जिंदगी जिंदाबाद
    No Result
    View All Result
    No Result
    View All Result
    जिंदगी जिंदाबाद
    No Result
    View All Result

    मुख्यमंत्र्यांनी मारला स्वत:च्या पायावर धोंडा !

    admin by admin
    September 9, 2016
    in Uncategorized
    6
    मुख्यमंत्र्यांनी मारला स्वत:च्या पायावर धोंडा !

    khadse-and-fadanvis
    म
    हाराष्ट्राचे राजकारण मागील १५ दिवसांपासून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर होत असलेल्या कथित आरोपांनी ढवळून निघाले. आरोपांमुळे व्यथित झालेल्या खडसेंनी काल अखेर राजीनामा दिला.चौकशी पूर्वीच नुसत्या आरोपांवर खडसेंनी राजीनामा दिल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भविष्यात प्रचंड दबाव राहील. खडसेंचा निकष त्यांना भविष्यात आरोप लागलेल्या सर्व मंत्र्यांना लावावा लागेल. अन्यथा त्यांनी बहुजन समाजातील बड्या नेत्यांचा बळी घेतला, हा डाग आयुष्यभर ते पुसू शकणार नाही.यात विरोधीपक्षाचे चांगलेच फावण्याची शक्यता आहे,कारण त्यांना एखाद मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी फक्त आरोप करावे लागतील,पुरावे देण्याची आवश्यकता त्यांना राहणार नाही.

    एकनाथराव खडसे हे महाराष्ट्रातील मास लिडर्समध्ये गणले जाणारे बहुजन समाजातील एक वजनदार नेतृत्व आहे. स्व.गोपीनाथ मुंडे यांनी खडसेंच्या नेतृत्वाला खर्‍या अर्थाने बहर आणली, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. खडसेंंच्या आक्रमक स्वभावामुळे विरोधी पक्षातले भलेभले दिग्गज नेते त्यांच्या वाटेला जात नव्हते. अंजली दमानिया, मनिष भंगाळे अशा राजकारणाबाहेरील लोकांनी त्यांच्यावर आरोप करण्याची हिम्मत दाखवली.परंतु या प्रकरणात प्रमुख विरोधी पक्षांचा कुठलाही दबाव नसतांना खडसे यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकप्रकारे स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला आहे.कारण भविष्यात त्यांच्या मंत्रीमंडळातील कुठल्याही नेत्यावर आरोप झालेच तर त्यांना खडसेें सारखाच निकष लावावा लागेल. चौकशी करण्याआधिच त्यांना मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे लागतील.या पायंड्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे मात्र चांगलेच फावणार आहे. कारण त्यांना आता नुसत्या आरोपांवर राजीनामे मिळतील.पुरावे शोधण्याची देखील गरज नाही,आरोप करा,राजीनामे मिळवा हा भविष्यातील त्यांचा अजेंडा असेल.खडसे यांच्या तुलनेत भाजपातील सर्वच मंत्री त्यांना ज्युनिअर आहेत. नुसत्या आरोपांवर एवढ्या दिग्गज नेत्याचा राजीनामा घेतला जावू शकतो, तर अमूकचा का नाही? असा प्रश्‍न विरोधीपक्षांकडून कायम उपस्थित केला जाईल. त्यामुळे फडणवीस यांच्यावर कायम नेैतीक दबाव राहील.विशेष म्हणजे, नागपूर पोलीस भरतीत प्रश्‍नपत्रिकेत झालेला घोळ, कारागृहातील पळालेले कैदी, व्यापार्‍याचा दिवसा ढवळ्या झालेला खुन याच्यासह राज्यातील कायद्या सुव्यवस्थाबाबत अनेक गंभीर आरोपांना गृहमंत्री म्हणून फडणवीस सामोरे गेले. खडसेंसोबत असल्यामुळे सर्व आरोप परतवून लावले जात होते.किंबहुना विरोधक देखील जास्त अंगात आणत नव्हते.परंतु विरोधकांच्या हल्ल्याची धार आता अधिक तिव्र होणार आहे.दरम्यान, नारायण राणें सारखा खमक्या आणि आक्रमक नेता आता सभागृहात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांना अक्षरश: जेरीस आणले जाईल, त्यावेळी कदाचित त्यांचा देखील राजीनामा मांगितला जाईल.त्यामुळे फडणवीस पुरते फसले आहेत.खडसे यांचा स्वभाव बघता, त्यांच्यावरील आरोप करणार्‍यांना रसद पुरविणार्‍यांना ते धडा शिकवतील हे उघड आहे. किंबहुना त्यांनी सुचकरित्या तसा संदेश देखील दिला आहे.
    प्रकृती अस्वास्थामुळे खडसे यांनी सभागृहात अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांना मुद्दे पुरवित बोलण्याची संधी दिली.ऐवढेच नव्हे तर सभागृहातील बारकावे खडसेंनीच फडणवीस यांना शिकविले, हे उभ्या महाराष्ट्राने बघितले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी ज्युनिअर असलेल्या फडणवीस यांना ज्यावेळी संधी देण्यात आली, त्यावेळी अमित शहा आणि राजनाथसिंग यांनी खडसे यांची समजूत काढली होती. कदाचित त्यावेळेस खडसेंनी आडमुठी भूमिका घेतली असती, तर भाजप नेतृत्वाला महाराष्ट्रात उत्तर देणे कठीण झाले असते. परंतु निष्ठावान कार्यकर्त्याप्रमाणे खडसेंनी पक्षश्रेष्ठींचा आदेश मानत, तो अपमान पचविला आणि मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतून बाजूला झाले. त्यामुळे त्यांच्यावर चौकशीपूर्वी झालेली कारवाई कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश देवून गेली आहे.मागील काही वर्षापासून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या व्यापम घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप होत आहे.या घोटाळ्यात आतापर्यंत तब्बल ५० साक्षिदारांची हत्या झाली आहे. तसेच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पदवीबाबतचा वाद आजही सुरू आहे.यासारख्या राष्ट्रीय पातळीवर अनेक गंभीर प्रकरणांना भाजपा सरकार सामोरे जावू शकते, मग नाथाभाऊंच्या प्रकरणातच घाई का? असा त्यांच्या समर्थकांचा प्रश्‍न स्वाभाविक आहे. अर्थात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींना खडसे विरोधी अहवाल दिला, हे देखील यानिमित्ताने आता स्पष्ट झाले आहे.यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठी जवळील आपले पूर्ण वजन वापरले.फडणवीस अहवाल एकटेच दिल्लीला गेले त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षांना देखील सोबत घेतले नाही.विशेष म्हणजे गडकरीपण त्यादिवशी दिल्लीला नव्हेत.परंतु एवढे सर्व करून देखील मुख्यमंत्र्यांनी स्वतःसमोरील अडचणी वाढवून घेतल्या आहेत.भविष्यात फडणवीस यांच्या कोणत्याही सहकारी मंत्र्यावर आरोप झाला,तर त्याचा राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव असेल.कारण चौकशी करण्याआधी राजीनामा स्विकारण्याचा नवा पायंडा खडसेंच्या निमित्ताने त्यांनी सुरू केला आहे.भविष्यात आरोप झालेल्या मंत्र्यांचे राजीनामे स्विकारले नाही, तर खडसेंना एक न्याय आणि दुसर्‍यांना वेगळा न्याय, अशी भूमिका घेवून मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्राच्या जनतेसमोर येवू शकणार नाही.

