कल्पनाशक्तीच्या पलीकडे मानवी स्वभावाची दाखवलेली विकृती तसेच जागतिक सिनेमाच्या इतिहासातील सर्वात क्रूर सिनेमा म्हणून ‘सलो ओर १२० डेज ऑफ सदोम’ कुख्यात आहे.हा सिनेमा पाहतांना मेंदू काम करणे बंद करतो.अशा पद्धतीची कलाकृती याआधी कधीही बघितलेली नव्हती अशीच प्रतिक्रिया आपली चित्रपट बघितल्यानंतरची असते.दुसऱ्या व्यक्तीचा शारीरिक छळ, खास करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आनंद वाटण्याची मानसिक विकृती या सिनेमात बघावयास मिळते.हा चित्रपट 22 नोव्हेंबर 1975 रोजी प्रदर्शित झाल्यानंतर बहुतांश देशात प्रतिबंधित करण्यात आला होता.मारक्युस डी सडे (इटली) या लेखकाने लिहिलेले ‘सलो ओर १२० डेज ऑफ सदोम’या पुस्तकावरून हा सिनेमा बनविण्यात आला होता.फ्रेंच भाषेत आहे तसेच खाली सबटायटल नसल्यामुळे चित्रपट समजण्यास थोडा अवघड जातो.मात्र कथानक हळू-हळू पुढे सरकत असतांना आपण त्यात सहज गुंततो.दुसरे महायुद्ध सुरु असतांनाच्या काळातील सिनेमाचे कथानक आहे.चार धनाढय विकृत व्यक्ती आपल्या सैनिकांच्या सहाय्याने नऊ अल्पवयीन तरुण आणि तरुणींचे अपहरण करून त्यांना सलग १२० दिवस दिलेला लैंगिक,शारीरिक आणि मानसिक छळ या सिनेमात दाखविण्यात आला आहे. या चित्रपटात तीन घाणेरडी वर्तुळे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातात.त्यात उन्माद,मानवी मैला आणि रक्तरंजित मृत्यूचा समावेश असतो.
या सिनेमातील प्रमुख पात्र दि डूके,दि प्रेसिडेंट,बीशॉप आणि दि मॅगीस्ट्रेट यांच्या अवतीभवती चित्रपटाची कथा फिरते.यातील डूके हा बायोसेक्शुल तर प्रेसिडेंट व बीशॉप हे दोघे होमोसेक्शुल असून त्यांचा तिसरा मित्र मॅगीस्ट्रेट हा देखील कमी अधिक त्याच विकृतीत मोडणारा व्यक्ती असतो.एका बंगल्यात हे चौघे चार तरुण सैनिकांना नौकरीवर ठेवून त्यांच्या सहकार्याने नऊ अल्पवयीन तरुण-तरुणींचे अपहरण करतात.त्याआधी हे चौघे वेश्यांगमनाच्या बहाण्याने चार वेश्या देखील आपल्यासोबत या घाणेरड्या खेळात सामील करून घेतात.त्यानंतर सुरु होतो अपहृत तरुणीं आणि तरुणांचा छळ. डूके,प्रेसिडेंट,बीशॉप आणि मॅगीस्ट्रेट तीन घाणेरडी वर्तूळ आखतात.प्रत्येक वर्तुळ सुरु होण्याआधी चौघांपैकी एक वेश्या अपहृत मुलांना आपल्या जीवनातील एक सत्य कथा सांगत असते.पहिल्या वर्तुळात अपहृत मुलांसाठी एक मेजवानी दिली जाते.त्यात काही मुली नग्न अवस्थेत त्यांना जेवण वाढत असतांनाच एक सैनिक तिच्यावर सर्वांसमक्ष बलात्कार करतो.