राफेल करार आणि रिलायंसच्या संदर्भात एक खळबळजनक खुलासा झालाय. मागील तीन वर्षापासून घाट्यात असलेली रिलायंस कंपनी अचानक मालामाल झालीय. राफेल करारानंतर रिलायंसच्या डिफेन्स कंपनीला तब्बल २८४ करोडचा फायदा झाल्याचे समोर आले आहे. तीन वर्षापासून घाट्यात असलेल्या कंपनीला करोडो-अरबो रुपयांचा फायदा करून देण्याची जादू फक्त आणि फक्त आपले पंतप्रधानच करू शकतात.
राफेल करार हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा म्हटला जातोय. विशेष म्हणजे फक्त रिलायंस पर्यायी अनिल अंबानीला मोठा फायदा करून देण्याच्या उद्देशाने राफेल करार झाल्याचे म्हटले जात होते. आता या संदर्भात रोहिणी सिंग आणि रवी नायर यांनी ‘द वायर’च्या रीपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा केलाय. या रीपोर्टनुसार रफाल करार झाल्यानंतर घाट्यात असलेली अंबानी यांच्या कंपनीला तब्बल २८४.१९ करोडचा फायदा झाला आहे.
२०१६ मध्ये अंबानी यांच्या कंपनीची कमाई नाममात्र देखील नव्हती. ही कंपनी 9 लाखाच्या घाट्यात होती. २०१७ मध्ये ६ लाखाची कमाई तर १०.३५ लाखाचा घाटा झाला होता. त्यानंतर २०१७-१८ मध्ये हीच कंपनी २८४.१९ करोड कमवते आणि चक्क दसाल्ट कंपनीची भागीदार कशी बनते हे देवच जाणे. या खेळाचे जादुगार पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत,असं म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण घाट्यात असलेल्या कंपनीबरोबर एवढी मोठी भागीदारी कीतीही मूर्ख कंपनी करणार नाही.
दसाल्ट कंपनीचे सीईओ एरिक ट्रैपीएर यांनी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत या जादुई भागीदारीमागील रहस्य आधीच सांगितले आहे. एरिक ट्रैपीएर यांनी सांगितले होते की, रिलायंसकडे विमानतळासमोरील जमीन असल्यामुळे दसाल्टने रिलायंस सोबत करार केला. मुळात रिलायन्सला ही जमीन कुणी दिली? एका झटक्यात इतकी महागडी जमीन देण्याची शिफारस कुणी केली होती? याबाबतची माहिती तर अधिकच धक्कादायक आहे. जुलै २०१५ मध्ये रिलायंस या जमिनीसाठी प्रस्ताव देते आणि आपले पंतप्रधान मोदी जादूची कांडी फिरवत अवघ्या एका महिन्यात ऑगस्ट २०१५ मध्ये ही जमीन रिलायंसला देऊन टाकतात आणि जमिनीच्या आधारावरच २०१७ मध्ये दसाल्ट कंपनी करोडो रुपयांची गुंतवणूक करते.
दुसरीकडे राफेल करारासाठी मोदी सरकारनेच अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनीचे नाव सुचविले होते, असा दावा फ्रान्सची इन्व्हेस्टिगेटिव्ह वेबसाईट मीडियापार्टने आधीच केलाय. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (एचएएल) या दीर्घ अनुभवी आणि सरकारी विमान कंपनीला वगळून अनिल अंबानींना हे काम देण्यात मोदींचा नेमका काय उद्देश असावा हे न समजण्या इतके कोणी मूर्ख नाहीत. मुळात मोदींनी काहीही सांगावे आणि लोकांनी ते गपचूप ऐकावे, अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. आता लोकं प्रश्न विचारायला लागले आहेत. परंतु मनमोहनसिंग यांना मौनी पंतप्रधान म्हणून हिणवणारे आणि दर रविवारी ‘मन की बात’ करणारे पंतप्रधान मोदी राफेल प्रकरणात चक्क न्यायालयाने याचिका दाखल करून घेतल्यानंतरही मौन धारण करून का बसले आहेत,हा मोठा प्रश्न आहे.
अमित शहा यांच्या सुपुत्राच्या कंपनीच्या नफ्यात देखील अनिल अंबानी यांच्या कंपनी सारखीच वाढ झाल्याची माहिती मागील वर्षी समोर आली होती. घाट्यात असलेल्या कंपनीने १६ हजारहुन टक्क्यांनी नफ्यात वाढ कमवत आणि अवघ्या ५० हजारची कंपनी ८० करोडची बनली होती. त्याच धर्तीवर २०१६-१७ मध्ये घाट्यात असलेली अंबानी यांची कंपनी २०१७-१८ मध्ये करोडो-अरबो रुपये कमावते. ‘द वायर’च्या रीपोर्टमध्ये अशा अनेक मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहेत.
मुळात राफेल खरेदी करण्याचे कुठलेही ठोस कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. राफेलपेक्षा स्वस्त आणि तेच तंत्रज्ञान असलेले ‘यूरोफाइटर टाइफून’ विमान आपल्याला मिळू शकत होते.मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष केले गेले. राफेल विमान आण्विक शस्त्र वाहून नेण्याची क्षमता असल्यामुळे खरेदीचे कारण सांगितले गेलेय. परंतु सुरक्षा तज्ञांच्या अनुसार भारताकडे आधीच उपलब्ध असलेल्या विमानं देखील ही क्षमता राखून आहेत. विशेष म्हणजे आधीच्या विमानांच्या देखभाल करण्याची एक सिस्टम भारतीय वायू सेनेत तयार आहे. उलट, राफेल आल्यानंतर अनेक जटील समस्या निर्माण होण्याची भीती आहे. असो काहीही झाले…कुणी कितीही बोंबा मारल्या तरी आपल्या मित्राची रिलायंसला तोट्यातून बाहेर तर काढले ना! इसी वजह सें हमारे हुजूर…आप राफेल कें जादुगर हो ! ये कहना, गलत थोडीना हैं !