु आहे.यातील बहुतांश साहित्यिकांनी कॉंग्रेसच्या काळात आणि त्यांचे सरकार असलेल्या राज्यात पुरस्कार स्वीकारले आहेत.त्यामुळे पुरस्कार कॉंग्रेसकडून घ्यायचे आणि परत भाजपला करायचे, हे गणित काही लक्षात येत नाही बुआ आपल्याला…!
    यावरून काहीजणांना मी नरेंद्र मोदी किवा भाजपा सरकारची बाजू घेत असल्याचा निष्कर्ष काढतील, पण जे सत्य आहे ते बोलणार.मला या साहित्यिकांचे पुरोगामित्व बेगडी वाटते कारण, जेव्हा काश्मिरी पंडितांचे हत्याकांड झाले ,गोध्रा हत्याकांड,गुजरात दंगल,खैरलांजी हत्याकांड,अशा अनेक माणुसकीला आणि असहिष्णूतेला काळीमा फासणार्‍या घटना घडल्या त्यावेळी एकाही साहित्यिकाने पुरस्कार का परत केला नाही ?आता पुरस्कार परत करत असाल तर खुशाल करा,पण पुरस्काराची रक्कम व्याजासकट परत करा म्हणाव ! सर्व भंपकपणा आहे राव…!
    मला तर नेमकी या लोकांची पुरोगामित्वाची व्याख्याच कळत नाहीय.विशिष्ट समुदायावर अन्याय झाल्यानंतरच प्रतिक्रिया व्यक्त करणे हेच यांचे पुरोगामित्व आहे का ? आणि असेल तर हे बेगडी पुरोगामित्व आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे.या देशात हिंदू-मुस्लिम असो की,अन्य धर्मीय ;त्यांच्यावर होणारा अन्याय हादेखील दादरी एवढाच क्लेषदायी आहे.त्यामुळे आपल्या सोयीच्या वेळी फक्त समोर यायचे हा डुप्लिकेटपणा सहज लक्षात येण्याजोगा आहे.कोणत्याही समाजातील दुर्बल घटकावर होणार्‍या अन्यायानंतर एवढ्याच कडवट पद्धतीने या साहित्यिकांनी आपला निषेध आतापर्यंत नोंदविला असता तर कदाचित आज त्यांच्याबद्दल सर्वच धर्मियांच्या मनात आदर राहिला असता.प्रत्येकावर होणार्‍या अन्यायानंतर ज्याला पिडा होते ना तोच खरा माणूस ! पण फक्त विशिष्ट लोकांवर अन्याय झाला की ओरड करायची म्हणजे निव्वळ बोगसपणा आहे.स्वतःचे पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड असच या घटनेचे वर्णन करता येईल.आपण जर मागील काही घटना पाहिल्या तर या साहित्यिकांच्या लक्षात काही साध्या गोष्टी कशा आल्या नाहीत याचे खर म्हणजे नवल वाटते.दादरीची घटना युपीत अखिलेश यादव यांचे सरकार असतांना घडली.कलबुर्गिंचा खून कॉंग्रेसचे सरकार असलेल्या कर्नाटक राज्यात झाला.दाभोळकरांचा खुनाच्यावेळी महाराष्ट्रात कॉंग्रेसचे सरकार होते.विशेष म्हणजे यातील आरोपी अद्याप देखील फरार आहेत.तर दुसरीकडे १६ फेब्रुवारी १५ रोजी पानसरेंच्या हत्येनंतर आरोपींना अटक करण्यात भाजप सरकारला यश आले.फडणवीस सरकार हिंदुत्ववादी असल्याचा आरोप विरोधक करतात,मग त्यांच्या विचार सरणीशी साधर्म्य असणाऱ्या संघटनेच्या एका कार्यकर्त्याला भाजपा सरकार अटक करून स्वतःची बदनामी करवून घेत वाद कशाला ओढून घेईल.हा यात एक गोष्ट आहे,जे भाजपा नेते दादरी हत्याकांडाचे समर्थन स्वरुपात बोलत आहे.त्यांचा देखील निषेध झाला पाहिजे.कुठल्याही परिस्थितीत अथवा तर्कावर हत्येचे समर्थन मुळीच करताच येवू शकत नाही,मानवी जीवन अशा पद्धतीने संपविणे हे पूर्णपणे पशु विचारसरणीचे लक्षण आहे हे या नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे.दाभोलकरांच्या हत्येनंतर कॉंग्रेसने मारेकरी हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याचे सूचकरित्या अनेकदा सांगितले होते.मात्र कधीही हिंदू संघटनावर बंदीची भाषा केली नाही.दुसरीकडे संशयित रुद्र पाटील सापडल्या बरोबर,देवेंद्र फडणवीस यांनी पुरावे मिळाल्यास सनातनवर बंदी घालू असे जाहीर केले.यावरून हिंदुत्व विचारसरणी कॉंग्रेसची की,भाजपची हे स्पष्ट होते.बर घटना कॉंग्रेस किवा समाजवादीच्या राज्यात आणि काळात घडल्या आणि निषेध भाजपाचा हा काय प्रकार आहे.साहित्य आणि पोलीस यांचा दूरदूर पर्यंत काय संबंध येतो,पुरस्कार परत केल्याने पोलीस यंत्रणेला काय फरक पडणार आहे.बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर देशात दंगल उसळली अनेक कुटुंब उघडली पडली,आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची बदनामी झाली.तो वाद कुणामुळे वाढला.कॉंग्रेसचे सरकार असतांना कुणीही मागणी केलेली नसतांना अचानक राम मंदिरचा दरवाजा कोणी उघडला हे देशाला माहित आहे.त्यावेळी एवढे हिंदू-मुस्लीम लोक मेले तरी एकाही साहित्यिकाला पुरस्कार का परत करावासा वाटला नाही ? मराठवाडा दंगलीत दलितांच्या उघड्यावर हत्या झाल्या त्यांच्या आया-बहिणींची इभ्रत लुटण्यात आली त्यावेळी एकही साहित्यिक का समोर आला नाही ? याची उत्तरे या कथित विचारवंत,देशभक्त,पुरोगामी लोकांना द्यावीच लागतील…आणि हो मी पण पुरोगामी विचारसरणीचाच आहे.मात्र असा बेगडीपणा आपल्याला जमणार नाही !

