आमच्या मॅडम येत्या २०-२५ दिवसात खुशखबर देणार आहेत.तत्पूर्वी साधारण ४ महिन्याआधी आमचे कार्यकारी संपादक शेखर पाटील यांच्यासोबत एक दिवस वैद्यकीय विषयावर चर्चा सुरु असतांना त्यांनी स्टेमसेलविषयी माहिती दिली.कुतूहलाने नेटवरून माहिती मिळवू लागलो.दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या प्रतिनिधीनी माहिती दिली.चकित झालो राव ! सर्व ऐकून; आणि मग ठरविले, आपल्या बाळाच्या भविष्याच्यादृष्टीने आपण स्टेमसेल प्रिझर्व केलेच पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनांनी अनेक आजारांवर विजय मिळविला आहे.निसर्गाला आव्हान देणारे लिंग बदलदेखील आज बघावयास मिळत आहे. वैद्यकीय क्षेत्रात एवढी प्रगती केली असली तरी,आजही मानवाला अनेक असाध्य आजारामुळे मृत्यूला सामोरे जावे लागते हेदेखील तेवढेच खरे आहे.परंतु आता स्टेम सेल थेरपी असाध्य आजारांनी ग्रस्त असणार्या रुग्णांसाठी आशेचा एक नवीन किरण घेऊन आली आहे.विशेष म्हणजे भारतात अनेक वर्षापूर्वी ही उपचार पद्धती अस्तित्वात होती.प्रसूतीनंतर मातेची नाळ फेकून न देता ती जमिनीखाली किवा घरात एका चांगल्या कापडात दाबून ठेवयाचे आणि गरजेच्या वेळी वैद्याच्या सल्ल्यानुसार बाळाला किवा मातेला ती नाळ चाटवली जायची.
स्टेम सेल थेरेपी म्हणजे काय ?
स्टेम सेल म्हणजे शरीरातील मुळ पेशी, या पेशी कुठल्याही प्रकारच्या नवीन पेशी निर्माण करण्यास सक्षम असतात. ज्या पेशीच्या अभावी रुग्णाला असाध्य आजार जडलेला असतो. त्या रुग्णाच्या शरीरातील रक्त प्रवाहात किंवा शरीराच्या कुठल्याही भागात स्टेम सेल म्हणजे मुळ पेशीचे प्रत्यारोपण करता येते. या उपचार पध्दतीला स्टेम सेल थेरेपी म्हणतात.
कुठून मिळतात स्टेम सेल
स्टेम सेलप्राप्तीचे तीन स्त्रोत आहेत. १) प्रसुतीवेळी मातेच्या गर्भ नाळेेतून २) गभार्ंत मयत झालेल्या भ्रृणाच्या रक्तातून (भ्रृण स्टेम सेल) ३) रक्त किंवा
अस्थिमज्जा (बोनमैरो) .यातील पहिला आणि सर्वात चांगला प्राप्तीचा स्त्रोत म्हणजे मातेच्या गर्भ नाळेतील निघणारे रक्त होय.
स्टेम सेल कुठे आणि कसे सांभाळले जातात
गर्भनाळेतून रक्त घेतल्यानंतर त्याला ब्लड बँकेमध्ये शुध्द करून १९० ऋण (मायनस) तापमानावर ठेवले जाते. या पध्दतीने स्टेम सेल साधारण ५०० वर्षापर्यंत सांभाळले जाऊ शकतात. सध्याच्या परिस्थितीत भारतात लाइफसेल,क्रायोबँकस, बायोरिलायन्स, कॉर्डकेअर इंडिया अशा अनेक कंपन्या स्टेम सेल प्रिझर्व (सुरक्षित ठेवणे) करण्याचे व्यावसायिक काम करीत आहे. गुडगाव, चेन्नई आणि दिल्लीत या बॅकेच्या लॅब आहेत. या कंपनीमध्ये कमीत कमी २१ वर्षापासून तर लाइफ टाईम पर्यंत स्टेम सेल सांभाळून ठेवण्याची सुविधा देत आहे. यासाठी ४४ हजार ते साधारण १ लाखापर्यंत खर्च येतो.विशेष म्हणजे मध्यमवर्गीयांचा विचार करता जवळपास सर्वच कंपन्यांनी यासाठी इएमआयने (हप्त्त्याने) हे पैसे फेडण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.बाजारातील सर्वच कंपन्या यासाठी २० लाखांचा विमा देत आहेत.स्टेम सेल प्रिझर्व करतांना कंपनीच्या तांत्रिक चुकीमुळे किवा नैसर्गिक आपत्तीने स्टेम सेल वाया गेल्यास कंपनी ग्राहकाला २० लाखांची नुकसान भरपाई देत असते.याचबरोबर स्टेम सेल आपल्याला आवश्यक त्या ठिकाणी पोहचविण्याची जबाबदारीदेखील संबंधित कंपनीची असते.तसेच रुग्णाच्या उपचारासाठी २० लाखां पर्यंत कंपनी खर्च देतेे.
