काल रात्री नेहमी प्रमाणे फेसबुक खेळत असताना.अचानक एक स्टेटस अपडेट झाले.कि,सभ्यतेच्या मर्यादा ओलांडून कुणीही comment देऊ नये…थोडा विचारात पडलो..सभ्यतेला खरच मर्यादा असतात का हो ?
सभ्यतेचे शब्द म्हणजे काय ? शब्द कधी सभ्य किवा असभ्य असूच शकत नाही.. कारण त्यांना ती श्रेणी आपण देतो आणि पाहिजे त्या सवर्गात आपल्या हिशोबाने मोडून घेतो….सभ्यता मुळात मर्यादे पलीकडची बाब आहे कारण मर्यादा ह्या विचारणा असतात…शब्दांना नव्हे….भाषेच्या आधारावर आपण शब्दांच्या सभ्यतेचे मुल्यांकन कुठ पर्यंत करणार आहोत …? एक उदाहरण देतो…समजा आपण एक comment दिली “dear it’s superbbbbb ” तर हिच्यात कुणाला हि असभ्य असे काही वाटणार नाही…पण तेच जर मराठीत लिहिले “अरे यार superbbbbbbbbb ” तर लगेच हि comment काहींच्या मते सभ्यतेच्या मर्यादा ओलांडनारी असेल.. असे का ? भाषेच्या आधारावर आपण शब्दांच्या सभ्यतेचे मुल्यांकन कसे करू शकतो…? माझ्या मते शब्दांना सभ्य किवा असभ्यतेच्या वर्गात मोडण्या आधी त्यांच्या मागील भावना समजून घेणे अधिक गरजेचे आहे….!