साधी सर्दी, खोकल्यावर दोन दिवस झाले गोळ्या घेत आहे,तरी फरक पडत नाही.सध्या लहान मुलांना पटकन आजार जडतात असे आपण नेहमी म्हणत असतो परंतु याचे वैद्यकीय कारण माणसाला चिंतेत टाकणारे आहे.किरकोळ आजारांवर वर्षानुवर्षापासून आपण ऍन्टीबायोटीक सेवन करत असल्यामुळे विषाणूची प्रतिरोधक क्षमता कमालीची वाढली असून आता ऍन्टीबायोटिक औषधींचे मानवी शरीरावर परिणाम करण्याचे प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत घटल्याचे नुकतेच समोर आले आहे.
साध्या आजारांवर नेहमी ऍन्टीबायोटिकचे सेवन केल्यामुळे विषाणूनी आपली प्रतिकार शक्ती कमालीची वाढवून घेतली आहे. त्यामुळे साध्या सर्दी खोकल्यावर देखील आता ऍन्टीबायोटिक औषधी परिणामकारक ठरत नाहीय. यासर्वेक्षणानंतर भारत सरकारने ‘फिक्स डोस कॉम्बीनेशन’ असलेल्या तब्बल ३४४ औषधींवर बंदी घातली आहे. यामुळे मेडीकलवर सहज उपलब्ध होणार्या व्हिक्स ऍक्शन ५००० एक्सट्रा, बॅनेड्रीलसारख्या अनेक चलनातल्या औषधीदेखील बाजारपेठेच्या बाहेर गेल्या आहेत.
विषाणूची अशी वाढली क्षमता
सर्दी, खोकला, फ्ल्यूसारख्या किरकोळ आजारांवर भारतात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ऍन्टीबायोटिक औषधे सहज उपलब्ध आहेत.त्यात फिक्स डोस कॉम्बीनेशन औषधींचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे.मागील कित्येक वर्षापासून या औषधींच्या सेवनामुळे विषाणूंनी आपली प्रतिरोधक शक्ती नैसर्गिकरित्या वाढवायला सुरुवात केली आहे.’फिक्स डोस कॉम्बीनेशन’च्या औषधीमुळे अनेक अनावश्यक आणि अधिक क्षमतेची ऍन्टीबायोटिक ड्रग्स (औषध) आपल्या शरीरात सतत गेल्यामुळे शरीरातील जीवणूच्या त्याविरोधातील शक्ती वाढत जाते.त्यामुळे साध्या ऍन्टीबायोटिक औषधींना ते दाद देत नाहीत.यामुळे बर्याचदा किरकोळ आजार देखील लवकर बरे होत नाहीत.सततच्या अतिसेवनामुळे मानवी शरीराचे डीएनएमध्ये बदल होण्याचा धोका यामुळे असतो.
फिक्स डोस कॉम्बीनेशन म्हणजे काय?
‘फिक्स डोस कॉम्बीनेशन’ म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा अधिक ड्रग्स (औषधी)चे मिश्रण एकत्र करून तयार करण्यात आलेली औषधीला ‘फिक्स डोस कॉम्बीनेशन’ म्हणतात. यात उदा. व्हीक्स ऍक्शन ५०० एक्स्ट्रा अशा औषधीमध्ये पॅरासिटामॉल, फिनाईलफाइल आणि कॅफिन असे तीन ड्रग्स असतात.’फिक्स डोस कॉम्बीनेशन’च्या औषधीमुळे शरीरात अनावश्यक ड्रग्स जात असतात.यामुळे शरीरातील अंतर्गत अवयवांवर गंभीर परिणाम होतात. सततच्या सेवनामुळे यातील एखाद अंग निकामी देखील होवू शकतो.त्यामुळेच केंद्रसरकारने फिक्स डोस कॉम्बीनेशन असलेल्या ३४४ प्रकारच्या औषधींवर १० मार्च २०१६ रोजी बंदी घातली आहे.भविष्यात याप्रकारात मोडणार्या साधारण ५०० औषधींवर बंदीचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. सध्या केंद्रसरकारच्या निर्णयाविरोधात औषध कंपनी न्यायालयात गेले असून त्यांना तात्पूरता दिलासा मिळाला आहे.
ऍन्टीबायोटिक म्हणजे काय?
ऍन्टी म्हणजे असे औषध जे शरीरासाठी घातक असणाऱ्या विषाणूची वाढ खुटवते किंवा मारून टाकते.ऍन्टी म्हणजे प्रतिरोधक आणि बायो म्हणजे जीवन ऍन्टीबायोटिक म्हणजे विषाणूंना विरोध करणारी औषध. साधारण १९२८ मध्ये स्कॉटलॅन्डचे शास्त्रज्ञ ऍलेक्झाडर फ्लेमिगने ‘पेन्सिलीन’नामक ऍन्टीबायोटिक औषधीचा शोध लावला.यामुळे मानवी शरीरातील घातक विषाणूचे संक्रमण आटोक्यात आले.त्यानंतर अनेक ऍन्टीबायोटिक औषधी बाजारात आल्या.अनेक वर्षापासून सतत ऍन्टीबायोटिकचे सेवन केल्यामुळे भारतातील अनेक लोकांच्या शरीरात ऍन्टीबायोटिकने परिणाम करणे बंद केल्याचे समोर आले आहे.
सर्वेक्षणात समोर आलेले धक्कादायक निष्कर्ष
२०१४ ते २०१५ दरम्यान दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात साधारण २५० रुग्णावर संशोधन करण्यात आले. यातील ७० टक्के लोकांच्या शरीरात ऍन्टीबायोटिकने परिणाम करणे बंद केले होते. २०१४ ते २०१५ दरम्यान दिल्लीच्या एम्स रुग्णालयात केलेल्या सर्वेक्षणात डॉक्टर नियमाप्रमाणे ऍन्टीबायोटिक औषध देण्याआधी व दिल्यानंतर रुग्णांची योग्यरित्या तपासणी करत नाही. डब्ल्यूएचओ अर्थात जागतीक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार भारतातील ५० टक्के लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ऍन्टीबायोटिकचे सेवन करत आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक भारतीय वर्षातून किमान ११ वेळेस ऍन्टीबायोटिकचे सेवन करत असल्याचे देखील समोर आले आहे.२०१४ मध्ये केंद्र सरकारने ‘फिक्स डोस कॉम्बीनेशन’च्या प्रकारात मोडणार्या ६ हजार औषधीसाठी एक विशेष तज्ञ समिती नेमली होती.यासमितीने आपल्या अहवालात ३४४ प्रकारच्या औषधीवर बंदीची शिफारस केली होती.यातील काही औषधी रुग्णाच्या उपयोगाच्या नव्हत्या तसेच रुग्णांची प्रतीकार शक्ती कमी करत असल्याचे समितीला आपल्या चौकशीत आढळून आले होते. त्यामुळे केंद्रसरकारने ड्रग्स ऍन्ड कॉस्मेटीक ऍक्ट १९४० चे कलम २६ अ नुसार या ३४४ औषधींवर १० मार्च २०१६ रोजी बंदी घातली. बंदी कायम राहिल्यास अर्थव्यवस्थेला साधारण वर्षाकाठी दहा हजार कोटीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.