प्रत्येकाच्या आयुष्यात एक जिवलग मित्र हा असतोच किंबहुना तो असलाच पाहिजे..कारण या मनुष्यरुपी जन्मात येताना आपण बरीच नाती सोबत घेऊन येतो.त्यातील बरीच नाती हे आपल्याला हि नाईलाजास्तव मान्य करावी लागतात.पण मित्र हा आपण आपल्या पसंती नुसार निवडत असतो.त्याचा स्वभाव,आवडी-निवडी या आपल्याला त्याच्या पेक्षा जास्त माहित असतात..एखाद ठिकाणी आपण गर्दीत आपल्या माणसांसोबत उभे असतो आणि मागून आवाज येतो “कारे साल्या केव्हांचा आवाज देतो आहे”
किवा “कारे मुर्खा केव्ह्नाची आवाज देते आहे”…! त्या गर्दीत राग एवजी आपल्या चेहऱ्यावर साताजन्माचे हसू फुलते..आणि त्याची माफी मागत त्याच्यावर लक्ष नसल्याचे सांगतो..आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा सच्चा दोस्त असावाच लागतो कारण बऱ्याच गोष्टी या आपण आई-वडील,भाऊ-बहिण किबहुना जीवनसाथीदारालाही आपण सांगत नाही त्या सर्व गोष्टी आपण आपल्या मित्राला किवा मैत्रिणीला सांगतो … छोट उदाहरण देतो ऑफिसला एखाद नवीन मुलगी येवो कि रस्त्याने जाणताना आपले पहिले प्रेम दिसो … संध्याकाळी पहिला फोन त्यालाच करणार…आणि त्याच्यासोबत गम या खुशीची पार्टी रंगवणार…मैत्रीण असली तर तिला सांगणार अरे यार ‘ती’ दिसली आज जा ना तिच्या घरी बघ ना भेटता येते का ? कशी आहे ती तपास करून सांग ना जरा ! अश्या जीवनातील अनेक गोष्टी आपण फक्त आणि फक्त आपल्या सच्च्या दोस्ता जवळच सांगू शकतो…म्हणून तो प्रत्येकाच्या जीवनात असलाच पाहिजे तो दोस्त तुमच्याजवळ नसेल तर कधी हि तुमची आत्मक्लेशा पासून सुटका होणार नाही…मनातल्या मनात झुरत हे आयुष्य जाणार… या जीवनाचे वर्तुळ त्या सच्च्या दोस्ताशिवाय पूर्ण होऊच शकत नाही…माझ्या एक मित्राने मला एक एस.एम.एस पाठवला होता त्यात म्हटले होते कि,आई-वडील हे ‘प्रीपेड कार्ड’ … जीवनसाथीदार हा पोस्टपेड कार्ड तर मित्र हा “आधार कार्ड” आहे…बरोबर आहे का मित्रांनो हे ?