गुजरातमध्ये हार्दिक पटेलचा कथित व्हिडीओ समोर आल्यानंतर, तेथील राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे.हा धुराळा खाली बसत नाही,तोच २४ तासाच्या आत हार्दिक पटेलची दुसरी कथित सेक्स सीडी आज समोर आल्यानंतर मात्र देशाच्या राजकारणात भूकंपच आला आहे.हार्दिकचे व्हिडीओ खरे की खोटे हे येणारा काळच सांगेल परंतु याआधीही देशातील अनेक राजकारणी,उद्योजक,सिनेकलाकारसारख्या सेलिब्रेटींचे कथित सेक्स स्कॅन्डलच्या सीडी व्हायरल झालेल्या आहेत.विशेष म्हणजे यातील अनेक व्हिडीओ चौकशीअंती बनावट असल्याचे सिद्ध झालेले आहे.या निमित्ताने अशा प्रकारच्या व्हीडीओंची सत्यता अभ्यासणे महत्वाचे ठरते.तंत्रज्ञानाच्या खोलात शिरल्यावर आपल्याला ‘मॉर्फ्ड’ची अर्थात व्हिडीओ किंवा फोटोमध्ये तंतोतंत बदल करणाऱ्या तंत्रज्ञानाची बदनाम दुनिया समोर येते.
आपल्या देशात मॉर्फ्ड व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल केल्याची अनेक उदाहरण आहेत.त्यात भोंदू बाबा,राजकारणींसह सर्व स्तरातील लोकांच्या सेक्स स्कॅन्डलचा समावेश आहे.यातील काही खऱ्या तर बऱ्याच बनावट होत्या.सर्वाधिक बनावट सीडी सिनेकलावतांच्या होत्या.त्यात जया प्रदा,स्मृती इराणी,प्रीती झिंटा,मोना सिंग(जस्सी जैसी कोई नही फेम), शक्ती कपूर,इरफान खान,अमिषा पटेल,करीना कपूर-शाहीद कपूर तर अगदी शाहरुख खानच्या मुलांच्या सीडीचा देखील समावेश आहे,अगदी हजारो नावे सांगता येतील. या प्रकरणांमध्ये बहुतांश कलाकारांनी पोलिसात जाणे टाळले होते.परंतु जस्सी जैसी कोई नही फेम मोना सिंगने मात्र पोलिसात तक्रार केल्यानंतर काही आरोपींना अटक करण्यात आली होती.मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती देतांना सांगितले होते की,डिजिटल तज्ञांनुसार एमएमएसमध्ये अभिनेत्रीचा चेहरा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जुळवण्यात आला होता.सायबर लॅबमधील सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञांनी असा निष्कर्ष काढला की व्हिडिओ पद्धतशीरपणे बनविण्यात आल्याचे देखील सिद्ध केले होते.मोना सिंग हा व्हीडीओ बघितल्या नंतर आपला देखील काळासाठी खरा असल्याचा विश्वास बसतो.एवढा सफाईदारपणे त्याला बनविण्यात आले आहे. उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत जया प्रदा निवडणुकीला उभ्या असतांना देखील असाच प्रकार घडला होता.एवढेच काय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मॉर्फ्ड पद्धतीने फोटो बनविणाऱ्या बंगळूरुमधील एका व्यक्तीला नुकतीच अटक करण्यात आली होती.याच गुजरातमध्ये भाजपचे संजय जोशी यांचे नाव देखील अशाच सीडी प्रकारात बदनाम झाले होते.कालांतराने त्यांनी आपले निर्दोषत्व सिद्ध केले होते.
आजच्या घडीला युट्युबवर मॉर्फ्ड टेक्नालॉजी शिकवणारे हजारो व्हिडीओ आहेत.एवढेच काय तर आपल्या मोबाईलमधील ‘प्ले स्टोअर’वर यासबंधी किती तरी अॅप आहेत.यात सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या व्यक्तीचे वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो आणि व्हिडीओ फुटेज उपलब्ध असतात,त्याची बनावट व्हिडीओ किंवा फोटो बनविणे सर्वात सोपे असते.बनावट चित्रीकरण करणे आजच्या घडीला सोपे काम आहे.रोबोट,बाहुबली किंवा अगदी ९०च्या दशकात दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर अर्धवट राहिलेल्या रंग या सिनेमात देखील अशाच पद्धतीची कमाल आपण बघितलेली आहे.कापसाचा धबधबा किंवा कागदी शिवलिंग खांद्यावर घेणारा बाहुबली आपल्याला खरा वाटतो.ऐश्वर्या राय व प्रशांत अभिनय असलेला १९९८ मधील जीन्स या सिनेमाने तर भारतीय लोकांना त्यावेळी तोंडात बोट घालायला लावली होती.एवढेच काय आपण आपल्या मोबाईलमध्ये फक्त कुठल्याची मोठ्या सेलीब्रेटीचे नावापुढे फक्त ‘न्यूड फेक’ टाकून गुगल सर्च करा.त्याचे नग्न छायाचित्र आपल्या समोर येईल.अनेक पाॅर्न वेबसाईटवर बॉलीवूड,हॉलीवूडमधील बहुतांश अभिनेत्रींचे बनावट पद्धतीचे व्हिडीओ उपलब्ध आहेत.त्यात शक्यतो त्याचे डमी (सारखे दिसणारे) कलाकार असतात किंवा एखाद-दोन चित्रपटातील दृश्य जोडून बनविलेला व्हीडीओ असतो.
