कुठे तरी वाचनात आले होते की,प्रवासात विद्या,घरात मैत्री,रोग्यासाठी औषध आणि मृत व्यक्तीसाठी धर्म मित्रासामान असतात.मैत्री होण्यापासून धर्म-जात,पंथ काय आर्थिक विषमताही रोखू शकत नाही.वरील वैचारिक विषमतेच्या मोगऱ्या मी कधीच नवीन मित्र बनवितांना आड येऊ दिल्या नाहीत.हाडाचा क्राईम रिपोर्टर असल्यामुळे दोस्ती तशी चांगल्या लोकांच्या तुलनेत टुकार लोकांशीच अधिकची झाली.रेल्वे स्थानकावर अशी उदाहनार्थ स्वरूपातील अनेक लोक आयुष्यात भेटली परंतु धरणगाव रेल्वे स्थानकावर दिलीप आणि सुरजशी झालेली दोस्ती काहीशी वेगळीच ठरली.
काही दिवसांपूर्वी आणखी एक वेगळी सामजिक विषमता अनुभवली,ती म्हणजे आपल्यातला परका माणूस असण्याची,खरं तर रेल्वे स्थानकावर राहणारे आश्रयहीन, तृतीय पंथी किंवा सामजिक बहिष्कृत गटात मोडणाऱ्या प्रत्येक व्यक्ती,समूहात राहणाऱ्या माणसाला एलियन वाटतो.माझी देखील कधी काळी अशीच धारणा होती.त्याला कोणाला दोषी नाही धरता येणार.आपल्या देशात सामाजिक संरचनाच काहीशी आपली विचारसरणी बदलविण्यात कारणीभूत आहे.
काही दिवसांपूर्वी धरणगावात सलग १०-१५ दिवस राहण्याचा योग जुळून आला.यावेळी रात्री रेल्वे स्थानकावर फिरतांना एके दिवशी दिलीप आणि सुरज या दोन दोस्तांची भेट झाली.एक-दोन दिवस सहज येता-जाता हाय-हॅल्लोच्या पलीकडे काहीच झाले नाही.नंतर मात्र थोडं थांबून गप्पा होऊ लागल्या.काही दिवसांनी मी त्यांचा कधी दोस्त झालो हे मला देखील कळले नाही.माझ्या सोबत रात्री फिरायला येणारे रवी महाजन आणि कल्पेश महाजन हे देखील दिलीप आणि सुरजला चांगले ओळखायला लागले.दिलीप धरणगावचा तर सुरज अमरावतीकडील राहणारा आहे.यांची सर्व कहाणी त्यांना मला सांगितली.परंतु याठिकाणी मांडणे योग्य होणार नाही.परंतु एक सांगेल,हे दोघे दिवसभर गावात भंगार वेचतात आणि सायंकाळी कष्टाच्या पैशाने पोटाची खळगी भरून झोपी जातात.अर्थात सोबत असताना दिलीप आणि सुरज गप्पा मारण्यासोबत टाइम पास म्हणून काही खेळही खेळतात.असाच एके दिवशी पत्ते खेळतांना मी त्याठिकाणी पोहचलो.त्यांना म्हटलं काय मांड खेळताय…दिलीप म्हटला नाही हो….मांड-बिन काही नाही,टाइम पास चालू शे….! यात गंमतीचा भाग म्हणजे दोघांनी पत्ते खेळतात येत नव्हते.मग त्यांना मला जमणारा एकमेव ५ पत्तीचा गेम शिकवला.बराच वेळ गप्पा गोष्टी रंगल्या,दिवसभर काय करतात,कुठे फिरतात,स्वयंपाक वैगैरे…वैगैरे.थोडक्यात आता दिलीप आणि सुरज हे दोघंच नव्हे तर आम्ही देखील त्यांचे मित्र झालो आहोत.सध्या आमची पाच जणांची गॅग झाली आहे.परंतु खरं सांगू दोस्ता हो… ‘दोस्ती उदाहनार्थ…धरणगाव रेल्वे स्थानक !’ हे समीकरण आयुष्यभर टिकू नये असेच वाटते.कारण तुम्हाला समजलेच असेल…..!