    Tags: dadariदादरी हत्याकांडपुरस्कार
    Previous Post

    रामचंद पाकिस्तानी !

    Next Post

    अंकल मै घरसे भागके आयी हूँ !

    Next Post
    अंकल मै घरसे भागके आयी हूँ !

    अंकल मै घरसे भागके आयी हूँ !

    Comments 2

    1. Balaji Chavhan says:
      10 years ago

      best dada

      Reply
    2. Prabhulal lohar says:
      10 years ago

      एकदम बरोबर भाऊ

      Reply

    Leave a Reply to Prabhulal lohar Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    No Result
    View All Result

    Recent Posts

    • सोहराबुद्दीन चकमक : रक्तरंजित धुकं !
    • गुजरात फाईल्स : राजकारण्यांचा बेगडी बुरखा फाडणारं पुस्तक !
    • हरेन पांड्या खून प्रकरण : मोदींवर आरोप ते सुप्रीम कोर्टाचा निकाल…!
    • सोहराबुद्दीन बनावट चकमक : अनेक अनुत्तरीत प्रश्नांची मालिका !
    •  ‘अत्त दिप भवं’ ! 

    Recent Comments

    • मनोहर चौधरी on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • Harshal Talele on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • अमोल पाटील on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • Vasudeo Borole on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • पाटील चंद्रशेखर on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !

    Archives

    • November 2019
    • September 2019
    • July 2019
    • June 2019
    • May 2019
    • April 2019
    • February 2019
    • January 2019
    • December 2018
    • November 2018
    • October 2018
    • September 2018
    • August 2018
    • July 2018
    • June 2018
    • May 2018
    • April 2018
    • March 2018
    • February 2018
    • January 2018
    • December 2017
    • November 2017
    • October 2017
    • September 2017
    • April 2017
    • March 2017
    • January 2017
    • December 2016
    • October 2016
    • September 2016
    • August 2016
    • July 2016
    • June 2016
    • May 2016
    • April 2016
    • March 2016
    • February 2016
    • January 2016
    • December 2015
    • November 2015
    • October 2015
    • August 2015
    • July 2015
    • June 2015
    • May 2015
    • April 2015
    • March 2015
    • February 2015
    • January 2015

      © 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

      No Result
      View All Result

        © 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.