एका देशाची राजकुमारी सर्वसामान्य माणसांप्रमाणे जीवन जगता यावे म्हणून, वयाच्या सोळाव्या वर्षापासून घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करतेय. तब्बल सात वेळेस पलायनाचा प्रयत्न असफल ठरल्यानंतर ती यशस्वी झालीय. एका फ्रेंच गुप्तहेराच्या मदतीने बोटच्या माध्यमातून ती अमेरिकेत राजकीय शरणार्थी म्हणून परवानगी मागते. परंतु परवानगी मिळत नाही म्हणून ती त्याच बोटने गोव्यापर्यंत पोहचते. परंतु तिला भारतीय जवान ताब्यात घेत,परत दुबईला पाठवतात. तेव्हापासून म्हणजेच मार्च २०१८ पासून राजकुमारी सार्वजनिक जीवनात कुणालाही दिसून आलेली नाही. त्यांनंतर काहीमहिन्यातच १९ महिन्यापासून धूळखात पडलेला मिशेलच्या प्रत्यार्पण प्रस्ताव मंजूर होतो. ब्रिटनचा नागरिक असून देखील दुबईचे सरकार ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यातील प्रमुख आरोपी क्रिश्चियन मिशेलला अचानक भारताच्या स्वाधीन करते. दुसरीकडे राजकुमारीचे वकिल संयुक्त राष्ट्राकडे तक्रार करतात की, राजकुमारीच्या गायब होण्यामागे दुबई आणि भारत सरकारचा हाथ आहे. सर्व घडामोडी लक्षात घेता मिशेलचे प्रत्यार्पण आणि दुबईच्या राजकुमारीची कहाणी पूर्ण फिल्मी ठरतेय.
दुबईचे पंतप्रधान तथा राजा शेख मुहम्मद बिन राशिद अल-माकतुम यांची मुलगी शेख लतीफा (वय ३३) हिला बालपणापासूनच सर्व सामान्य नागरिकांप्रमाणे जीवन जगायची इच्छा असते. म्हणूनच ती वयाच्या सोळाव्या वर्षापासून महालातून पळून जाण्याचा प्रयत्न करते. एकदा पलायन करतांना लतीफा सुरक्षा रक्षकांच्या हाती लागते. त्यानंतर तिला तब्बल तीन वर्ष एका जेलमध्ये ठेवले जाते. त्यानंतरही तिला मनोरुग्ण रुग्णालयात तीन वर्ष ठेवण्यात येते. परंतु एकदिवस अखेर लतीफा फ्रान्सच्या एका गुप्तहेरच्या मदतीने पळण्यात यशस्वी होते. तर लतीफाचे अपहरण झाल्याचे तिचे वडील आणि भाऊ सांगतात.
काही दिवसातच लतीफा स्वतः एक व्हिडीओ प्रसारित करून आपल्या देशात कशा प्रकारे महिलांवर अत्याचार होतात. तसेच आपल्या वडिलाला ६ बायका आणि स्वतःला ३० भाऊ-बहिण असल्याचे जगासमोर सांगते. एवढेच नव्हे तर, जेव्हा तुम्ही सतत नजरकैदेत किंवा कैदेत असतात त्याचवेळी तुम्हाला स्वतंत्रतेचे महत्व कळते. कदाचित आपला हा व्हीडीओ समोर येईल, तोपर्यंत मी जगात नसेल किंवा माझी परिस्थिती गंभीर असल्याचेही ती म्हणते.
अमेरिकेत राजकीय आश्रय मिळाला नाही म्हणून लतीफा फ्रांस अमेरिकी हर्व जुआबर्टने बोटने भारताच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हाच लतिफाचा भाऊ भारताला कळवितो की, लतीफा भारताच्या हद्दीत पोहोचलीय. गोव्याच्या समुद्र तटापासून अवघ्या काही अंतरावर भारतीय जवान एका बोटवर लतिफाला चार लोकांसोबत पकडतात. त्यानंतर अत्यंत गोपिनीय पद्धतीने तिला दुबईला रवाना केले जाते. तेव्हापासून लतिफा कुठं आहे? याबाबत जगात कुणाला काहीही माहिती नाही. लतीफा जिवंत आहे किंवा नाही? याबाबत देखील शंका आहे.
राजकुमारी लतीफाला मार्च २०१८ मध्ये दुबईला परत पाठविल्यानंतर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अनुषंगाने अचानक अशक्यप्राय वाटणारी तसेच १९ महिन्यांपासून धूळ खात पडलेला प्रस्ताव अचानक मंजूर होतो. ब्रिटन नागरीक असलेल्या क्रिश्चियन मिशेलला भारताच्या स्वाधीन केले जाते. विशेष म्हणजे दुबई किंवा भारताकडून मिशेलच्या प्रत्यारोपणआधी किंवा नंतरही ब्रिटनला याबाबत कुठलीही माहिती देण्यात येत नाही, म्हणूनच मिशेलचे प्रत्यारोपण ऐतिहासिक आहे. याच कारणामुळे मिशेल आणि दुबईच्या राजकुमारीची कहाणी पक्की फिल्मी ठरतेय. दुबईच्या राजाला आपली मुलगी लतिफाच्या बदल्यात ब्रिटीश नागरिक देण्यात काहीच अडचण नव्हती. तर दुसरीकडे भारताला दुबईला त्यांची राजकुमारी देत २०१९ निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला घाबरविण्यासाठी आणि भारतीयांसमोर खेळविण्यासाठी मिशेल नावाचे एका कागदी भूत पुन्हा मिळणार असते.