भारत देश हा शेतमजूर अंगमेहनत करणाऱ्यांचा देश आहे.त्यामुळे बहुतांश वर्ग आपले शारीरिक श्रम घालवण्यासाठी मद्यपान करतात. पाश्चात्य देशातील लोकांप्रमाणे फ़शन म्हणून दारू रिजवत नाहीत. त्यामुळे तिकडे कितीही भाववाढ झाली तर आपण समजू शकतो. भाजपा नेहमी पाश्चात्य संस्कृतीचे विरोध करणारा पक्ष राहिला आहे.मग ह्या बाबतीत पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण का ? करतेय हे मात्र कोडे आहे. गुजरातमध्ये दारूबंदी केली. दारुड्या समाजाचा आवाज दाबण्यात यशस्वी झाले म्हणून देशात देखील तसेच कराल असे वाटत असेल तर ते कदापी शक्य नाही. जनता रत्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही.
लोकाप्रमाणे महागाई कमी होईल, धनदांडग्या पेक्षा सामान्य नागरिकाला परवडतील या दरात आवश्यक त्या सर्व वस्तू मिळतील या मोठ्या अपेक्षेने भारतातील जनतेने मोदी सरकारला निवडून दिले. त्या जनतेमध्ये सर्वसामन्य नागरिकापासून गृहिणी, मजूर शेतकरीसह देशातील ९० टक्के दारू पिणारा वर्ग देखील होता. मोदि अच्छे दिन आणतील या भंपक अपेक्षेने आणि कॉंग्रेसच्या दरवर्षी दारूच्या भाववाढीला कंटाळत अनेक दारुड्यांनी गाठचे हजारो रुपये खर्च करीत कित्त्येक बाटल्या रिजवीत बार किवा अड्ड्यावरील प्रेमभंग,ऑफिस मधील भांडण ,बायकोचा छळ ,सासू-सासरेचा त्रास ,लग्नानंतर जमलेल्या लफड्याच्या या पारंपारिक विषयावरील गप्पा न मारता सर्वांनी प्रामाणिकपणे ‘अच्छे दिन आने वाले है … हम मोदीजी को लाने वाले है’ चा एकमुखी प्रचार केला. पण झाले काय ? मनमोहन सरकारपणे मोदी सरकारने देखील यंदाच्या अर्थसंकल्पात मद्यावर २० टक्के वाढ कर वाढवून दारुड्या समुदायाचा विश्वासघाट करण्याचा कट रचल्याचे वृत्त असून या विरोधात आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. त्याचीच सुरुवात म्हणून, ज्या सोशल मिडीयाच्या जोरावर मोदी सरकार सत्तेवर आले त्याच सोशल मिडीयाच्या माध्यमातून निधड्या छातीचा बाणेदार कार्यकर्ता लढण्यास समोर आला पाहिजे. तसे भावनिक आवाहन करून सर्व दारुड्या समुदायाला एकत्र येण्याचे आवाहन फेसबुकच्या माध्यमातून केले पाहिजे. या भाववाढीच्या विरोधात फेसबुकवर एकवटत त्यांनी सर्वांचे समर्थन मागितले पाहिजे. भाववाढ झाल्यास हि चळवळ त्यांनी आक्रमक करून प्रत्येक हॉटेल व अड्ड्यासमोर आदोलन करण्याचा ईशारा देखील दिला पाहिजे. त्याच प्रकारे दारुड्यांचा कैवारी अन मद्य महर्षी तयार होणे आता काळाची गरज बनली आहे !