पुणे येथील हिंजवडीत आयटी पार्कजवळ एका उच्चभ्रू वस्तीतील अपार्टमेंटमध्ये काही दिवसांपूर्वी पोलीसांनी रेड टाकून काही मुलींची सुटका तर पाच जणांना अटक केली होती. या संदर्भात माझे मित्र समीर गायकवाड (सोलापूर) यांनी नुकतेच सविस्तर लिखाण केले होते. समीर बापूंनी आपल्या फेसबुकवरील पोस्टमध्ये काही मोबाईल नंबर तसेच काही वेबसाईटच्या लिंक दिल्या होत्या. एवढेच नव्हे तर या गोरखधंद्याची व्याप्ती पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात वा संपूर्ण देशात किती आणि कशी आहे, याची माहिती त्यांनी आपल्या पोस्टमधून सविस्तर दिली होती. त्या पोस्टमध्ये दिलेल्या वेबसाईटच्या लिंक चाळत असतांना मला आपल्या जळगावशी निगडीत काही गोष्टी समोर आल्यात आणि माझ्या पायाखालची वाळूच सरकली. विशेष म्हणजे ‘जळगाव फिमेल एस्कॉर्ट’ हा शब्द गुगलवर सर्च केल्यास अनेक वेबसाईट धक्कादायकरित्या समोर आल्या आणि तेथील माहिती बघून तर अक्षरशः चक्रावूनच गेलो.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील एका हॉटेलमध्ये काही दिवसांपूर्वी एलसीबीने रेड टाकून काही जणांना अटक केली होती. त्याच पद्धतीने जळगाव शहरात एका व्यापाऱ्याला घरी बोलावून अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुळात अशी काही प्रकरण समोर आल्यावर काही दिवस त्यावर चर्चा होते. मात्र, थोड्याच दिवसात सगळे विसरले जाते. पुण्यातील ऑनलाईन देहव्यापारचा प्रकार समोर आल्यानंतर राज्यासह देशभरातील या धंद्यांबाबत प्रचंड खळबळ उडाली असून त्यांच्या साखळीवर मोठी चर्चा होतेय. दुसरीकडे साधारण १० ते १२ वर्षापूर्वी ऑनलाईन देहव्यापारच्या धंद्यासंबंधी बातम्या जळगावमधील काही स्थानिक दैनिकांनी प्रसिद्ध केल्या होत्या. परंतु इतक्या वर्षानंतरही या धंद्यात जळगावची सुरु असलेली बदनामी अद्यापही थांबलेली दिसत नाहीय. ऑनलाईन देहव्यापारच्या धंद्यात जळगावची होत असलेली बदनामी अद्यापही सुरूच असणे, हे शहराच्या प्रतिमेच्या दृष्टीकोनातून प्रचंड धोकेदायक आहे. त्यामुळे जळगाव पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालत कारवाई करणे गरजेचे झाले आहे. शेवटी आपल्या जळगावला नको त्या गोष्टीचा काळाकुट्ट इतिहास आहे, हे विसरून आपल्याला चालणार नाही.
जळगाव महाराष्ट्र फिमेल एस्कॉर्ट एवढेच गुगल सर्च केल्याबरोबर अनेक साईट्स इंटरनेटवर समोर येतात. पुरावा म्हणून एक लिंक देतोय – https://ahanasingh.com/maharashtra/jalgaon-escorts-girls.html ही लिंक संशयास्पद आहे. कुणी अहाना सिंग नावाने उघडलेले हे वेब पोर्टल खरे वाटत असले तरी पूर्ण फसवे असल्याचा माझा अंदाज आहे. या सारख्या मला तब्बल ८ ते १० लिंक्स सापडल्या. त्यात जळगावचा उल्लेख आहे. यातील एखादं दुसरी वेबसाईट फेक आहे.परंतु उर्वरित वेबसाईट शाॅकिंग ट्रुथ आहेत. याठिकाणी दिलेल्या मुलींचे फोटो शंभर टक्के जळगावच्या मुलींचे नाहीत. हे फोटो दुसऱ्याच राज्यातील व देशातील मुलींचे आहेत. वरील दिलेल्या लिंकचे अवलोकन केल्यानंतर आणखी एक गोष्ट लक्षात आली. याठिकाणी कशा पद्धतीने व्यवहार होतील,सुरक्षिता कशी बाळगली जाते याबाबत सविस्तर माहिती देखील सांगण्यात आली आहे.