हार्दिक पटेलच्या कथित सीडीची तंत्रशुद्धता
हार्दिक पटेलची सीडी मनाली येथील एका हॉटेलमधील सांगितली जात आहे.हॉटेलमधील एकंदरीत दृशावरून ती शुटींग रात्रीचे असल्याचे जाणवते.सीडी खरी असल्याचे गृहीत धरल्यास निश्चित काही प्रश्न निर्माण होतात.सीडीतील शुटींग व ऑडीओ क्वालिटी (गुणवत्ता) इतकी डल (खराब) का? एवढी मोठी सुवर्णसंधी स्टिंग करणाऱ्याला पुन्हा मिळणार नव्हती.त्यामुळे त्याच्याकडून सर्वच हायटेक (तंत्रशुद्धत) गोष्टी अपेक्षित होत्या.कारण आजच्या काळात साध्या मोबाईलमध्ये देखील हायडेफीनेशनचे कॅमेरे असतात.मग स्टिंग करणाऱ्याने बाबाआदमच्या जमान्यातील ‘लो-क्वालिटी’चे कॅमेरा का वापरला.वास्तविक बघता आजच्या घडीला स्टिंग करण्यासाठी वापरण्यात येणारे सर्वच पद्धतीच्या उपकरणांमध्ये हायडेफीनेशनचे कॅमेरे आणि साऊंड रेकॉर्डर असतात.
अहमदाबाद ते मनाली १४५६ किलो मीटरचा प्रवास
दुसऱ्या काही महत्वाच्या गोष्टी देखील या व्हीडीओवर संशय निर्माण करतात.त्या व्हिडीओतील महिलेच्या एका जागेवरच बसून हालचाली आहेत.हा व्हिडीओ मनाली येथील एका हॉटेलमध्ये १६ मे २०१७ रोजीचा असल्याचे व्हिडीओ अपलोड करणाऱ्या व्यक्तीने सांगितले आहे.वास्तविक बघता हार्दिक पटेलने १७ मे २०१७ रोजी अहमदाबाद येथे गुजरात निवडणुकीत कॉंग्रेसला पाठींबा देण्याचे संकेत दिले होते.तशा आशयाच्या बातम्या सर्व वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात आले होते.अहमदाबाद ते मनालीचे बाय रोडचे अंतर १४५६ किलो मीटर तर हवाई अंतर १११८ किलो मीटर एवढे आहे.रस्त्याने अहमदाबाद ते मनाली जायचे म्हटल्यास साधारण १५ तासांचा प्रवास अपेक्षित आहे.तर रेल्वेने गेल्यास २८ तास लागतात.हवाई सफर देखील १५ ते १७ तास घेतो.कारण अहमदाबाद ते मनाली अशी थेट विमान सेवा नाही.त्यामुळे अहमदाबादहून दिल्ली आणि मग तेथून मनाली जाता येते.त्यामुळे रात्री रासलीला करणारा माणूस सकाळ किंवा फार-फार तर दुपार पर्यंत मनालीवरून अहमदाबाद कसा पोहचू शकतो? असा प्रश्न स्वाभाविक निर्माण होतो. अगदी रात्री ९ वाजेच्या सुमारास देखील मनालीहून हार्दिक निघाल्याचे लॉजिकही मान्य होत नाही.कारण आपणही तारुण्याच्या बेफाम जोशातून गेलोय.त्यामुळे हार्दिक रात्रीतून निघाला असेल हे मान्य करणे जरा अवघड जाते.
संदर्भ लिंक
१) https://www.youtube.com/watch?v=L6-3O9bgjaw
२) http://www.firstpost.com/politics/gujarat-assembly-election-hardik-patel-hints-at-supporting-congress-to-defeat-bjp-3452676.html
३) https://www.makemytrip.com/routeplanner/ahmedabad-kullu.html
४) https://hindi.news18.com/news/politics/hardik-patel-says-he-may-support-congress-in-upcoming-gujarat-assembly-elections-992841.html