आंध्र प्रदेशातील विजयवाडा आणि अहमदनगर येथे मुस्लीम समुदायाने रस्त्यावर उतरत म्यानमार मधील रोहिंग्या मुसलमानांवर अन्याय होत असल्याचे सांगत मोर्चा काढला.जगाच्या नकाशावर म्यानमार हे कुठे आहे,हे मला माहित नाही.परंतु सोशल मिडीयावर रोहिंग्या मुसलमानाना भारतात शरण द्यावा किंवा नाही याबाबत हळू-हळू वातवरण तापत आहे.त्यामुळे ‘म्यानमार आणि रोहिंग्या मुसलमान’ मुद्द्दा समजून गरजेचे ठरते.म्यानमार आणि रोहिंग्या मुसलमान यांच्यातील वाद हा पारंपारिक गंभीर स्वरूपाचा आहे.त्यांच्या वादातील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे,म्यानमार सरकारनुसार रोहिंग्या मुसलमान हे बांगलादेशी प्रवाशी असून आजच्या घडीला त्यांच्या देशात ‘हरकत-अल-यकींन’ या नावाने कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनेत तसेच देशद्रोही कारवायांमध्ये रोहिंग्या मुसलमान सहभागी आहेत.त्यामुळेच म्यानमार सरकार रोहिंग्याना देशात स्थान देऊ इच्छित नसून त्यांना विस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे.
म्यानमारचा इतिहास
आपल्या डोळ्यांसमोर येते ती लहानपणी भूगोलाच्या पुस्तकामध्ये वाचलेली माहिती. ती म्हणजे जगाला तांदूळ पुरवणारे कोठार, वैशिष्टय़पूर्ण शेतकऱ्यांची बांबूची टोपी वैगैरे…‘म्यानमार’ म्हणजे ‘ब्रह्मदेश’. वेदांमध्ये याचा उल्लेख ‘ब्रह्मवर्त’ म्हणजेच ब्रह्मदेवाचे स्थान म्हणून आहे. ‘बर्मा’ हे नाव तेथील आदिम ‘बामर’ जमातीवरून पडले आणि ब्रिटिश कालखंडात रुजू झाले. १९८९ साली बदलून ‘म्यानमार’ झाले. म्यानमारला भारत, बांग्लादेश, चीन, लाओस आणि थायलंड या देशांच्या सीमा आहेत.म्यानमार हा आशिया खंडातील हा सर्वात गरीब देश मनाला जातो. या देशात शंभरेक निरनिराळ्या वंशाच्या जमाती असून बौद्ध धर्मीय सर्वाधिक आहेत. ‘रंगून’ हे म्यानमारमधील सर्वात मोठे शहर असून आता ‘याँगून’ म्हणून प्रसिद्ध आहे. तांत्रिक अकुशलता आणि निरक्षरता यामुळे या निसर्ग-संपन्न देशाचा विकास झाला नाही. म्यानमार हा अफगाणिस्तान नंतरचा दोन नंबरचा अफू पिकवणारा देश आहे.
कोण आहेत रोहिंग्या मुसलमान?
रोहिंग्या मुसलमान हे बौद्धबहुल म्यानमार (बर्मा) येथील अराकान येथे राहणारे अल्पसंख्यांक मुस्लिम लोक आहेत. म्यानमारची बहुसंख्य लोकसंख्या बौद्ध धर्मीय आहे.एका सर्वेक्षणानुसार म्यानमारमध्ये साधारण १० लाख रोहिंग्या मुसलमान राहतात.म्यानमारमध्ये या मुसलीम समुदायाबाबत प्रामुख्याने ते अवैध बांग्लादेशी प्रवासी असल्याचे म्हटले जाते. रोहिंग्या मुसलमान या देशात पूर्वीपासून राहत आहेत पण बर्मा येथील लोक आणि त्यांची सरकार त्यांना आपले नागरिक मानत नाही.वास्तविक हा रोहिंग्यां समुदाय म्यानमारमध्ये अनेक पिढ्यांपासून राहतो.म्यानमार सरकारने त्यांना देशाचे नागरिकत्व देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर त्याठिकाणी वांशिंक हिंसाचार अधिक तीव्र झाला.साधारण म्यानमारमधील रखाइन प्रदेशात 2012 पासून सांप्रदायिक हिंसा सुरु आहे.या हिंसेत आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला असून साधारण एक लाखपेक्षा जास्त नागरिक स्थलांतरित झाले आहेत. रोहिंग्यांनी सर्वात प्रथम म्यानमारच्या शेजारील बांगलादेशमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र बांगलादेशाने त्यांना परवानगी दिली नाही. त्यानंतर ते थायलंड, मलेशिया, इंडोनेशियामध्ये स्थलांतरित झाले. मात्र रोहिंग्याला स्वीकारण्यासाठी याही देशांनी नकार दिला. यानंतर स्थलांतरासाठी लहानशा बोटींवर शेकडो रोहिंग्याना लादून त्यांना दुसऱ्या देशात पोहोचवणाऱ्या तस्करांनी रोहिंग्यांची मोठ्या प्रमाणावर लूट केली. खूप वेळ अन्न पाण्याविना समुद्रातच भटकत राहिल्याने शेकडो रोहिंग्यां मुसलमानांचा मृत्यू झाला होता.
