नाशिक मधील अण्णा हिरमिरे यांनी महाराष्ट्रातील एका अश्या गोष्टी विरोधात बंड पुकारले आहे कि, ज्या विरुद्ध भल्या भल्यांची बोलण्याची हिम्मत होत नाही. पुरोगामी म्हटल्या जाणरया या महाराष्ट्रात जाती व्यवस्था किती टोका पर्यंत घर करून आहे त्याचे हे उदाहरण आहे “जात पंचायत” कोणी किती हि मोठ्या गप्पा मारल्या तरी प्रत्येक शहरात,गावात बहुतांश जातीच्या अश्या पंचायती कार्यरत आहेत हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही
विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी हि आपल्या मतदार संघातील वेगवेगळ्या जातीच्या पंच मंडळाचे सभागृह आपल्या निधीतून बांधून देत,त्या पंच मंडळाची बढाई मारताना दिसतात .एक निर्लज्ज तर टीव्हीवर येत काल बहिष्कार सारख्या “थर्ड क्लास” विषयावर आपल्या जात पंचायतची बाजू माडत होता. या प्रकरणाची विदारकता मी समजू शकतो कारण मी स्वतः आंतर जातीय विवाह केला आहे. सर्वच जातीबद्दल मी बोलत नहिए काही चांगले उदहरण देखील आहेत. माझा विवाह ग्रामीण भागातील आणि ते ही बहुसंखेने असलेल्या “लेवा-पाटीदार” समाजातील मुलीशी झाला आहे मला सांगताना खरच अभिमान वाटतो माझ्या पत्नीच्या (काही सोडले) तर सर्व नातेवाईकानी मला फार सहजते ने स्वीकारले आहे. विशेष म्हणजे भारतातील “खाप जात पंचायत” नंतर न्यायालायाची मान्यता असलेल्या “भोरगाव लेवा पंचायत” ज्या जळगावात आहे त्या जिल्ह्यात माझा हा विवाह झाला आहे. पण आज पर्यंत माझ्या सासरकडील मंडळीना कुठलाही त्रास कोणा कडून झाला नाही. एवढेच काय तर मी काम करतो ती संस्था देखील “लेवा”जातीच्या माणसाची असून माझे वरिष्ठ,सहकारी हे लेवाच आहेत.पण त्यांच्या वागणुकीतून मला कधीही जातीयेचा भास देखील झाला नाही. माझे उदाहरण आहे म्हणून नाही पण काल नाशिक मधील प्रकार पाहून आणि मी सांगितलेली कहाणी ऐकुन तुम्हाला कळले असेल कि,सर्वच जातीची लोक किवा त्यांच्या पंचायती या वाईट नसतात.