जळगाव जिल्हा पोलीस दलात सध्या पोलिस उपअधिक्षक (गृह) म्हणून कार्यरत असलेले धनंजय रघुनाथ धोपावकर यांना कुटुंबातूनच अध्यात्मिकतेचा वारसा लाभलेला. मालेगाव तालुक्यातील रावळगाव या छोट्याशा गावी जन्माला आलेला हा माणुस अहमदनगर, पुणे,नाशिक, अमरावती आदी ठिकाणी शिकला व एक दिवस थेट लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होत सरळ इन्कम टॅक्स अधिकारी झाला. पण आयुष्यात अचानक एक वळण आले आणि ते पोलीस खात्यात रुजू झाले. कायद्याचा बडगा दाखवत काठी उगारण्यावर त्यांचा कधी विश्वासच बसला नाही. आपण समाजाचे काही देणं लागतो या उदात्त भावनेतून आपल्या वक्तृत्वशैलीच्या जोरावर त्यानी आतापर्यंत विविध विषयांवर तब्बल सात हजार व्याख्याने देत पोलिस दलात एक नविन आदर्श निर्माण केला आहे व त्याचा हा सामाजिक व्रताचा प्रवास २६ वर्षाच्या सेवेनंतर आजही अव्याहतपणे सुरु आहे. व्यसनमुक्ति, अंधश्रध्दा निर्मुलन, स्त्र्री- अत्याचारविषयक जागृती, मानवी अधिकार, जातीय सलोखा, पर्यावण सुरक्षा आदी विविध विषयांवर ते अस्खलितपणे बोलू शकतात. माहितीच्या अधिकाराची कार्यशाळाही ते घेत असतात. एवढेच नव्हे तर इस्लाम धर्म अणि उर्दुचे ते गाढे अभ्यासक आहेत उर्दु भाषेवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व आहे. ते या भाषेत ओघवतेपणाने बोलु शकतात व त्यात कवितादेखील करतात. याचसोबत कवितेचा मुळ भावार्थ न बदलु देता मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषेत एकाच आशयावर ते कविता लिहु शकतात. सदाशिव अमरावपुरकर, स्मिता पाटील व अनिल क्षिरसागर अश्या कसलेल्या अभिनेत्यासोबत नाटकात त्याना काम करण्याचा अनुभव देखिल आहे. त्यांनी आजवर तब्बल ६९ वेळा रक्तदान केले असुन विविध ठिकाणी भाषणातुन तरुणाना रक्तदान करण्यासदर्भात मार्गदर्शन करत असतात. नोकरी व सामजिक कार्य करत असताना आपल्या प्रकृती विषयी ते अत्यंत जागरुक आहेत. ते स्वत: निर्व्यसनी असुन सहकर्यांना देखील याबाबत नेहमी मार्गदर्शन करत असतात. ज्युडो कराटे मध्ये त्यानी नुसता ब्लॅक बेल्ट मिळविला नाही तर त्याचे ते आतरराष्ट्रीय दर्जाचे पंच देखिल झाले आहेत जलगाव जिल्हापरिषदेच्या सीईओ शितल उगले, तहसिलदार उषाराणी देवकरणी, छत्रपती शिवाजी महाराज पुरस्काराने सम्मानित भारताची पहिली महिला कुस्तीपटु अजली देवकर यांच्यासह ३०० विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून शिक्षण घेतले आहे.
रावेरला गणपती उत्सवादरम्यान दंगल उसळल्या नंतर पोलिस अधिकक्षांनी त्यांना खास जातीय सलोख्यावर कॅार्नर मिटिंगा घेण्यासाठी पाठविले होते. त्याच्या व्याख्यानामुळे तेथिल वातावरण निवळण्यास बरिच मदत झाली होती. ‘गोली से नही तो बोली से हो सकता है’ म्हणत त्यानी दंगल नेहमी लाठी,काठी किवा गोळीने नव्हे तर प्रेमाच्या बोलीने देखिल थांबवता येवु शकते हे सिध्द करुन दाखविले आहे.
धोपावकर यांचासेवानिवृत्ती नंतर कथा, कविता संग्रह प्रसिध्द करण्याचा मानस असुन रक्तदानाचा टप्पा १०१च्यावरन्यायचा आहे. त्याच्यातील साहित्यिकास व सामाजिक कार्यकर्त्यास घडविण्या मागे मुबइचे पोलिस आयुक्त डॅा.सत्यपाल सिग, वरिष्ठ पोलिस अधिकारी अरविंद इनामदार, संतोष रस्तोगी, सुबोधकुमार, सी.एच.स्टॅलीन, विदयमान पोलिस अधिक्षक एस.जयकुमार याचे सहकार्य असल्याचे ते विनम्रपणे सांगतात. धनंजय धोपावकर हे एका अर्थाने पोलीस दलातील सामाजिक जाणीवेचा चेहरा आहेत. त्यांचा आदर्श अन्य अधिकारी आणि कर्मचार्यांनी घेतला पाहिजे.
<प्रसिद्ध दिनांक २६ मार्च १२>