स्टेम सेलचा कुणा कुणाला फायदा
आतापर्यंत मातेच्या गर्भ नाळेला अनुपयुक्त म्हणून प्रसुतीनंतर कापुन फेकले जात होते परंतु आता हीच गर्भनाळ भविष्यातील असाध्य आजारावर उपयुक्त ठरत आहे. स्टेम सेल रक्ताच्या नात्यांतील आई, वडील, भाऊ, बहीण यांना उपयुक्त ठरतात. अनेक वेळा रक्ताच्या नात्यातील नसलेल्या रुग्णांनादेखील स्टेम सेल जुळवून (मॅच करून) देणे शक्य आहे.
मागील अनेक वर्षापासून कर्करोगासारख्या आजाराने ग्रस्त असलेले अनेक रुग्ण या उपचार पद्धतीने बरे झाले आहेत. भारतातील याचे एक मोठे उदाहरण द्यायचे तर डॉ.वेनु गोपाल यांनी एम्स रुग्णालयात एका रुग्णांच्या बोनमैरामधील स्टेम सेलने कृत्रिम पेशी तयार करून ह्रदयाच्या क्षतीग्रस्त पेशी बदलवून उपचार केले होते.अभिनेत्री लीजा रेचा कर्करोगदेखील याच पध्दतीने बरा झाल्याचे समोर आले आहे. स्टेम सेल कर्करोग वगळता अनेक आजारामध्ये उपयुक्त ठरू लागल्याचे समोर आल्यानंतर जगासह भारतात या थेरेपीला लोकमान्यता हळुहळू मिळायला सुरूवात झाली आहे. ज्या रुग्णावर सध्या सर्वोच्च उपचार करूनदेखील यश मिळालेले नाही, त्यांच्यावरदेखील ऑटोलोगस सेल(स्वंत:च्या शरीरातून प्राप्त केलेल्या मुळ पेशी) प्रत्यारोपणाने उपचार होत आहे. स्टेम सेल थेरेपी ज्यावेळी समोर आली. त्यावेळी या उपचार पध्दतीच्या विश्वासार्हतेवर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांमध्ये मतभेद झाले. परंतु ही उपचार पध्दती यशस्वी ठरू लागली, तसतसे हे मतभेद कमी झाले. सध्याच्या काळात असाध्य आजारामधील स्टेम सेल उपचार पध्दत सर्वात चांगली उपचार पध्दती आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.जगातील सर्व मोठ्या वेैद्यकीय संस्थांमध्ये स्टेम सेल उपचार पध्दतीने रुग्णावर मोठ्या प्रमाणात उपचार सुरू असल्याचे सध्या पाहावयास मिळत आहे. जगात जवळपास ७५ पेक्षा अधिक असाध्य आजारांमध्ये स्टेम सेल उपयुक्त ठरल्याचे सिध्द झाले आहे. केस, दात देखील या उपचार पध्दतीने उगवले जाऊ शकतात. स्टेम सेल उपचार पध्दतीने स्पॉनल कॉर्ड इंज्युरी (कायम स्वरुपीचे अपंगत्व), जैविक असाध्य आजार, अणुवांशिक आजार कायमचे बरे होऊ शकतात. स्टेम सेल उपचार पध्दतीने अनेक कायमस्वरुपीे अपंगत्वाने ग्रस्त रुग्णांची प्राकृतिक सुधारणेत स्टेम सेल उपचार पध्दतीने प्रगती होते. मस्कुलर डिस्ट्रॉफी(मांस पेशीचा आजार) हा आजार रुग्णांच्या अपंगत्वाचे कारण बनतोे तसेच हा आजार कधीकधी जिवघेणा ठरत असतो परंतु स्टेम सेल उपचार पध्दतीने या आजारामुळे मृत्यू पावणार्याची संख्या तब्बल ८० टक्क्यांनी घसरली आहे. लहान मुलांमध्ये सेरेब्रल पाल्सी (ऑक्सिजनच्या कमतरतेने मेंदूत तयार झालेला विकार) या आजारामुळे लहान मुलांचीबोलण्याची आणि समजण्याची क्षमता कमी होते.अशा आजारातदेखील आटोलोगस बोन मैरो ट्रान्सप्लाटेशनने चांगले परीणाम समोर आले आहे. साधारण दोन वर्षाच्या काळात ५० टक्के पर्यंत सुधारणा झाल्याचे समोर आले आहे. वातावरणातील वाढते प्रदुषण, धुम्रपानमुळे झालेल्या लंग डीसिजेज(फुंफ्फुसांचे आजार) मध्ये देखील साधारण वर्षभराच्या उपचार पध्दतीतच रुग्णांत सुधारणा पाहावयास मिळाली आहे. कर्करोगाच्या ज्या रुग्णांवर किमोथेरेपी आणि रेडिओथेरेपी अयशस्वी झालेल्या आहेत त्या रुग्णांवर टी सेल्स (हे स्टेम सेल नाहीत) ने कर्करोगावर नियंत्रण ठेवता येते.
मी माझ्यावर ट्रीटमेंट घेईन तेव्हा मी comment देईन
कारण मला muscul destrophy रोग आहे