राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचे मंत्रीपद घालविण्यामागे कथीत हॅकर मनिष भंगाळेला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीयाच्या वतीने फायनान्स झाल्याचा दावा मुंबईतील पत्रकार केतन तिरोडकर यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. तिरोडकरांनी या संदर्भात एक ऑडीओ क्लिपदेखील सादर केली आहे. या प्रकरणी त्यांची मुलाखत घेण्याचा मोह मला आवरता आला नाही.या विशेष मुलाखतीत तिरोडकर यांनी अनेक गौप्यस्फोट करत त्यांच्याकडे या षडयंत्रासंदर्भात ढिगभर पुरावे असल्याचा दावा केला आहे.
प्रश्ननोत्तराच्या स्वरूपात तिरोडकरांची विशेष मुलाखत
प्रश्न : वाचकांना आपली ओळख काय सांगाल?
तिरोडकर : पत्रकार म्हणून समाजासाठी काही करता येत नाही म्हणून माहिती अधिकाराकडे वळलो. मॅनेजमेंटमुळे पत्रकाराला लिखाणाचे स्वातंत्र्य कमी असते. जाहिरातीच्या जोरावर बातम्या दाबल्या जाण्याचा अनुभव आला. माहिती अधिकार आणि जनहित याचिकेमुळे जनतेपर्यंत काहीतरी संदेश पोहचविता येतो. त्यामुळे चार लोक संबंधित विषयाविरोधात उभे राहतात. त्यामुळे मग पत्रकारांना बातम्या छापाव्याच लागतात.
प्रश्न : आतापर्यंत आपण कोणत्या विषयांवर आणि किती जनहित याचिका दाखल केल्या आहेत?
तिरोडकर : साधारण आतापर्यंत वेगवेगळ्या विषयांवर 15-20 जनहित याचिका दाखल केल्या आहेत. मुख्यमंत्री कोट्यातील घरे वाटली गेली होती, अनेक लोकांना घरे डबल देण्यात आली. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशान्वये एक समिती नेमण्यात आली. आता या प्रकरणी देण्यात आलेली घरे (फ्लॅट) परत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा खटला सीबीआयकडे माझ्या जनहित याचिकेमुळेच वर्ग झाला. समृध्द जीवन प्रॉडक्ट घोटाळा प्रकरण अशा अनेक प्रकरणांमध्ये याचिका दाखल केल्या आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे मराठा आरक्षणाला स्थगिती ज्यांच्यामुळे मिळाली त्यात प्रामुख्याने माझे नाव घेतले जाते.
प्रश्न : मनिष भंगाळेंसोबत आपला परिचय कसा झाला?
तिरोडकर : मनिष भंगाळेचे या प्रकरणात ज्यावेळी माध्यमांमधून नाव समोर आले त्यावेळी मी त्याच्याशी संपर्क साधला, कारण सरकारविरूध्द लढणारी माणसं मला आवडतात. संपर्क झाल्यानंतर तो मला भेटला आणि सांगितले की, तो एकटा पडला आहे. त्याला कोणी विचारत नाही, सरकार दखल घेत नाही, क्राईम ब्रँच जबाब घेते परंतु गुन्हा दाखल करत नाही. त्यावर मी त्याला सांगितले की, माझ्या घरी ये, या संदर्भात कोर्टात याचिका दाखल करण्यासाठी मोफत मदत करतो, माझे कामच ते आहे. त्यानंतर तो माझ्या घरी आला मी त्याला एक लॅपटॉप भेट दिला. माझ्याकडेही फार पैसे नसतात, परंतु पोरगा एकटा लढतो आहे सरकारी यंत्रणेशी म्हणून त्याला मदत केली. वास्तविक मनिष खडसेंविरूध्द कि अन्य कोणाविरूध्द लढतो आहे, यात मला काही एक रस नव्हता. त्यानंतर त्याचे वडिल आले, ते पण माझ्या घरी राहायला लागले. काही दिवसांपूर्वीच ते सेवानिवृत्त झालेले होते. मनिषच्या एकंदरीत वर्तणुकीवरून त्याच्यावर थोडा संशय आला. एके दिवशी अचानक तो गायब झाला, घरातून निघून गेला.
प्रश्न : मनिष मुंबईला आपल्या घरी राहायचा?
तिरोडकर : दादरला माझ्या मित्राचा फ्लॅट खाली होता, तिथे मी त्याची राहण्याची व्यवस्था करून दिली होती.
