आपल्या अडचणीच्या काळातून मार्गक्रमण करून जेव्हा-जेव्हा माजी महसुलमंत्री एकनाथराव खडसे ‘सेफ झोन’मध्ये येतात त्याचवेळी मुहुर्त साधत त्यांच्यावर एक नविन आरोप होत असतो. विशेष म्हणजे मागील वर्षभरात राज्यातील काही नेत्यांवर गंभीर आरोप झाले. परंतु अंजली दमानिया किंवा इतरांनी खडसेंच्या व्यतिरिक्त कोणत्याच नेत्याचा पिच्छा पुरविला नाही. तसेच दमानिया मध्येच शांत होतात आणि अचानकच नवा आरोप घेऊन समोर येतात. त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्यास वाव आहे.
खडसेंवरील शुक्लकाष्ठ दाऊदसोबत कथीत संभाषणाच्या आरोपाने सुरु झाले. मनिष भंगाळे नामक कथीत हॅकरने खडसेंसह देशातील इतर काही नेत्यांवर दाऊदच्या पत्नीसोबत संभाषण केल्याचा खळबळजनक आरोप लावला होता. यावेळी साधारण पाच ते सहा नावे समोर आली होती. परंतु खडसेंच्या व्यतिरीक्त आजच्या घडीला त्या प्रकरणात अडकलेल्या एकाही व्यक्तीचे नाव कुणाच्या ध्यानी नसेल. किंबहुना खडसेंच्या व्यतिरीक्त भंगाळेच्या आरोपाचे खंडन करण्यासाठी कुणीच समोर आले नाही. वास्तविक बघता माध्यमांमध्ये खडसेंसह इतर लोकांच्या नावांचीही चर्चा होणे अपेक्षित होते परंतु तसेही झाले नाही. दाऊद संभाषण प्रकरण शांत होत नाही तोच पुण्यातील हेमंत गावंडे यांनी भोसरी प्रकरणाचा आरोप केला. एमआयडीसीची जागा नातेवाईकांच्या नावे करण्यासाठी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप झाला.या संदर्भात पुण्यातील बंडगार्डन पोलिस स्थानकात गावंडे यांनी तक्रारही दिली. तक्रारी अर्जाच्या चौकशीनंतर पोलिसांनी या प्रकरणात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही, असा अभिप्राय दिला.
दाऊद संभाषण आणि भोसरी प्रकरण शांत व्हायला लागले असे जाणवत असतांनाच न्यायालयाच्या माध्यमातून खडसेंसह त्यांच्या परिवारावर गुन्हा दाखल झाला. तक्रारदार व तक्रार तीच असल्यामुळे आता पोलिसांनंतर एसीबी काय चौकशी करते? याकडे लक्ष लागून असतांनाच झोटींग समितीचा चौकशी अहवाल खडसेंच्या बाजूने असल्याच्या चर्चा सुरु झाली.तोच आता अंजली दमानिया यांनी खडसेंवर स्वत:सह नातेवाईकांच्या नावावर बेहिशोबी मालमत्ता जमविल्याचा पुन्हा एक नवा खळबळजनक आरोप केला. वास्तविक बघता याप्रकरणात त्यांनी याआधी आयकर विभाग किंवा एसीबीकडे तक्रार केली आहे का? याबाबत अधिक माहिती गरजेचे होते.साधारण 1997 पासून खडसे नियमितपणे आयकर भरत आहेत. त्यांच्या निवडणुकीच्या शपथपत्रात संपत्तीत वेळोवेळी झालेली वाढ आणि त्याचे स्त्रोत त्यानी दिले आहेत. कुठल्याही निवडणुकीत उभे राहणार्या प्रत्येक व्यक्तीला अशा पध्दतीची माहिती देणे बंधनकारकच असते. भोसरी प्रकरण समोर आल्यानंतर खडसे कुटुंबियांचे आयकर विभागाचे विवरण आणि प्रत्येकाचे वेगळे असलेले पॅनकार्ड याची माहितीदेखील समोर आली.
भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर नितीन गडकरी, पंकजा मुंडे, विनोद तावडे, किरीट सोमय्या यांच्यावर विविध आरोप झाले. एवढेच नव्हे तर महापालिका निवडणुकी दरम्यान नागपूर महापालिकेतील भ्रष्टाचारात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील नाव समोर आले होते. अंजली दमानिया जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर आल्यानंतर भुसावळच्या जमिनीप्रकरणी त्यांनी खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले होते. दमानिया यांनी आरोपांचे निकष हे फक्त खडसेंपुरताच मर्यादीत का ठेवले आहेत? याचे उत्तर आता शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. दमानिया यांनी भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या सर्वच नेत्यांबाबत खडसेंप्रमाणेच आक्रमक भूमिका का घेतली नाही? हा प्रश्नदेखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे. भंगाळेचे आरोप खोटे ठरल्यानंतर तसेच झोटींग समितीचा अहवालही खडसेंच्या दृष्टीने सकारात्मक असल्याची चर्चा सुरु झाल्याबरोबर नव्या आरोपांनी न्यायालयात खटला का दाखल करण्यात आला? याआधीच्या काळात खडसेविरोधी टोळी शांत का होती? हा प्रश्नदेखील स्वाभाविक उपस्थित होतो. एकंदरीत खडसेंवरील आरोपाची टायमिंग ही विशिष्ट मुहूर्त शोधूनच बघितली जात आहे.खडसेंच्या ‘सेफ झोन’मध्ये आल्यानंतरच हा मुहूर्त साधला जातो हे विशेष !
खडसेंवर साधारण 10 वर्षापूर्वी अशाच पध्दतीचे आरोप करण्यात आले होते. परंतु त्यावेळीही ते त्यातून सहज बाहेर निघाले होते. यावेळी एकनाथ खडसे यांनी स्वतःच्या तसेच पत्नी मंदाकिनी, सून रक्षा, मुलगी शारदा चौधरी, जावई गिरीश चौधरी, मुलगी रोहिणी खेवलकर व जावई प्रांजल खेवलकर यांच्या नावे नाशिक, जळगाव, धुळे, पुणे अशा ठिकाणी अनेक जमिनी, भूखंड व फ्लॅट खरेदी केले असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. खडसे व त्यांच्या सर्व कुटुबीयांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न कमी दाखवले जात असतानाही त्यांच्या नावे खूप मोठ्या प्रमाणात स्थावर व जंगम मालमत्ता आहेत, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.अंजली दमानिया व अन्य चार जणांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे.
खडसेंचे जावाई व सून यांना गर्भ श्रीमंत कौटुंबिक पार्श्वभूमी आहे.त्यामुळे खडसे मंत्री झाले आणि मग त्यांच्या जावयाने किंवा इतरांनी प्रॉपर्टी जमा केली असे म्हणणे चुकीचे ठरेल.एकंदरीत आरोपांची मालिका लक्षात घेता खडसेंनाच हेतूपुरस्कर टार्गेट केले जात असल्याचे स्पष्ट जाणवत आहे. अर्थात पक्षांतर्गत विरोधकांकडून यासाठी दुसर्यांचे खांदे वापरले जात असल्याचेदेखील भंगाळे प्रकरणातून समोर आले आहे. त्यामुळे मुहूर्तांवर आरोप करणार्या टोळीला खडसे कसे पुरुन उरतात हे बघणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
सुपारी घेऊन आरोप करणे या दमा निया बाईचे धंधेच आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला चांगलेच माहित झालेले आहे
Anjali Damania madam Tanna dusarya Babi disat nahi ka. etar mantranvar aarop zalet. Yanni sadhi chukashi Sathi vinanti nay Keli parantu Hon Nathabhau baddalach bolnyacha contract kelya sarkha prakar suru ahe. High Court ne hi baju tapaun Pahlavi. Ugach aarop Karun ekhadya vyaktiche badnaam karayche ya goshti Sathi High court ne Anjalu Damania madam la fatkarle pahije ani Jabar Shiksha Keli pahije jenekarun kontyahi vyaktiche future kharab ho at nahi….. Bhaskar Borole