जिंदगी जिंदाबाद
    No Result
    View All Result
    No Result
    View All Result
    जिंदगी जिंदाबाद
    No Result
    View All Result

    सिनेमात महिलांच्या लैंगिक सुखावर भाष्य केले तर चुकले कुठे?

    admin by admin
    August 5, 2018
    in Uncategorized
    0
    सिनेमात महिलांच्या लैंगिक सुखावर भाष्य केले तर चुकले कुठे?


    आपण फक्त नावाला 21 व्या शतकात पोहोचलोय. कारण आपल्या देशातील पुरुषप्रधान संस्कृती आजतागायत कायम आहे. या संकृतीत स्त्रीयांचे अनेक मुलभूत हक्क अजूनही नाकारले जातात. खास करून ‘सेक्स’ हा विषय तर समानतेच्या जवळपास देखील नसतो. नुकतीच प्रदर्शित झालेली वेबसिरीज ‘लस्ट स्टोरीज’ आणि श्वेता भास्करचा ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटात नाईका हस्तमैथुन करतांनाचे दृश्य दाखविल्यावरून बराच वाद झाला. नेहमी प्रमाणे संस्कृती, नैतिकतेचा ढोल वाजवून बरीच टीका देखील करण्यात आली. परंतु लैंगिक सुखाशी संबंधित असणाऱ्या गोष्टींवर मोकळेपणाने न बोलण्याची कुप्रथा आपला समाज कधी मोडीत काढणार आहे? भारताच्या आधुनिक समाजरचनेत आपल्याला अशा विषयांवर उघड चर्चा करावीच लागणाय. म्हणून भारतीय सिनेमात लैंगिक सुखाशी संबंधित खास करून महिलांच्या ‘लैंगिक सुख’सारख्या विषयावर भाष्य केले तर चुकले कुठे? या आधीही ‘ऑफ बीट’ विषयांवर अनेक भारतीय सिनेमातून सटीक भाष्य करण्यात आलेच आहे.

     

    आपल्या भारतीय सिनेसृष्टीने अनेक वेगळ्या विषयांवर चित्रपट तयार केले आहेत. त्यात अगदी कामसूत्रपासून तर समलैंगिक संबंधापर्यंतच्या विषयांचा समावेश आहे. कामसूत्र,फायर,ऊप्स, ‘गाॅड,सेक्स अ‍ॅण्ड ट्रुथ ‘ आणि ‘लिपिस्टिक अंडर माय बुरखा’ सारख्या सिनेमांनी तर आपापल्या काळात प्रचंड चर्चा घडवून आणली होती. वेब सिरीज या प्रकारात देखील अशा विषयांवर परखड किंवा व्यंगात्मकरित्या भाष्य करण्यात आलेले आहे. त्यात खास करून ‘लेडीज रूम’ आणि ‘सेक्स चॅट विथ पप्पू अ‍ॅण्ड पापा’ आणि ‘वर्जिन वूमन डायरीज’ यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

     

    कामसूत्र या विषयावर अनेक चित्रपट आले आहेत. अगदी अलीकडच्या काळात देखील अभिनेत्री शर्लीन चोप्रा आणि दिग्दर्शक रुपेश पॉल यांनी कामसूत्र -थ्रीडीच्या माध्यमातून कामसूत्र हा विषय आपल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. १९९६ साली प्रदर्शित झालेला फायर या चित्रपटाने तर भारतीय समाजात फार उलथापालथ करून टाकली होती. दिग्दर्शन दीपा मेहता आणि अभिनेत्री शबाना आझमी व नंदिता दास यांनी ह्या चित्रपटाद्वारे महिलांचे समलैंगिक संबंध हा वादग्रस्त विषय भारतीय सिनेमामध्ये प्रथमच हाताळला होता. त्यामुळे या चित्रपटाला विरोध होणे देखील स्वाभाविक होते. शिवसेनेने ह्या चित्रपटाविरुद्ध मुंबईसह इतर शहरांमध्ये मोठे आंदोलन करत तोडफोडही केली होती. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी ह्यांनी शिवसेनेच्या कृत्याचे समर्थन करीत भारतीय संस्कृतीमध्ये अशा चित्रपटाला जागा नसल्याचे म्हटले होते. अखेर न्यायालयीन प्रक्रीयेनंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

