सर्वात आधी उत्तर प्रदेशातील दादरीच्या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे, हे आधी स्पष्ट करून पुढे लिहितो.दादरी हत्याकांडानंतर देशासह राज्यातील अनेक साहित्यिकामध्ये शासनाला पुरस्कार परत करण्यासाठी जणू चढाओढच सुरु आहे.यातील बहुतांश साहित्यिकांनी कॉंग्रेसच्या काळात आणि त्यांचे सरकार असलेल्या राज्यात पुरस्कार स्वीकारले आहेत.त्यामुळे पुरस्कार कॉंग्रेसकडून घ्यायचे आणि परत भाजपला करायचे, हे गणित काही लक्षात येत नाही बुआ आपल्याला…!
यावरून काहीजणांना मी नरेंद्र मोदी किवा भाजपा सरकारची बाजू घेत असल्याचा निष्कर्ष काढतील, पण जे सत्य आहे ते बोलणार.मला या साहित्यिकांचे पुरोगामित्व बेगडी वाटते कारण, जेव्हा काश्मिरी पंडितांचे हत्याकांड झाले ,गोध्रा हत्याकांड,गुजरात दंगल,खैरलांजी हत्याकांड,अशा अनेक माणुसकीला आणि असहिष्णूतेला काळीमा फासणार्या घटना घडल्या त्यावेळी एकाही साहित्यिकाने पुरस्कार का परत केला नाही ?आता पुरस्कार परत करत असाल तर खुशाल करा,पण पुरस्काराची रक्कम व्याजासकट परत करा म्हणाव ! सर्व भंपकपणा आहे राव…!
मला तर नेमकी या लोकांची पुरोगामित्वाची व्याख्याच कळत नाहीय.विशिष्ट समुदायावर अन्याय झाल्यानंतरच प्रतिक्रिया व्यक्त करणे हेच यांचे पुरोगामित्व आहे का ? आणि असेल तर हे बेगडी पुरोगामित्व आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे.या देशात हिंदू-मुस्लिम असो की,अन्य धर्मीय ;त्यांच्यावर होणारा अन्याय हादेखील दादरी एवढाच क्लेषदायी आहे.त्यामुळे आपल्या सोयीच्या वेळी फक्त समोर यायचे हा डुप्लिकेटपणा सहज लक्षात येण्याजोगा आहे.कोणत्याही समाजातील दुर्बल घटकावर होणार्या अन्यायानंतर एवढ्याच कडवट पद्धतीने या साहित्यिकांनी आपला निषेध आतापर्यंत नोंदविला असता तर कदाचित आज त्यांच्याबद्दल सर्वच धर्मियांच्या मनात आदर राहिला असता.प्रत्येकावर होणार्या अन्यायानंतर ज्याला पिडा होते ना तोच खरा माणूस ! पण फक्त विशिष्ट लोकांवर अन्याय झाला की ओरड करायची म्हणजे निव्वळ बोगसपणा आहे.स्वतःचे पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड असच या घटनेचे वर्णन करता येईल.आपण जर मागील काही घटना पाहिल्या तर या साहित्यिकांच्या लक्षात काही साध्या गोष्टी कशा आल्या नाहीत याचे खर म्हणजे नवल वाटते.दादरीची घटना युपीत अखिलेश यादव यांचे सरकार असतांना घडली.कलबुर्गिंचा खून कॉंग्रेसचे सरकार असलेल्या कर्नाटक राज्यात झाला.दाभोळकरांचा खुनाच्यावेळी महाराष्ट्रात कॉंग्रेसचे सरकार होते.विशेष म्हणजे यातील आरोपी अद्याप देखील फरार आहेत.तर दुसरीकडे १६ फेब्रुवारी १५ रोजी पानसरेंच्या हत्येनंतर आरोपींना अटक करण्यात भाजप सरकारला यश आले.फडणवीस सरकार हिंदुत्ववादी असल्याचा आरोप विरोधक करतात,मग त्यांच्या विचार सरणीशी साधर्म्य असणाऱ्या संघटनेच्या एका कार्यकर्त्याला भाजपा सरकार अटक करून स्वतःची बदनामी करवून घेत वाद कशाला ओढून घेईल.हा यात एक गोष्ट आहे,जे भाजपा नेते दादरी हत्याकांडाचे समर्थन स्वरुपात बोलत आहे.त्यांचा देखील निषेध झाला पाहिजे.कुठल्याही परिस्थितीत अथवा तर्कावर हत्येचे समर्थन मुळीच करताच येवू शकत नाही,मानवी जीवन अशा पद्धतीने संपविणे हे पूर्णपणे पशु विचारसरणीचे लक्षण आहे हे या नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे.दाभोलकरांच्या हत्येनंतर कॉंग्रेसने मारेकरी हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याचे सूचकरित्या अनेकदा सांगितले होते.मात्र कधीही हिंदू संघटनावर बंदीची भाषा केली नाही.दुसरीकडे संशयित रुद्र पाटील सापडल्या बरोबर,देवेंद्र फडणवीस यांनी पुरावे मिळाल्यास सनातनवर बंदी घालू असे जाहीर केले.यावरून हिंदुत्व विचारसरणी कॉंग्रेसची की,भाजपची हे स्पष्ट होते.बर घटना कॉंग्रेस किवा समाजवादीच्या राज्यात आणि काळात घडल्या आणि निषेध भाजपाचा हा काय प्रकार आहे.साहित्य आणि पोलीस यांचा दूरदूर पर्यंत काय संबंध येतो,पुरस्कार परत केल्याने पोलीस यंत्रणेला काय फरक पडणार आहे.बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर देशात दंगल उसळली अनेक कुटुंब उघडली पडली,आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची बदनामी झाली.तो वाद कुणामुळे वाढला.कॉंग्रेसचे सरकार असतांना कुणीही मागणी केलेली नसतांना अचानक राम मंदिरचा दरवाजा कोणी उघडला हे देशाला माहित आहे.त्यावेळी एवढे हिंदू-मुस्लीम लोक मेले तरी एकाही साहित्यिकाला पुरस्कार का परत करावासा वाटला नाही ? मराठवाडा दंगलीत दलितांच्या उघड्यावर हत्या झाल्या त्यांच्या आया-बहिणींची इभ्रत लुटण्यात आली त्यावेळी एकही साहित्यिक का समोर आला नाही ? याची उत्तरे या कथित विचारवंत,देशभक्त,पुरोगामी लोकांना द्यावीच लागतील…आणि हो मी पण पुरोगामी विचारसरणीचाच आहे.मात्र असा बेगडीपणा आपल्याला जमणार नाही !
best dada
एकदम बरोबर भाऊ