जिंदगी जिंदाबाद
    No Result
    View All Result
    No Result
    View All Result
    जिंदगी जिंदाबाद
    No Result
    View All Result

    वर्दीतील एक सामाजिक व्रत !

    admin by admin
    January 2, 2015
    in Uncategorized
    0

    dhopavkarजळगाव जिल्हा पोलीस दलात सध्या पोलिस उपअधिक्षक (गृह) म्हणून कार्यरत असलेले धनंजय रघुनाथ धोपावकर यांना कुटुंबातूनच अध्यात्मिकतेचा वारसा लाभलेला. मालेगाव तालुक्यातील रावळगाव या छोट्याशा गावी जन्माला आलेला हा माणुस अहमदनगर, पुणे,नाशिक, अमरावती आदी ठिकाणी शिकला व एक दिवस थेट लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होत सरळ इन्कम टॅक्स अधिकारी झाला. पण आयुष्यात अचानक एक वळण आले आणि ते पोलीस खात्यात रुजू झाले. कायद्याचा बडगा दाखवत काठी उगारण्यावर त्यांचा कधी विश्‍वासच बसला नाही. आपण समाजाचे काही देणं लागतो या उदात्त भावनेतून आपल्या वक्तृत्वशैलीच्या जोरावर त्यानी आतापर्यंत विविध विषयांवर तब्बल सात हजार व्याख्याने देत पोलिस दलात एक नविन आदर्श निर्माण केला आहे व त्याचा हा सामाजिक व्रताचा प्रवास २६ वर्षाच्या सेवेनंतर आजही अव्याहतपणे सुरु आहे. व्यसनमुक्ति, अंधश्रध्दा निर्मुलन, स्त्र्री- अत्याचारविषयक जागृती, मानवी अधिकार, जातीय सलोखा, पर्यावण सुरक्षा आदी विविध विषयांवर ते अस्खलितपणे बोलू शकतात. माहितीच्या अधिकाराची कार्यशाळाही ते घेत असतात. एवढेच नव्हे तर इस्लाम धर्म अणि उर्दुचे ते गाढे अभ्यासक आहेत उर्दु भाषेवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व आहे. ते या भाषेत ओघवतेपणाने बोलु शकतात व त्यात कवितादेखील करतात. याचसोबत कवितेचा मुळ भावार्थ न बदलु देता मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषेत एकाच आशयावर ते कविता लिहु शकतात. सदाशिव अमरावपुरकर, स्मिता पाटील व अनिल क्षिरसागर अश्या कसलेल्या अभिनेत्यासोबत नाटकात त्याना काम करण्याचा अनुभव देखिल आहे. त्यांनी आजवर तब्बल ६९ वेळा रक्तदान केले असुन विविध ठिकाणी भाषणातुन तरुणाना रक्तदान करण्यासदर्भात मार्गदर्शन करत असतात. नोकरी व सामजिक कार्य करत असताना आपल्या प्रकृती विषयी ते अत्यंत जागरुक आहेत. ते स्वत: निर्व्यसनी असुन सहकर्‍यांना देखील याबाबत नेहमी मार्गदर्शन करत असतात. ज्युडो कराटे मध्ये त्यानी नुसता ब्लॅक बेल्ट मिळविला नाही तर त्याचे ते आतरराष्ट्रीय दर्जाचे पंच देखिल झाले आहेत जलगाव जिल्हापरिषदेच्या सीईओ शितल उगले, तहसिलदार उषाराणी देवकरणी, छत्रपती शिवाजी महाराज पुरस्काराने सम्मानित भारताची पहिली महिला कुस्तीपटु अजली देवकर यांच्यासह ३०० विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून शिक्षण घेतले आहे.
    रावेरला गणपती उत्सवादरम्यान दंगल उसळल्या नंतर पोलिस अधिकक्षांनी त्यांना खास जातीय सलोख्यावर कॅार्नर मिटिंगा घेण्यासाठी पाठविले होते. त्याच्या व्याख्यानामुळे तेथिल वातावरण निवळण्यास बरिच मदत झाली होती. ‘गोली से नही तो बोली से हो सकता है’ म्हणत त्यानी दंगल नेहमी लाठी,काठी किवा गोळीने नव्हे तर प्रेमाच्या बोलीने देखिल थांबवता येवु शकते हे सिध्द करुन दाखविले आहे.
    धोपावकर यांचासेवानिवृत्ती नंतर कथा, कविता संग्रह प्रसिध्द करण्याचा मानस असुन रक्तदानाचा टप्पा १०१च्यावरन्यायचा आहे. त्याच्यातील साहित्यिकास व सामाजिक कार्यकर्त्यास घडविण्या मागे मुबइचे पोलिस आयुक्त डॅा.सत्यपाल सिग, वरिष्ठ पोलिस अधिकारी अरविंद इनामदार, संतोष रस्तोगी, सुबोधकुमार, सी.एच.स्टॅलीन, विदयमान पोलिस अधिक्षक एस.जयकुमार याचे सहकार्य असल्याचे ते विनम्रपणे सांगतात. धनंजय धोपावकर हे एका अर्थाने पोलीस दलातील सामाजिक जाणीवेचा चेहरा आहेत. त्यांचा आदर्श अन्य अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी घेतला पाहिजे.
    <प्रसिद्ध दिनांक २६ मार्च १२>

    Previous Post

    मैत्री नावाच रेशमबंध……!

    Next Post

    राजकारण्यांची भाषणे उस्त्फुर्त असतात कि….

    Next Post

    राजकारण्यांची भाषणे उस्त्फुर्त असतात कि….

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    No Result
    View All Result

    Recent Posts

    • सोहराबुद्दीन चकमक : रक्तरंजित धुकं !
    • गुजरात फाईल्स : राजकारण्यांचा बेगडी बुरखा फाडणारं पुस्तक !
    • हरेन पांड्या खून प्रकरण : मोदींवर आरोप ते सुप्रीम कोर्टाचा निकाल…!
    • सोहराबुद्दीन बनावट चकमक : अनेक अनुत्तरीत प्रश्नांची मालिका !
    •  ‘अत्त दिप भवं’ ! 

    Recent Comments

    • मनोहर चौधरी on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • Harshal Talele on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • अमोल पाटील on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • Vasudeo Borole on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • पाटील चंद्रशेखर on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !

    Archives

    • November 2019
    • September 2019
    • July 2019
    • June 2019
    • May 2019
    • April 2019
    • February 2019
    • January 2019
    • December 2018
    • November 2018
    • October 2018
    • September 2018
    • August 2018
    • July 2018
    • June 2018
    • May 2018
    • April 2018
    • March 2018
    • February 2018
    • January 2018
    • December 2017
    • November 2017
    • October 2017
    • September 2017
    • April 2017
    • March 2017
    • January 2017
    • December 2016
    • October 2016
    • September 2016
    • August 2016
    • July 2016
    • June 2016
    • May 2016
    • April 2016
    • March 2016
    • February 2016
    • January 2016
    • December 2015
    • November 2015
    • October 2015
    • August 2015
    • July 2015
    • June 2015
    • May 2015
    • April 2015
    • March 2015
    • February 2015
    • January 2015

      © 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

      No Result
      View All Result

        © 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.