     

    आशिकी आणि खिलाडी फेम अभिनेता दीपक तिजोरीने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केल्यावर २००३मध्ये पुरुष वैश्या व्यवसायसारख्या नवीन आणि संवेदनशील विषयावर परखड भाष्य केले होते. अर्थात या चित्रपटावरून देखील अनेक वाद झाले होते. अशा वेगळ्या धाटणीचे सिनेमे बघायला जाणे, म्हणजे त्या काळातील प्रेक्षकांना देखील नैतिकतेच्या विरुद्ध वाटत होते. म्हणून तर चित्रपट सपशेल आपटला होता. एखादं तरुणी वैश्या व्यवसायात गुरफटत केल्याचे कथानक असलेले अनेक चित्रपट आपण बघितले असतील. परंतु एखादं तरुण वैश्या व्यवसायात कसा गुरफटत जातो,याबाबतचे कथानक दोन मित्रांच्या माध्यमातून या चित्रपटातून दाखविण्यात आले होते. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे पुरुषांप्रमाणे महिला देखील आपल्या लैंगिक सुखासाठी परपुरुषाला पैसे देऊन कामेच्छा तृप्त करून घेतात, हे उघडपणे याठिकाणी दाखविण्यात आले होते.

     

    दिग्दर्शक अलंकृता श्रीवास्तव यांच्या २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘लिपिस्टिक अंडर माय बुरखा’ सिनेमा म्हणजे म्हणजे लैंगिक असमानतेचा बुरखा फाडतो. एवढेच नव्हे तर स्त्रीयांवर लादण्यात आलेल्या विविध बंधनावरही भाष्य करतो. तारुण्याच्या उंबरठ्यावर आणि भर तारुण्यात असणारी पोरगी तसेच वयाची पन्नासी ओलांडले असल्यानंतरही शरीर सुखाला आसुसलेली वृद्ध महिला. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यात असणाऱ्या महिलेच्या भावना या चित्रपटातून अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत. वयाच्या विविध टप्प्यात असलेल्या प्रत्येक स्त्रीचे प्रश्न व तिच्या गरजा कशा सारख्या असतात. प्रत्येक टप्प्यावर ती स्वतः सह समाजाशी कशी झगडत असते, हे या चित्रपटातून दाखविण्यात आले आहे.

     

    आपल्या देशात वेगळ्या विषयांवरील चित्रपटांबाबत होणारे वाद नवीन नाहीत. प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांचा जीएसटी (God, Sex and Truth) अर्थात ‘गाॅड,सेक्स अ‍ॅण्ड ट्रुथ ‘ या सिनेमाच्या नाव आणि दृश्यांवरून मोठे वादंग निर्माण झाले होते. या चित्रपटाबाबत वर्मा म्हणतात, ‘देवाला अभिप्रेत असणारा सेक्सचा अर्थ’ या चित्रपटात आपण उलगडून दाखवला तसेच वर्षानुवर्षं दडपलेल्या स्त्रीच्या लैंगिक आकाक्षांचा हा मुक्त आविष्कार असून एका अर्थाने तो स्त्रीला मुक्त करणारा अनुभव आहे. तर वर्मा महिला सबलीकरण करत नसून, पॉर्नला उत्तेजन देत आहेत. स्त्रियांच्या लैंगिकतेचा आविष्कार म्हणून ते अश्लीतेचे समर्थन करत आहेत. हे असले काही करणे म्हणजे ‘महिलांचा उद्धार’ नाही,असे काही महिला संघटनांचे म्हणणे होते.