याचवेळी ,प्रेसिडेंट हा त्याच सैनिकास त्याच्या सोबत सर्वांसमोर शरीर संबंध ठेवतो.त्यावेळी अपहृत मुलांना कळते की प्रेसिडेंट हा होमोसेक्शुल आहे.काही वेळाने अपहृत मुलींना पुरुषांचे हस्तमैथुन कसे करावे याबाबत विचारणा करून प्रात्यक्षिक दाखवीत मानसिक छळाची सुरुवात केली जाते.त्यांनतर अपहृत मुलांपैकी एका तरुण-तरुणीचे लग्न लावले जाते.यावेळी इतर मुला-मुलींना नग्न अवस्थेत त्याठिकाणी आणलेले असते.त्यावेळी डूके हा त्या सर्वां सोबत अश्लील चाळे करायला सुरुवात करतो.यावरून तो बायोसेक्सुल असल्याचे सर्वांच्या लक्षात येते.परंतु सगळीजण भेदरलेली असतात.त्यामुळे कोणीही त्यांना विरोध करू शकत नाही.लग्न लागल्यानंतर डूके,प्रेसिडेंट,बीशॉप आणि मॅगीस्ट्रेट हे त्या जोडप्याला त्यांच्या समोरच शरीर संबंध करायला सांगतात,परंतु संपूर्ण संबंध करण्याची त्यांच्यावर बंदी असते.त्या जोडप्याला मध्येच रोखत डूके तरुणीवर बलात्कार करतो तर प्रेसिडेंट हा तरुणाचे लैंगिक शोषण करतो लैंगिक शोषण नव्हे एक प्रकारे बलात्कारच करत असतांनाच मॅगीस्ट्रेट हा प्रेसिडेंट व स्वत:ला लैंगिक सुख देतो.हे दृष्य या चित्रपटातील लैंगिक विकृती दर्शविते.यानंतर सर्व अपहृत मुला-मुलींना नग्न करून त्यांच्या गळ्यात कुत्र्यांसारखी साखळी बांधली जाते.सर्वाना संपूर्ण बंगल्यात कुत्र्यांसारखे फिरवले जाते. अगदी जेवण देखील त्यांना कुत्र्यांप्रमानेच करावयास भाग पाडले जाते.यावेळी मगीस्ट्रेट एका मुलीच्या जेवण्याच्या गोळ्यात खिळे टाकत तिला खाण्यास सांगतो,हे दृष्य बघतांना अंगावर अक्षरश शहारे येतात.
थोडया वेळानंतर चित्रपटातील सर्वात घाणरडे आणि किळसवाने वर्तुळ सुरु होते.या वर्तुळात अपहृत मुला-मुलींना मानवी मैला खाण्यास भाग पाडले जाते.एक अपहृत तरुणी डूके,प्रेसिडेंट,बीशॉप आणि मॅगीस्ट्रेट यांच्या गोष्टी मान्य करण्यास नकार देते.त्यानंतर डूके तिला त्याचा मैला खाण्यास भाग पाडतो.हे दृष्य आपण बघूच शकत नाही,यावेळी कळत-नकळत आपले डोळे बंद होतात.हा किळसवाणा प्रकार याच ठिकाणी थांबत नाही तर प्रेसिडेंट हा प्रत्येक मुलाने त्यांचा मैला खाल्ला की नाही याची तपासणी त्यांच्या खोलीत जावून करतो.एवढेच नव्हे तर जेवणाच्या वेळी डूके,प्रेसिडेंट,बीशॉप आणि मॅगीस्ट्रेट हे देखील त्यांच्यासोबत हा मैला खातात,यावरून त्यांची विकृती लक्षात येते.
