आज खूप कंटाळा आला आहे मनच लागत नाहीए कुठे एका कार्यक्रमाला हजेरी लावल्या नंतर
जरा राष्ट्रीय कार्यक्रमाला बसायचा विचार करत असून त्यानंतर मस्त पावसात भिजत घरी
जाण्याची इच्छा आहे. पण नेहमी प्रमाणे उद्या साप्ताहिक सुटी असून देखील ऑफीसला यावे
लागणार आहे असो… पण एवढे करूनही मन नाही रमले तर…. ?
अरे एक शेर आठवला माफ करा मध्येच विषयांतर करतो आहे.
“अजनबी थे तो अच्छा था ! अजनबी थे तो अच्छा था… कम्बखत इस जान-पेहचान ने फासले बढा दिए !”
काही लोक स्वतःला फार “ग्रेट” समजतात त्यांच्या मते जीवन हे त्यांच्या सोयी प्रमाणे केव्हा हि वळण घेऊ शकते किवा ते वळवू शकतात हे एवढे सोपे आणि सहज शक्य राहिले असते तर “गम-ए-जिंदगी किसीके नसीब मे ना होती मेरे भाई ” जीवनात जेवढे समजतो तेवढे स्वार्थी लोक नसतात व्यवस्थित आठवत नाही एक शेर आहे “समजते हो उतनी बुरी नही दुनिया… शायद बच्चो के स्कूल मे तुमसे मिली नही दुनिया ! “
चला रजा घेतो… सोबत राष्ट्रीय कार्यक्रमाला यायचे असेल तर या !