     

    वेब सिरीज प्रकारात लेडीज रूम ही सिरीज भारतात खूप लोकप्रिय झाली होती. डिंगो आणि खन्ना या दोन मैत्रिणीची वेगवेगळ्या पद्धतीच्या लेडीज रूममध्ये होणाऱ्या गप्पा त्यातून घडणारे वेगवेगळे किस्से फार गंमतीशीर पद्धतीने दाखविण्यात आले आहेत. याच पद्धतीने ‘सेक्स चॅट विथ पप्पू अ‍ॅण्ड पापा’ आणि ‘वर्जिन वूमन डायरीज’मध्ये देखील व्यंगात्मक पद्धतीने सेक्ससंबंधी विविध मुद्द्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. माझ्यामते तर ‘सेक्स चॅट विथ पप्पू अ‍ॅण्ड पापा’ ही वेब सिरीज तर प्रत्येक पालकांनी बघितलीच पाहिजे. यात एक वडील आपल्या मुलाच्या लैंगिक ज्ञानसंबंधीच्या प्रश्नांवर ज्यापद्धतीने उत्तरे देतो, ते खरचं पाहण्यासारखे आहे. ‘वर्जिन वूमन डायरीज’मध्ये तारुण्यात पदार्पण केलेल्या एका तरुणीची वर्जीनिटी लॉस संबंधीची कहाणी गंमतीशीर पद्धतीने दाखविण्यात आली आहे.ही कहाणी आपल्याला शेवटच्या भागापर्यंत खिळवून ठेवते.

     

    थोडक्यात सांगायचा उद्देश एवढाच की, चित्रपटाला दोष देऊन उपयोग नाही. चित्रपटात समाजाचेच प्रतिबिंब असते. आपलेच प्रतिबिंब बघून जर कुणाला भीती वाटत असेल तर त्यात चित्रपटाचा नव्हे, संबंधित व्यक्तीचा दोष आहे. मुळात सेक्सवरील चर्चा आजही आपल्याला मोकळ्यापद्धतीने का करावीशी वाटत नाही? या दमनामुळेच आपली मुलं लैंगिक ज्ञान मिळविण्यासाठी चुकीच्या मार्गांचा अवलंब करतात. कधीकधी त्यातून विकृती टोकाला जात पाॅर्नअॅडीक्ट बनतात. कधीकधी बलात्कार सारखे अपराधही करून बसतात. आपला भारतीय सिनेमा आता प्रगल्भ होतोय. ज्याला आवडेल त्याने बघा, अन्यथा कुणाला जबरदस्ती थोडीच आहे.

    Tags: jalgaonvijay waghmare journalistभारतीय सिनेमामहिलांचे लैंगिक सुखविजय वाघमारे पत्रकार जळगाव
    Previous Post

    ऑनलाईन देहव्यापारच्या धंद्यात जळगावची बदनामी !

    Next Post

    आठवणींच्या हिंदोळ्यावर… झुलताना !

    Next Post
    आठवणींच्या हिंदोळ्यावर… झुलताना !

    आठवणींच्या हिंदोळ्यावर... झुलताना !

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    No Result
    View All Result

    Recent Posts

    • सोहराबुद्दीन चकमक : रक्तरंजित धुकं !
    • गुजरात फाईल्स : राजकारण्यांचा बेगडी बुरखा फाडणारं पुस्तक !
    • हरेन पांड्या खून प्रकरण : मोदींवर आरोप ते सुप्रीम कोर्टाचा निकाल…!
    • सोहराबुद्दीन बनावट चकमक : अनेक अनुत्तरीत प्रश्नांची मालिका !
    •  ‘अत्त दिप भवं’ ! 

    Recent Comments

    • मनोहर चौधरी on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • Harshal Talele on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • अमोल पाटील on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • Vasudeo Borole on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • पाटील चंद्रशेखर on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !

    Archives

    • November 2019
    • September 2019
    • July 2019
    • June 2019
    • May 2019
    • April 2019
    • February 2019
    • January 2019
    • December 2018
    • November 2018
    • October 2018
    • September 2018
    • August 2018
    • July 2018
    • June 2018
    • May 2018
    • April 2018
    • March 2018
    • February 2018
    • January 2018
    • December 2017
    • November 2017
    • October 2017
    • September 2017
    • April 2017
    • March 2017
    • January 2017
    • December 2016
    • October 2016
    • September 2016
    • August 2016
    • July 2016
    • June 2016
    • May 2016
    • April 2016
    • March 2016
    • February 2016
    • January 2016
    • December 2015
    • November 2015
    • October 2015
    • August 2015
    • July 2015
    • June 2015
    • May 2015
    • April 2015
    • March 2015
    • February 2015
    • January 2015

      © 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

      No Result
      View All Result

        © 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.