    Tags: fadanviskhadsevijay waghmareखडसेफडणवीस
    Previous Post

    खडसे माझे टार्गेट नाही – मनिष भंगाळे

    Next Post

    समलिंगी संबंध आणि धर्मांध विकृती !

    Next Post
    समलिंगी संबंध आणि धर्मांध विकृती  !

    समलिंगी संबंध आणि धर्मांध विकृती !

    Comments 6

    1. Dr nitupatil says:
      9 years ago

      Will see now what happens in future….

      Reply
    2. RamchandraBishnuChaudhari says:
      9 years ago

      B J P all uttar maharstra is supporting nathabhau

      Reply
    3. कुंदन फेगडे says:
      9 years ago

      बहुजन समाजाच्या लोकनेत्याशी खेळी करण्याचे परिणाम फडणवीस सरकारला भोगावे लागतील

      Reply
    4. Ajay Waykole says:
      9 years ago

      Good Observation Sir…

      Reply
    5. कमलेश देवरे says:
      9 years ago

      भाऊ महत्वाचा मुद्दा आहे , खडसे चे नेहमीच फडणवीस यांना मार्गदर्शन राहिले आहे एक प्रकारे शिष्याने गुरु चा बळी घेतला आहे .

      Reply
    6. S.R. Kulkarni says:
      9 years ago

      It seems that article is written with prejudice mind & with wrong assumptions about chief minister shri. Devendra Fadanvis …..

      Reply

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    No Result
    View All Result

    Recent Posts

    • सोहराबुद्दीन चकमक : रक्तरंजित धुकं !
    • गुजरात फाईल्स : राजकारण्यांचा बेगडी बुरखा फाडणारं पुस्तक !
    • हरेन पांड्या खून प्रकरण : मोदींवर आरोप ते सुप्रीम कोर्टाचा निकाल…!
    • सोहराबुद्दीन बनावट चकमक : अनेक अनुत्तरीत प्रश्नांची मालिका !
    •  ‘अत्त दिप भवं’ ! 

    Recent Comments

    • मनोहर चौधरी on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • Harshal Talele on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • अमोल पाटील on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • Vasudeo Borole on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • पाटील चंद्रशेखर on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !

    Archives

    • November 2019
    • September 2019
    • July 2019
    • June 2019
    • May 2019
    • April 2019
    • February 2019
    • January 2019
    • December 2018
    • November 2018
    • October 2018
    • September 2018
    • August 2018
    • July 2018
    • June 2018
    • May 2018
    • April 2018
    • March 2018
    • February 2018
    • January 2018
    • December 2017
    • November 2017
    • October 2017
    • September 2017
    • April 2017
    • March 2017
    • January 2017
    • December 2016
    • October 2016
    • September 2016
    • August 2016
    • July 2016
    • June 2016
    • May 2016
    • April 2016
    • March 2016
    • February 2016
    • January 2016
    • December 2015
    • November 2015
    • October 2015
    • August 2015
    • July 2015
    • June 2015
    • May 2015
    • April 2015
    • March 2015
    • February 2015
    • January 2015

      © 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

      No Result
      View All Result

        © 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.