दलितांना गावातून चालताना गळ्यात मडके आणि पाठीला झाडू लावून चालविले जात होते,बळजबरीने मैला वाहण्यास भाग पाडले जात होते,त्याकाळी सवर्णाने दलित मुला-मुलीसोबत केलेला विवाह आदर्श विवाह असणे किवा ठरविणे कालानुरूप योग्यच होते.परंतु काळ आता बराच पुढे सरकला आहे.२१ व्या शतकात आता असे आंतरजातीय विवाह कौतुकाचे राहिले नाहीत.कारण आताचे विवाह समाजहिताला डोळ्यासमोर ठेऊन करण्यात येत नाहीत.कदाचित माझ्या या मतावर अनेकांना आक्षेप असेल.
समाजमन आता बरेच बदलेले आहे.परंतु मिडिया अजूनही काळाच्या चौकटीतून बाहेर पडून लिहित नाही,मिडीयाच काय ? लेखक,सवर्ण-दलित विचारवंत,नेते आणि कथित समाजसुधारक देखील दलित-सवर्ण हा विवाह फक्त एकाच नजरेतून पाहतात.या सर्वांच्या मते म्हणजे,एखाद्या सर्वणाने दलितासोबत केलेला प्रत्येक विवाह आदर्श असाच असतो,आणि त्याचे सर्व श्रेय दोघांना न देता फक्त सवर्णालाच दिले जाते.अमुकाने केला दलित मुलीशी विवाह….तमुकाने केला दलित मुलासोबत आदर्श विवाह असेच त्या विवाहाचे वर्णन किवा लिखाण होते.मुळात सामाजिक आदर्शासाठी ठरवून केलेले आंतरजातीय विवाह हे आदर्श असू शकतात.परंतु आजच्या बदललेल्या सामाजिक जीवनात प्रेम किंवा व्यावसायिक,वैयक्तिक संबधामुळे झालेले आतंरजातीय विवाह आदर्श कसे असू शकतात.यामुळेच की,काय मला या आजच्या कथित समाजसुधारकांच्या नजरा या मनुवादी सवर्णच दिसतात.
मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या गायकीची जादू पसरवणारे गायक आदर्श शिंदे लग्नाच्या बोहल्यावर चढले. आदर्श यांनी आपली प्रेयसी नेहा लेलेसोबत मुंबईत बौध्द पध्दतीने थाटात लग्न केलं.या लग्नात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली.सध्या या लग्नावरून सोशल मिडियामध्ये चर्चा सुरु आहे.अर्थात आदर्शने आपल्या प्रेयसीसोबत लग्न केले आहे.त्यामुळे त्यात विशेष असे काही नाही,त्याची ही प्रेयसी ब्राम्हण नसती; दलित समाजातली असती,तरी त्याने तिच्या सोबतच विवाह केला असता.त्यामुळे या विवाहाचे चुकीच्या पद्धतीने उदात्तीकरण होणे योग्य नाही.
हा विवाह एक सेलिब्रेटीचा होता म्हणून त्याच्या लग्नाची चर्चा होणारच.मिडिया ती दाखविणार सुद्धा,इथ पर्यंत सर्व ठीक आहे.परंतु त्याने बौद्ध पद्धतीने ब्राम्हण मुलीशी लग्न केले यावर भर देऊन दाखविण्यात येणार्या बातम्या तसेच सोशल मीडियात होणारी फडतूस चर्चा व्यथित करते. इति लग्न पुराणम संप्पनम् ! आदर्श शिंदे आणि नेहा लेलेच्या विवाहाचे काही खास क्षण या मथळ्याखाली लग्नातील फोटो एका आँनलाईन वेबसाईटवर दाखविण्यात आले.अर्थात या मथळ्यातील चावटपणा दलित समाजाला खटकणाराच आहे.अरे काय मोठे काम झाले लग्न केले तर…अनेक असे आंतरजातीय विवाह होतात.त्यात नवीन आणि विशेष काय ? परंतु मीडियातील मनुवादी आणि कथित दलित विचारवंत यांना या सर्वसामान्य विवाहामध्ये देखील वधू-वराची जातच दिसते.फक्त दलितांना हिणवणाराच जातीवादी नसतो,असे नाही तर, अशा विवाहावरून अन्य सवर्ण जातीतील लोकांना दुखाविणारे देखील माझ्या मते जातीवादीच आहेत.
जळगाव जिल्यातील धरणगावात देखील काही दिवसांपूर्वी गुजराथी मुलाने दलित मुलीशी आदर्श विवाह केल्याच्या बातम्या देण्यात आल्या.अर्थात तो गुजराथी मुलाने केलेला आदर्श विवाह नव्हताच ! तो एक आदर्श आंतरजातीय विवाह होता.परंतु गुजराथी मुलाने दलित मुलीशी केला आदर्श विवाह अशा बातम्या देण्यात आल्या.अर्थात अशा बातम्या म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीचेच उदाहरण आहे. या विवाहाचे देखील चुकीच्या पद्धतीने उदात्तीकरण करण्यात आले.वास्तविक दोन्ही परिवारातील जेष्ठांनी ठरवून हा विवाह केला होता.भारतीय संस्कृती प्रमाणे मुलगी पाहण्यापासून हळदीपर्यंत सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या.मग या विवाहात जाती-पातीचा संबंध आला कुठे ? कौतुक करायचेच होते तर वधू-वर यांच्या कुटुंबातील जेष्ठांच्या विचारांचे करावयास हवे होते. कारण त्यांनी समाजासमोर एका आदर्श आंतरजातीय विवाहाचे उदाहरण निर्माण केले होते.परंतु नेहमीच्या बुरसटलेल्या मानसिकतेतून अशा बातम्या छापून येतात.असो,परंतु आता मिडिया असो की,कथित विचारवंत यांनी अशा विवाहांकडे एका वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज आहे.कारण विचार बदलविल्याशिवाय ‘ती’ जुनी सवर्ण मनूवादी नजर बदलणार नाहीे !
Nice,
Samaj manatil satyata ashich aahe.
dada he khrch aahe ya vichyarvtana midiyanech bhag padle pahije vichyar badlayla karan midiyach doshi aahe ya karnana chukichya batmya thaknaryacha mi nishedh karto