भारतात आश्रय देण्याचा वाद
भारतामध्ये 40 हजार रोहिंग्या शरणार्थी मुसलमान नागरिक रहात असावे अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कमिशनने दिली आहे. यामध्ये शेकडो रोहिंग्या शरणार्थिंना संयुक्त राष्ट्रांकडून ओळखपत्रही मिळाली आहेत. त्यातील ६ हजारापेक्षा जास्त केवळ जम्मू आणि कश्मीर राज्यातील हिंदूबहुल जम्मू भागात राहतात. परंतु ही आकडेवारी दोन वर्षांपूर्वीची आहे. त्यात आजच्या घडीला नक्कीच भर पडलेली असणार.भारताच्या कोर्टात याचिका दाखल करून म्यानमार मधील रोहिंग्या मुस्लिम शरणार्थीना परत पाठवू नये, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.दरम्यान,रोहिंग्या शरणार्थिं मुसलमानांना भारतात राहू द्यावे यावरून दोन गट निर्माण झाले आहेत.कारण पाकिस्तानमधील हजारो हिंदू नागरिकांच्या स्थलांतराचा मुद्द्दा आजही थंड बस्त्यात असतांना रोहिंग्याना लागलीच शरण देण्यावर अनेकांचा आक्षेप आहे.दुसरीकडे सगळ्या परिस्थितीचा फायदा घेत अल-कायदा, इसिस अश दहशतवादी गटांनी रोहिंग्या मुस्लिमानांचा मुद्दा फार मोठ्या प्रमाणात उचलायला सुरुवात केली. रोहिंग्यांना आपल्या ताब्यात घेऊन विविध देशांमध्ये दहशतवादी कारवाया करायला त्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.तिथे हरकत-अल-यकींन या नावाने दहशतवादी कारवाया चालतात. या गटाचे लष्कर ए तय्यबा, जैशे मोहोम्मद या गटांशी असणारे संबंध असल्याचे सांगितले जाते.विविध प्रकारच्या, मादक पदार्थांच्या, शस्त्रे इत्यादींच्या तस्कऱ्या, दहशतवादी हल्ले, असल्या कारवायांमध्ये त्यांचा हात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.त्यामुळेच म्यानमार सरकार रोहिंग्याना विस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे.भारतात आजच्या घडीला अनेक दहशतवादी संघटनाच्या रक्तरंजित कारवाया सुरु असतांना म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमाना आश्रय देणे संयुक्तिक ठरेल का? असा सवाल विचारला जात आहे.खरं म्हणजे हा वाद पुन्हा एकदा पुरोगामी आणि हिंदुत्ववादी यांच्यात गुरफटला आहे.परंतु भारतात आधीच अधिकच्या लोकसंख्येमुळे अन्न,वस्त्र आणि निवाऱ्याची गैरसोय मोठ्या प्रमाणात असतांना परदेशी नागरिकांना आश्रय देणे संयुक्तिक ठरेल का? पाकिस्तान आणि बांगलादेश या देशातील ‘ब्लड रिलेशन’ असलेल्यांना आपण न्याय देऊ शकत नाही आणि ज्यांच्याशी आपला काडीचाही संबंध नाही अशा नागरिकांना आश्रय देणे योग्य आहे का? यातून उद्भवणारे अनेक प्रश्न भविष्यात भारताची पुढील पिढी आपल्याला विचारू शकते किंवा काश्मीरसारखा आणखी एक समस्या आपण निर्माण करू घेऊ,हे मात्र निश्चित !