जिंदगी जिंदाबाद
    No Result
    View All Result
    No Result
    View All Result
    जिंदगी जिंदाबाद
    No Result
    View All Result

    मुहूर्तांवरचे आरोप !

    admin by admin
    April 19, 2017
    in राजकीय विश्लेषण
    2
    मुहूर्तांवरचे आरोप !

    आपल्या अडचणीच्या काळातून मार्गक्रमण करून जेव्हा-जेव्हा माजी महसुलमंत्री एकनाथराव खडसे ‘सेफ झोन’मध्ये येतात त्याचवेळी मुहुर्त साधत त्यांच्यावर एक नविन आरोप होत असतो. विशेष म्हणजे मागील वर्षभरात राज्यातील काही नेत्यांवर गंभीर आरोप झाले. परंतु अंजली दमानिया किंवा इतरांनी खडसेंच्या व्यतिरिक्त कोणत्याच नेत्याचा पिच्छा पुरविला नाही. तसेच दमानिया मध्येच शांत होतात आणि अचानकच नवा आरोप घेऊन समोर येतात. त्यामुळे त्यांच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होण्यास वाव आहे.

    खडसेंवरील शुक्लकाष्ठ दाऊदसोबत कथीत संभाषणाच्या आरोपाने सुरु झाले. मनिष भंगाळे नामक कथीत हॅकरने खडसेंसह देशातील इतर काही नेत्यांवर दाऊदच्या पत्नीसोबत संभाषण केल्याचा खळबळजनक आरोप लावला होता. यावेळी साधारण पाच ते सहा नावे समोर आली होती. परंतु खडसेंच्या व्यतिरीक्त आजच्या घडीला त्या प्रकरणात अडकलेल्या एकाही व्यक्तीचे नाव कुणाच्या ध्यानी नसेल. किंबहुना खडसेंच्या व्यतिरीक्त भंगाळेच्या आरोपाचे खंडन करण्यासाठी कुणीच समोर आले नाही. वास्तविक बघता माध्यमांमध्ये खडसेंसह इतर लोकांच्या नावांचीही चर्चा होणे अपेक्षित होते परंतु तसेही झाले नाही. दाऊद संभाषण प्रकरण शांत होत नाही तोच पुण्यातील हेमंत गावंडे यांनी भोसरी प्रकरणाचा आरोप केला. एमआयडीसीची जागा नातेवाईकांच्या नावे करण्यासाठी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप झाला.या संदर्भात पुण्यातील बंडगार्डन पोलिस स्थानकात गावंडे यांनी तक्रारही दिली. तक्रारी अर्जाच्या चौकशीनंतर पोलिसांनी या प्रकरणात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही, असा अभिप्राय दिला.
    दाऊद संभाषण आणि भोसरी प्रकरण शांत व्हायला लागले असे जाणवत असतांनाच न्यायालयाच्या माध्यमातून खडसेंसह त्यांच्या परिवारावर गुन्हा दाखल झाला. तक्रारदार व तक्रार तीच असल्यामुळे आता पोलिसांनंतर एसीबी काय चौकशी करते? याकडे लक्ष लागून असतांनाच झोटींग समितीचा चौकशी अहवाल खडसेंच्या बाजूने असल्याच्या चर्चा सुरु झाली.तोच आता अंजली दमानिया यांनी खडसेंवर स्वत:सह नातेवाईकांच्या नावावर बेहिशोबी मालमत्ता जमविल्याचा पुन्हा एक नवा खळबळजनक आरोप केला. वास्तविक बघता याप्रकरणात त्यांनी याआधी आयकर विभाग किंवा एसीबीकडे तक्रार केली आहे का? याबाबत अधिक माहिती गरजेचे होते.साधारण 1997 पासून खडसे नियमितपणे आयकर भरत आहेत. त्यांच्या निवडणुकीच्या शपथपत्रात संपत्तीत वेळोवेळी झालेली वाढ आणि त्याचे स्त्रोत त्यानी दिले आहेत. कुठल्याही निवडणुकीत उभे राहणार्‍या प्रत्येक व्यक्तीला अशा पध्दतीची माहिती देणे बंधनकारकच असते. भोसरी प्रकरण समोर आल्यानंतर खडसे कुटुंबियांचे आयकर विभागाचे विवरण आणि प्रत्येकाचे वेगळे असलेले पॅनकार्ड याची माहितीदेखील समोर आली.
    भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर नितीन गडकरी, पंकजा मुंडे, विनोद तावडे, किरीट सोमय्या यांच्यावर विविध आरोप झाले. एवढेच नव्हे तर महापालिका निवडणुकी दरम्यान नागपूर महापालिकेतील भ्रष्टाचारात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील नाव समोर आले होते. अंजली दमानिया जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर आल्यानंतर भुसावळच्या जमिनीप्रकरणी त्यांनी खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले होते. दमानिया यांनी आरोपांचे निकष हे फक्त खडसेंपुरताच मर्यादीत का ठेवले आहेत? याचे उत्तर आता शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. दमानिया यांनी भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या सर्वच नेत्यांबाबत खडसेंप्रमाणेच आक्रमक भूमिका का घेतली नाही? हा प्रश्‍नदेखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे. भंगाळेचे आरोप खोटे ठरल्यानंतर तसेच झोटींग समितीचा अहवालही खडसेंच्या दृष्टीने सकारात्मक असल्याची चर्चा सुरु झाल्याबरोबर नव्या आरोपांनी न्यायालयात खटला का दाखल करण्यात आला? याआधीच्या काळात खडसेविरोधी टोळी शांत का होती? हा प्रश्‍नदेखील स्वाभाविक उपस्थित होतो. एकंदरीत खडसेंवरील आरोपाची टायमिंग ही विशिष्ट मुहूर्त शोधूनच बघितली जात आहे.खडसेंच्या ‘सेफ झोन’मध्ये आल्यानंतरच हा मुहूर्त साधला जातो हे विशेष !
    खडसेंवर साधारण 10 वर्षापूर्वी अशाच पध्दतीचे आरोप करण्यात आले होते. परंतु त्यावेळीही ते त्यातून सहज बाहेर निघाले होते. यावेळी एकनाथ खडसे यांनी स्वतःच्या तसेच पत्नी मंदाकिनी, सून रक्षा, मुलगी शारदा चौधरी, जावई गिरीश चौधरी, मुलगी रोहिणी खेवलकर व जावई प्रांजल खेवलकर यांच्या नावे नाशिक, जळगाव, धुळे, पुणे अशा ठिकाणी अनेक जमिनी, भूखंड व फ्लॅट खरेदी केले असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. खडसे व त्यांच्या सर्व कुटुबीयांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न कमी दाखवले जात असतानाही त्यांच्या नावे खूप मोठ्या प्रमाणात स्थावर व जंगम मालमत्ता आहेत, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.अंजली दमानिया व अन्य चार जणांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे.
    खडसेंचे जावाई व सून यांना गर्भ श्रीमंत कौटुंबिक पार्श्‍वभूमी आहे.त्यामुळे खडसे मंत्री झाले आणि मग त्यांच्या जावयाने किंवा इतरांनी प्रॉपर्टी जमा केली असे म्हणणे चुकीचे ठरेल.एकंदरीत आरोपांची मालिका लक्षात घेता खडसेंनाच हेतूपुरस्कर टार्गेट केले जात असल्याचे स्पष्ट जाणवत आहे. अर्थात पक्षांतर्गत विरोधकांकडून यासाठी दुसर्‍यांचे खांदे वापरले जात असल्याचेदेखील भंगाळे प्रकरणातून समोर आले आहे. त्यामुळे मुहूर्तांवर आरोप करणार्‍या टोळीला खडसे कसे पुरुन उरतात हे बघणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