प्रश्न : मनिष साधारण किती दिवस आपल्याकडे राहिला?
तिरोडकर : साधारण दोन ते अडीच महिने.
प्रश्न : मनिषवरची विश्वासर्हता कमी होण्यासारखे काय घडले होते?
तिरोडकर : मनिषने दाऊद सोबत संभाषणासंदर्भात सादर केलेली काही बीले खरे किंवा खोटीही असतील. दाऊदचे बरेच नेटवर्क मिळू शकते. याच्यामध्ये काहीतरी गेम आहे, कारण गुजरात वरून काही माणसं यायची ते सांगायचे आम्ही याचे फायनान्सर आहोत. एखादा व्यवसाय असेल तर त्यातील गुंतवणूक आपण समजू शकतो. त्यामुळे मी त्यांना बोललो, तुम्ही फायनान्सर म्हणजे नेमके काय? तुम्हाला यातून काही रिटर्न (नफा) आहे का गुंतवणूकवर? कारण कसं, फायनान्स या शब्दाला विशिष्ट असा अर्थ आहे ना! त्यानंतर मी मनिष ज्या कॉम्प्युटरवर काम करायचा त्यातून डाटा काढला आणि त्यातून मला समजले की दीपक महाजन सीएमओ ऑफीसला भेट निश्चित करून द्यायला मदत करायचा. क्राईम ब्रँचवाले त्याला फोन देखील सीएमओ ऑफीसच्या माध्यमातून करायचे.
प्रश्न : क्राईम ब्रँचला मनिषसोबत संपर्क साधायचा असल्यास सीएमओ ऑफीसकडून फोन करावा लागायचा का?
तिरोडकर : हा…सीएमओ ऑफीसमधून मेसेज यायचा, गाडी यायची आणि मग मनिष क्राईम ब्रँचच्या ऑफीसला जायचा. या सर्व प्रकारात दीपक मध्यस्थी असायचा.
प्रश्न : म्हणजे त्यावेळी सीएमओ ऑफीसमधून मनिष भंगाळे संदर्भातील सर्व सूत्र हालत होती आणि सर्व समन्वय घडवून आणण्याचे काम दीपक महाजन करीत होता का?
तिरोडकर : हो…बरोबर!
प्रश्न : आपण सादर केलेली क्लिप ही मनिष आणि त्याच्या पत्नीच्या संवादाची आहे का?
तिरोडकर : ही क्लिप मनिष भंगाळे आणि नयना भंगाळे यांच्या संवादाचीच आहे. दीड-दोन महिन्यानंतर त्यांची फारकत झाली.
प्रश्न : म्हणजे हे दोघं जण आपल्याकडेच दादरला (मुंबई) राहायचे का?
तिरोडकर : नाही. त्याची पत्नी काही दिवस गुजरात आणि काही दिवस जळगावमध्ये राहत होती.
प्रश्न : या संवादाची क्लिप आपल्याला कशी मिळाली?
तिरोडकर : ही क्लिप मला कोणी आणून दिली नाही, माझ्याच कॉम्प्युटरला सर्व सेव्ह होतं. मनिषला वाईट सवय आहे तो सर्वांचे फोन रेकॉर्ड करीत असतो. तो माझे डेस्कटॉप वापरत असल्यामुळे तो सर्व डाटा माझ्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करून ठेवला होता. ही सर्व रेकॉर्डींग त्याने स्वत:च करून ठेवली आहे.
प्रश्न : आणखी काही राजकीय किंवा फायनान्स करणार्या मंडळीव्यतिरीक्त इतर लोकांचे रेकॉर्डींग देखील आपल्याला आढळल्या आहेत का?
तिरोडकर : बरंच काही-काही आढळलं आहे. सर्व या क्षणाला उघड करणे योग्य नाही. उद्या चौकशी लागल्यावर त्यांच्यासमोर द्यायलाही काहीतरी पाहिजे ना!
प्रश्न : म्हणजे आपल्याकडे या प्रकरणात गौप्यस्फोट करण्यासारखं बरेच काही आहे का?
तिरोडकर : हो…हो. बरेच काही काही आहे.
प्रश्न : आपली या क्षणाला मागणी काय आहे?