यानंतर चित्रपटातील शेवटचे आणि सर्वात भयावह वर्तुळ ‘क्रॉसड्रेस कोडींग’ने सुरु होते.डूके,प्रेसिडेंट,बीशॉप आणि मॅगीस्ट्रेट हे मुलींचे कपडे घालतात आणि त्यानंतर चार मुलांसोबत विवाह करतात.अर्थात हे चौघं ट्रान्सवेस्टिव्ह म्हणजेच विरुध्द लिंगी व्यक्तीचे कपडे अंगावर घालण्याची विकृत इच्छा असणारी व्यक्ती असल्याचे दिसते.यानंतर बीशॉप हा एका तरुणासोबत शरीर संबंध प्रस्थापित करून परतत असतांना सर्व अपहृत मुले-मुली व्यवस्थित झोपले आहेत की नाही हे पाहण्यासाठी खोलीत जातो.याचवेळी त्याला दोन तरुणी एकमेकासोबत दिसतात.बीशॉप दुसऱ्या एका तरुणीला साक्षीदार ठेवत डूके,प्रेसिडेंट आणि मगीस्ट्रेट तिघांना बोलवून आणतो.खोलीत परतल्या नंतर त्याठिकाणी त्यांना एक तरुणी आणि तरुण शरीर संबंध करत असल्याचे आढळतात.हे बघून चौघांचे माथे भडकतात आणि ते दोघांना गोळ्या घालून ठार मारतात.या चौघांनी सर्वाना एकमेकाला शरीर सुख न देण्याची सक्त सूचना केलेली असते.त्यानंतर देखील हे जोडपे एकत्र येते त्यामुळे चौघांची विकृती अधिकची वाढते आणि त्यानंतर सुरु होते प्रत्येक अपहृत मुला-मुलीच्या मृत्यू सोबतचा खेळ.सर्वात आधी प्रेसिडेंट हा एका अपहृत तरुणाचे लिंग मेणबत्तीच्या सहाय्याने जाळतो.तर एका तरुणींचे स्तनही त्याच पद्धतीने जाळत छळतो.त्यानंतर टप्प्याटप्प्याने डूके, प्रेसिडेंट,बीशॉप आणि मॅगीस्ट्रेट हे देखील वेगवेगळ्या पद्धतीने तरुणांना मृत्युच्या हवाली करतात.यात एका तरुणीवर पाशवी पद्धतीने बलात्कार करून तिला लगेच फासावर लटकावले जाते.अनेक तरुण-तरुणींवर अशाच पद्धतीने पाशवी बलात्कार होतो.एका तरुणाचा डोळा चाकूने बाहेर काढला जातो तर दुसऱ्याची निर्दयीपणे जीभ कापली जाते.एका तरुणीचे केस थेट डोक्याच्या कातडीसह कापले जात.ही सर्व दृष्य बघतांना माणूस थरथरायला लागतो.हे सर्व होत असतांना डूके,प्रेसिडेंट,बीशॉप आणि मॅगीस्ट्रेट हे विकृत आनंद लुटत असतात.
चित्रपट संपल्यानंतर हा चित्रपट उगाचच पहिला असाच प्रश्न आपण स्वतःला विचारतो.कारण चित्रपट संपल्यानंतर बराच वेळ थरकाप उडविणारे अनेक दृष्य आपल्या डोळ्यासमोर फिरतात.जगात अशा पद्धतीची विकृत माणसं असतात.यावर खरं तर आपला विश्वास बसत नाही.’सलो ओर १२० डेज ऑफ सदोम’ या चित्रपटाविषयी विविध देशातील चित्रपट समीक्षकांनी आपापली मते नोंदवली आहेत.पिअर पाओलो पासोलिनी यांचे दिग्दर्शन अप्रतिम असेच आहे.त्यांनी प्रत्येक दृषावर घेतलेली मेहनत आपल्याला चित्रपट बघत असतांना वेळोवेळी जाणवत राहते.जवळपास सर्वच कलाकारांचा अभिनय भन्नाट आहे.खास करून पाओलो बोनासेलीनी निभावलेला डूके आणि अल्डो वालेटीने साकारलेला प्रेसिडेंट आपल्याला शिव्या घालायला मजबूर करतात.चित्रपटाची सिनेमाट्रोग्राफी कमालीची आहे. गुगल सर्च केल्यानंतर लक्षात येते की,या चित्रपटा विषयी अनेकांनी चांगले वाईट असं भरभरून लिहिले आहे.जगातील सर्वात क्रूर आणि मनाचा थरकाप उडविणाऱ्या सिनेमामध्ये या चित्रपटाचे नाव अग्रस्थानी आहे.अर्थात मी तुम्हाला हा चित्रपट बघण्याचा सल्ला मुळीच देणार नाही,मात्र बघायचाच असल्यास तुमची मर्जी !