प्रत्येक वेळी मनाविरुद्ध घडणारया गोष्टी आणि त्यामुळे होणारा मानसिक त्रास यामुळे माणूस फार वैतागतो. बऱ्या पैकी जाणून असलेल्या गोष्ठी जेव्हा नव्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीसाठी ज्या पद्धतीने पटवून सांगितल्या जातात त्यावेळी लोक आपल्याला किती नादान समजतात हे हि अनेकदा आपल्याला स्पष्टपणे जाणवते आणि त्यावेळी त्यांची समजूत खरी आहे,हे त्यांना पटू देण्यापलीकडेहि आपल्या हातात त्यावेळी काहीच नसते.
आपणाल्याला समजूतदरीच्या नावाखाली पाळायला लावलेली नियम हे दुसऱ्यांसाठी शिथील केल्याचेहि अनेक उदाहरण आपल्याला दिसून येतात,असो एकदिवस हि परिस्थिती बदलेलते तो पर्यंत परत एकदा आपण स्वता:ला सिद्ध करण्याच्या प्रयन्त करु शकतो.एक गोष्ट निश्चित आहे कि,कुठल्यहि क्षेत्रात “गॉडफादर” असल्यानंतर बऱ्याच गोष्ठी या सहज शक्य होत असतात. पण “गॉडफादर” नसला म्हणून माणूस यशस्वी होत नाही का ? काहीहि होवो यशस्वी व्हायचे म्हणजे व्हायचे हि गाठ मनाशी बांधली कि, मग कुणी साथ देवो अथवा ना देवो. स्प्रिंग जेवढी दाबली जाते ना …. त्याच्या कितीतरी पटीने ती हातातून निसटते त्यामुळे ध्येयाची लांब उडी घेण्यासाठी कधीही दोन पाऊल मागे सरकायला देखील मागे पुढे विचार करायची गरज नाही. नाही तरी ज्याच्याकडे काही असते ना… त्यालाच गमावण्याचा धाक असतो,ज्याच्या कडे काही नसते त्याला तर सर्व मार्ग मोकळे असतात,त्यामुळे काही मिळवताना बिकुल गमवण्याचा धाक बाळगयाची गरज नाही. “लेहरो के साथ तो कोई भी तैर लेता है…असली इन्सान तो वो है…जो लेहरोको चीर के आगे निकलता है !”