https://sihi.biz/maharashtra/jalgaon-escorts-girls.html या वेबसाईटवर तर जळगाव जिल्ह्याची इथ्यंभूत माहिती आहे. त्यात अगदी अजिंठा वेरूळ, पद्मालय, मुक्ताईनगर येथील चांगदेव आदी देवस्थानांसह निसर्गरम्य स्थळांबाबत देखील माहिती देण्यात आलीय. बाहेरून येणाऱ्या ग्राहकांना जळगाव अशा कामांसाठी कसं सुरक्षित आहे, हे देखील पटवून सांगण्यात आलेय. याठिकाणी तीन भागात माहिती देण्यात आली आहे. त्यात सुंदर आणि स्वत्रंतरित्या राहणाऱ्या कॉलगर्ल, सर्व प्रकारच्या मॉडेल डेटिंग आणि मिटिंग सर्विस, रिअल व्हाट्सअप नंबर, फोटोज आणि रेट, माइंड ब्ल्वोविंग लेडी इन जळगाव, अशा टप्प्यात माहिती देण्यात आली आहे. तसेच मोबाईल नंबर आणि इ-मेल आयडी देखील देण्यात आला आहे.
अशाच प्रकारे https://www.locanto.net/ ही फ्री जाहिरातीसाठी प्रसिद्ध वेबसाईट आहे. या वेबसाईटवर ‘जळगाव फिमेल एस्कॉर्ट’ हा शब्द सर्च केला असता,त्याठिकाणी एक जाहिरात दिसून आली. ही जाहिरात अवघ्या एक महिन्यापूर्वी वेबसाईटवर टाकण्यात आलेली आहे. परंतु ही जाहिरात एक्सपायर झाल्याचे त्याठिकाणी दिसून येत आहे. याठिकाणी देण्यात आलेल्या जाहिरातीत दिलेला नंबर (९६१०१३५***) गुगलसर्च केला असता वडोदरा,उज्जैन,रत्नागिरी, सिल्वासा आदी ठिकाणच्या ‘फिमेल एस्कॉर्ट’शी संबंधित वेबसाईट लिंकमध्ये तोच नंबर आढळून आला. यावरून सबंधित व्यक्ती संपूर्ण देशासह महाराष्ट्रात हे सेक्स रॅकेट चालवीत असल्याचे स्पष्ट आहे.
एकंदरीत एक लक्षात आले की, या वेबसाईटवर जवळपास महाराष्ट्रील सर्व मोठ्या शहरांची नावे आहेत. याचाच अर्थ वेबसाईट चालवणारा मुंबईतला असो की, गुजरातचा. तो तुम्हाला पाहिजे त्याठिकाणी तुमच्या आवडीनुसार मुली किंवा महिला पुरवण्याची ताकद ठेवतो. अगदी मॉडेल्स आणि कॉलेजच्या मुली देखील. या वेबसाईटवर धुळे, औरंगाबाद आदी जवळच्या शहरांची देखील नावे आहेत. त्यामुळे याविषयाचे गांभीर्य खूपच वाढलेले आहे. या वेबसाईटवर कदाचित मुख्य शहरांचे पेजेस फक्त बनवून ठेवले आहेत. म्हणजेच एखाद्या पर्यटकाला किंवा अन्य कुणालाही शरीरशैय्या करण्यासाठी गुगल सर्च केल्यास त्याला संबंधित वेबसाईटच समोर येते.
प्रत्येक वेबसाईटच्या लिंकवर वेगवेगळ्या मुली व महिलांची माहिती देण्यात आलीय. प्रत्येक वेबसाईटवर वेगवेगळी माहिती आणि मोबाईल नंबर दिले आहेत. अर्थात यातील काही नंबरवर फोन केले असता, फोन सर्वांचे लागलेत. परंतु फोन कुणीही उचलला नाही, दोन फोनची रिंग पूर्ण वाजली तर इतर दोघांनी फोन कट केला. फोन कट केल्यावर व्हाईस मॅजेजवरून एक फोन गुजरात राज्यातील असल्याचे समजले तर एक क्रमांक महाराष्ट्रातीलच आहे. हे सर्व नंबर सेव्ह केल्यावर यातील दोन नंबर व्हाटसअपवर असल्याचे दिसून आलेत. एवढेच नव्हे तर, एक नंबर चक्क ऑनलाईनही होता. परंतु डीपी वर कोणाचाही फोटो नव्हता. एवढेच काय कोणत्याही नंबरवरून कॉलबॅक आला नाही.