तिरोडकर : दाऊद इब्राहीमसंबंधी बिलं खोटी असतील तर मनिषला आत टाका आणि ती बिलं खरी असतील तर खडसेंचा नंबर त्यात कुणी घुसवला आणि कुणाच्या सांगण्यावरून ते शोधले पाहिजे. तसेच खडसेंच्या व्यतिरीक्त क्रिकेट बेटींग, दुबईचे कॉन्टॅक्ट त्यावर चौकशी झाली पाहिजे.
प्रश्न : क्रिकेट बेटींग व्यतिरिक्त आणखी काय काय आहे?
तिरोडकर : हे बघा…खडसेंना राजीनामा द्या असे सांगायला जळगावला आलेले बीजेपी मधील व्ही.सतिश नावाचे वरीष्ठ व्यक्ती यांचादेखील नंबर त्या लिस्टमध्ये होता. त्यांचा राजीनामा का घेतला गेला नाही? फक्त खडसेंनाच टार्गेट का केले गेले? एवढ्या मोठ्या बिलामध्ये खडसे टार्गेट नव्हतेच. खडसेंचा नंबर आला समजा तर आला. भारत सरकारने पाकिस्तानकडून दाऊदच्या पत्त्याची चौकशी का केली नाही? त्यामुळे या प्रकरणात फक्त खडसेच का? हा सर्व व्यक्तीगत स्वार्थाचा खेळ आहे हा! सीएम साहेबांची मुद्दाम कुणी दिशाभूल केली? हे शोधले पाहिजे.
प्रश्न : एकंदरीत खडसेंविरूध्द पध्दतशीरपणे रचण्यात आलेलं हे षडयंत्र होतं का?
तिरोडकर : षडयंत्र तर शंभर टक्के होतं. कारण जसा त्यांनी राजीनामा दिला तसं लगेचच मुख्यमंत्र्यांनी खडसेंनी केलेल्या सर्व बदल्या रद्द केल्या. मनिष भंगाळेने दाऊदचे रेकॉर्ड काढल्यानंतर लगेचच अंजली दमानिया यांनी जळगाव एमआयडीसीतील रेकॉर्ड काढला. त्याचवेळी पुण्याच्या माणसाने खडसेंविरूध्द चौकशीची मागणी केली.
प्रश्न : मनिषच्या रेकॉर्डींग्सचे गंभीर स्वरूपातील पुरावे आपल्या जवळ असतांना या पुराव्याच्या माध्यमातून मनिषविरुध्द किंवा हे षडयंत्र रचणार्याविरूध्द कारवाई करण्यासाठी प्रशासनातील कुणी व्यक्ती तुमच्याकडे आले नाही का?
तिरोडकर : प्रशासन नालायक आहे. प्रशासन कुणाच्या तरी सांगण्यावरून चालते आहे लोकांसाठी चालत नाहीय ना! त्यामुळेच हा सगळा प्रॉब्लेम होत आहे.
प्रश्न : आता आपली नेमकी भूमिका काय राहील?
तिरोडकर : माझा कुणावरही विश्वास उरलेला नाही. लोकांपर्यंत सर्व प्रकरण पोहोचल्यानंतर आपोआप सरकारला त्रास होतो आणि सरकार मग व्यवस्थित चौकशी करते. उच्च न्यायालयाच्या माध्यमातून मला हे सर्व पुरावे लोकांपर्यंत पोहचवायचे आहे.
प्रश्न : यासंदर्भात आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत का?
तिरोडकर : हो…या प्रकरणाची केंद्रीय चौकशी झाली पाहिजे. बाकी कसं उच्च न्यायालयाचा आदेश असला की, सरकार काही करू शकत नाही.
प्रश्न : या संदर्भातील आपल्या जवळ असलेले पुरावे कोर्टात सादर करणार का?
तिरोडकर : हो…हो. निश्चित!
प्रश्न : मनिषने या प्रकरणात सुपारी घेतली आहे हे आपल्याला कसे कळाले?
तिरोडकर : एखाद्याला सीएमओ ऑफीसमधून क्राईम बॅ्रंचला जा सांगणे, जाबजबाब नोंदवून घेतल्यानंतर देखील गुन्हा दाखल न करता खडसेंचा राजीनामा मागणं या गोष्टी कायद्याला धरून नाहीत. वास्तविक बघता मुख्यमंत्र्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. त्यामुळे स्वाभाविक संशय येतो. खडसेंच्या राजीनाम्यानंतर सर्वच जण चिडीचूप झाले. बाकीचे नंबर्स, बाकीचे पुरावे शोधले पाहिजे. खडसे म्हणाले होते, मी बोललो तर देश हादरेल अशा कोणत्या गोष्टी त्यांना माहिती आहे, हे देखील समोर आले पाहिजे.
