सैफअली खानची बहिण सोहा लवकरच कुणाल खेमू बरोबर लग्न करीत आहे तर सलमान खानची मोठी बहिणीचे लग्न अतुल अग्निहोत्री या अभिनेत्या सोबत झाले आहे,अशी अनेक उदाहरण देता येतील.सांगायचा हेतू एवढाच कि,करीना कपूरला घर वापसीचे आवाहन देणारे कथित हिंदुत्ववादी,कुणाल खेमू आणि अतुल अग्निहोत्रीला कोणते आवाहन करतील,आता तर यापुढे जात आमीर,शाहरुख किवा सैफने आपल्या बायकोवरचे प्रेम सिद्ध करण्यासाठी हिंदू धर्म स्वीकारावा असे आवाहन हे मंडळी करीत आहे.अरे ….त्यांनी लग्न केले मात्र त्यांच्या पत्नींना धर्म परिवर्तन करण्यास सांगितलेले नाही.अरे…उगाच कशाला मनं दुषित करत फिरताहेत काय माहित ! शाहरुखच्या एका मुलावर हिंदू तर दुसरया मुलावर मुस्लीम धर्माप्रमाणे संस्कार होत आहेत.एवढेच काय भारतातल्या सर्वात मोठ्या इमामने विरोध केल्यानंतरहि सलमान दरवर्षी आपल्या घरी गणपती बसवतो. त्यामुळे धर्माचा कळवळा आणणाऱ्यानी आधी हेमा मालिनीला आणि धर्मेंद्र बद्दल देखील आपले विचार मांडावे अश्या संकुचित विचारांच्या लोकांमुळेच हिंदू धर्माची प्रतिमा खराब होत आहे.च्या मारी …..प्रत्येक गोष्टीत जात अन धर्म पहाता….गोळ्या खल्लास कुठले !
(http://www.bhaskar.com/news/NAT-hindu-mahasabha-to-khans-of-bollywood-convert-if-you-love-your-wives-4882703-NOR.html)