मित्रानो….
बरयाच दिवसापासून कोणत्याही विषयावर काहीही लिहिलेले नाही,आणि कोणत्या विषयावर लिहावे अस काही घडलेहि नाही पण ठरवून लिहायचे म्हटले कि जमत नाही बुआ…. उस्फूर्त पणे जे लिहिले गेले तेच लिहिले गेले.राज ठाकरे जळगावला आले तेव्हा त्यांना पत्रकारांनी विचारल्या नंतर त्यांनी हि हेच सांगितले होते कि, “माझे भाषण हे उस्फूर्त असते मी कधीही ठरवून भाषण करत नाही” काय मित्रानो…. काय वाटते तुम्हाला राजकारणी हे ठरवून भाषण करतात कि उस्फूर्तपणे…
मला वाटते कि,राजकारण्याची भाषणे हि बहुतांशवेळी ठरलेलीच असतात.यांचा अनुभव मागील लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मला आला होता. नाव सांगणार नाही त्या नेत्याचे पण एक जबरदस्त वक्ता म्हणून अख्खा महाराष्ट्र त्यांना ओळखतो .त्यांची एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या ठिकाणी सभा ऐकल्या थोडेफार बदल वगळता तिन्ही भाषण हि सारखीच होती अन मग जाणवले कि भाषणा प्रमाणे सभेत होणारे गोंधळ,जोक,झेंडा पकडून उभे दिसणारे आजी-बाबा हे सर्वे नियोजित असते.सध्या आपले राजकारणी टाटा,बिर्ला,अंबानी प्रमाणे कॉर्पोरेट झाले आहेत सर्वे परफेक्ट नियोजनबद्ध… आपल्या महाराष्ट्रातली जनता आजही खूप साधी आणि भावनिक आहे यार ! असो पण राजकारणातील हा कॉर्पोरेटपणा सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे कारण कॉर्पोरेट म्हणजे व्यवहार आणि व्यवहार म्हणजे लागत केलेली गोष्ट दहा पटीने वसूल करणे…. आणि सध्या राजकारणात कश्याची लागत होते ते सांगायची गरज नाही…. बरोबर ना !