प्रश्न : आपण दिलेल्या ऑडीओ क्लिपमधील उल्लेख झालेला दीपक महाजन हा तोच दीपक महाजन आहे हे कशावरून?
तिरोडकर : थोडसं काही तरी काम पोलिसांना राहू द्या. सर्वच कामे आपण केली तर कसे चालेल. पत्रकारांच्या तपासावरून चार्जशीट दाखल नाही होत ना!
प्रश्न : मानहानीचा दावा दाखल करण्यासंदर्भात दीपक महाजनने आपल्याशी काही संपर्क साधला का?
तिरोडकर : नाही. त्याने माझ्याविरूध्द केस दाखल करावी. माझे आव्हान आहे.
प्रश्न : आपल्या कॉम्प्युटरमधील मनिषच्या रेकॉर्डींग्समध्ये आणखी काही गौप्यस्फोट किंवा खळबळजनक क्लिप आहेत का?
तिरोडकर : भयंकर आहेत. काही-काही आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचा घाणेरडा चेहरा त्या टेप्स्मध्ये दिसतो. अहो, मला एक सांगा कृपाशंकर सिंह आणि मनिष भंगाळेला मुख्यमंत्र्यांना सोबत घेवून बसण्याची काय गरज? त्यात काय चर्चा झाली? बरं. बसलात तर बसलात, पुढे काय, सर्व चिडीचूप.
प्रश्न : मनिष कृपाशंकर सिंहांकडे गेला होता का?
तिरोडकर : नाही, त्या मोबाईल नंबरच्या लिस्टमध्ये काँग्रेसच्या व इतर कुणाकुणाची नावे आहेत हे विचारण्यासाठी कृपाशंकर मनिषकडे आले होते.
(केतन तिरोडकर यांची मुलाखत )
(मनीष भंगाळेची कथित ऑडीओ क्लिपमधील ज्या संभाषणावरून संशय निर्माण होतो तेवढाच भाग याठिकाणी देत आहे)
Konse paper me interview chapnar aahet. Khadse n var kharach aanyay zhale aahe.
सत्य परेशान है…पराजित नहीं ….
Satya kabhi parajit nahi hota hai.
जनतेसाठी काम करायच सोडून स्वतःसाठीच राज्य करायला लागले की फक्त स्वार्थच दिसतो. हे राज्य लोकांचे आहे.ही असली षडयंत्र करण्यापेक्षा जनहिताची काम करणारे राज्यकर्ते हवेत.
अगदी बरोबर
Khadse sahebnchi nirnay shkymata atynt prabhavi hoti tyanchya nirnya mude Anek bhrsth lok jail madhe janyachi sakhyta hoti tyach bhrusth rajkarni (krupashanker sinh) yanni shadyantra murkh Manish Bhangle lo mohra banvun kele hye Ata sarve jante samor Shri Ketan Terodaker yanchya dhadsala nagrik Salam karit ahe
एकनाथराव खडसे याच्यासारख्यांची ही अवस्था तर सामान्य जनतेचे काय? हाच प्रश्न गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्रातील जनतेला पडतोय, फोडा आणि राज्य करा हाच भाजपचा चेहेरा महाराष्ट्रातील जनता बघतेय, श्री केतन तिरोडकर यांच्या माध्यमातून कटकारस्थान रचणारे काळे चेहरे जनते समोर येतील ही अपेक्षा.
हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे षडयंत्र आहे, गिरीष महाजन, देवेंद्र फडनविस आणि ह्या दोघांना पाठिंबा देणारे कार्यकर्ते ह्यात सामील आहेत.
Natha bhau yanna mukhya mantri pad Dyala have Te davedar aahe
आपण दिलेल्या माहिती वरून राजकारण कोणत्या स्तरावर जात आहे याची कल्पना येते, जळगाव मधून लोकसभेचे 2 वेळा तिकीट कापून 3 र्याच व्यक्तीला मिळाले, ही पण खेळी असू शकते,(उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भा,मा,अधिकार न्याय सु,परिषद नई दिल्ली) सर चुकीचे जिथेही असेल आम्ही आपल्या सोबत आहोत।