    Tags: eknathrao khadse and anjali damaniyavijay waghmare journalistअंजली दमानिया आणि एकनाथराव खडसेविजय वाघमारे पत्रकार जळगाव
    Previous Post

    इस्लाम,संगीत आणि कट्टरपंथी !

    Next Post

    तलाक..तलाक…तलाक !

    Next Post
    तलाक..तलाक…तलाक !

    तलाक..तलाक...तलाक !

    Comments 2

    1. कृष्णा नेमाडे says:
      8 years ago

      सुपारी घेऊन आरोप करणे या दमा निया बाईचे धंधेच आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला चांगलेच माहित झालेले आहे

      Reply
    2. Bhaskar Borole says:
      8 years ago

      Anjali Damania madam Tanna dusarya Babi disat nahi ka. etar mantranvar aarop zalet. Yanni sadhi chukashi Sathi vinanti nay Keli parantu Hon Nathabhau baddalach bolnyacha contract kelya sarkha prakar suru ahe. High Court ne hi baju tapaun Pahlavi. Ugach aarop Karun ekhadya vyaktiche badnaam karayche ya goshti Sathi High court ne Anjalu Damania madam la fatkarle pahije ani Jabar Shiksha Keli pahije jenekarun kontyahi vyaktiche future kharab ho at nahi….. Bhaskar Borole

      Reply

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    No Result
    View All Result

    Recent Posts

    • सोहराबुद्दीन चकमक : रक्तरंजित धुकं !
    • गुजरात फाईल्स : राजकारण्यांचा बेगडी बुरखा फाडणारं पुस्तक !
    • हरेन पांड्या खून प्रकरण : मोदींवर आरोप ते सुप्रीम कोर्टाचा निकाल…!
    • सोहराबुद्दीन बनावट चकमक : अनेक अनुत्तरीत प्रश्नांची मालिका !
    •  ‘अत्त दिप भवं’ ! 

    Recent Comments

    • मनोहर चौधरी on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • Harshal Talele on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • अमोल पाटील on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • Vasudeo Borole on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • पाटील चंद्रशेखर on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !

    Archives

    • November 2019
    • September 2019
    • July 2019
    • June 2019
    • May 2019
    • April 2019
    • February 2019
    • January 2019
    • December 2018
    • November 2018
    • October 2018
    • September 2018
    • August 2018
    • July 2018
    • June 2018
    • May 2018
    • April 2018
    • March 2018
    • February 2018
    • January 2018
    • December 2017
    • November 2017
    • October 2017
    • September 2017
    • April 2017
    • March 2017
    • January 2017
    • December 2016
    • October 2016
    • September 2016
    • August 2016
    • July 2016
    • June 2016
    • May 2016
    • April 2016
    • March 2016
    • February 2016
    • January 2016
    • December 2015
    • November 2015
    • October 2015
    • August 2015
    • July 2015
    • June 2015
    • May 2015
    • April 2015
    • March 2015
    • February 2015
    • January 2015

      © 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

      No Result
      View All Result

        © 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.