यातील काही नंबर true caller वर चेक केले असता आणखी धक्कादायक माहिती समोर आली. एका वेबसाईटवर मुस्कान नावाने देण्यात आला होता. परंतु true caller वर तोच नंबर सुनील कुमार नावाने दिसत होता. विशेष या नंबरचा ११६ जणांनी spam report केलेला होता. तर अन्य एका वेबसाईटवर अहाना (मुंबई) नामक मुलीच्या नावाने देण्यात आलेला नंबर चक्क मुस्कान नावाने असल्याचे समोर आले. याचाच अर्थ या दोन्ही वेबसाईट संचालकांमध्ये लिंक आहे किंवा दोन्ही नंबर एकाच व्यक्तीचे आहेत. हा नंबर बिहार येथील असल्याचे दिसत होते. अन्य एक क्रमांक कॉलगर्ल नावाने समोर आला होता तर त्या नंबरला तब्बल २१६ लोकांनी spam report केलेले होते.
अशा वेबसाईटयाद्वारे सेक्स स्कँडल्स वा वैश्याव्यवसाय होत नाही आणि हे सगळे बनावट असल्याचे आपण तूर्त गृहीत धरू. परंतु या वेबसाईटवरून मुलींचे आमिष दाखवून पैसे काढले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशा पद्धतीने फसवल्या गेल्यासंबंधी साम्य असणाऱ्या घटना नुकत्याच अनेक जिल्ह्यात देखील उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
याठिकाणी जळगाव, पुणे,धुळे,औरंगाबाद या शहराचा उल्लेख प्रातिनिधिक स्वरुपात आहे. कधी काळी काही मोजकी गावं आणि शहरे अशा कामांसाठी बदनाम होते. गावाच्या कोणत्यातरी कोपऱ्यातच हा धंदा चालायचा परंतु आता तर राज्यातील प्रत्येक शहरात अनेक अपार्टमेंटमध्ये हा धंदा सुरु झालाय का? अशी शंका निर्माण झालीय. कारण जळगाव सारख्या ग्रामीण भागात देखील या घाणीचा प्रादुर्भाव झाला असावा,तूर्त तरी असेच चित्र समोर येतेय.
वास्तविक बघता अशा वेबसाईटची सर्व माहिती मिळविणे सायबर सेलसाठी फार कठीण बाब नाहीय. सबंधित वेबसाईटची होस्टिंग आणि डोमेन नेम कुणाच्या नावावर रजिस्टर आहे किंवा आयपी अॅड्रेसबाबत माहिती मिळविणेही सहज शक्य आहे. सबंधित वेबसाईटच्या मालकापर्यंत पोहोचणे सहज शक्य नसले, तरी गुगलकडे तक्रार नोंदविल्यास सबंधित वेबसाईटवरून विशिष्ट मजकूर किंवा थेट साईट देखील डाऊन करता येऊ शकते. यात धोका असा आहे की, सबंधित वेबसाईटची होस्टिंग परदेशात असल्यास मात्र, गंभीर मर्यादा येतात. परंतु जळगावच्या सायबर सेलने काही दिवस प्रामाणिक प्रयत्न केल्यास यात काही तरी सुधारणा होण्याची शक्यता आशा आहे.
आपल्या जळगावात छोटे-मोठे किंवा काही गंभीर गोष्टी घडल्या आहेत,हे मला माहित होते. परंतु सर्व्हिस प्रोव्हायडींगचे डिजिटल फंडे तेही इतक्या आधुनिक पद्धतीने आताच्या काळात सुरु असणे अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब आहे. आता या वेबसाईटमधील गोष्टी खऱ्या की, खोट्या? याचा शोध घेण्याचे काम पोलीस प्रशासनाचे आहे. माहिती खरी असल्यास पाळेमुळे खोदून काढावीत अन्यथा संबंधित वेबसाईट बंद करण्यासाठी किंवा किमान जळगावचा मजकूर काढण्यासाठी तरी प्रामाणिक प्रयत्न अपेक्षित आहेतच.
विजय जी
Horrible