भाजपा सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्यापासून विरोधकांच्या घोटाळ्यांपेक्षा सरकारमधीलच एकनाथराव खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे या तिघा बहुजन समाजातील मंत्र्यांची वक्तव्ये किंवा कथित भ्रष्टाचाराची प्रकरणे अधिक भडकपणे समोर आली किंबहुना आणण्यात आली! आजही कोणत्या न् कोणत्या कारणाने या तिघांची प्रतिमा नकारात्मक होईल असे विषय सातत्याने बाहेर येत आहेत. विशेष म्हणजे हे तिघे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत होते आणि अद्यापही आहेत. हा निव्वळ योगायोग असेल तर ठीक, नसेल तर मात्र ही कपटी खेळी श्रीपंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गटासाठी भविष्यात आत्मघातकी ठरू शकते.
महसूलमंत्री एकनाथराव खडसे शेवटच्या दोन वर्षासाठी का असेना, पण मुख्यमंत्री बनतीलच याची चर्चा संपूर्ण राज्यात जोर धरत असतांनाच लाचखोरीचे वादळ निर्माण झाले आणि त्यातून दाऊद नावाची त्सुनामी खडसेंच्या चारित्र्यावर येऊन धडकली. स्व.गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर महाराष्ट्रात ‘मास लीडर’ म्हणून खडसेंकडे बघितले जाते. विरोधकांना आपल्या आक्रमक शैलीने नामोहरण करणे असो की,शिवसेनेसारख्या सहकारी मित्र पक्षाला अंगावर घेणे, यासाठी खडसेंचा पक्षाने वेळोवेळी पुरेपूर उपयोग केला.लोकसभेत कॉंग्रेसची संख्या केवळ दोन आकडी असतांना स्पष्ट बहुमत असलेल्या मोदी सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडली जात नाही. दुसरीकडे राज्यात विरोधकांचे संख्याबळ निश्चितच जास्त आहे. त्यातच सत्तेत असलेल्या शिवसेनेचीही छुपी साथ असतांना किरकोळ वाद वगळता विधीमंडळाच्या एकाही अधिवेशनात भाजपा चक्रव्युहात अडकला नाही याचे श्रेय ‘अभिमन्यु’रूपी खडसेंनाच आहे, हे सत्य कोणीही नाकारू शकणार नाही. राज्यातील दुसर्या क्रमांकाचे नेते खडसे यांच्याकडे असलेल्या महसूल मंत्रालयाशी संबंधित विषयावर एसीबी तब्बल नऊ महिने वॉच ठेवते,लाच मागणार्या गजमल पाटीलचे फोन टॅप करते,गुन्हा दाखल करून लाच मागण्याच्या आरोपाखाली त्याला अटक केली जाते. तोपर्यंत महसूल मंत्र्यांना याची जराही भनक लागत नाही. याचाच अर्थ मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातूनच याची सुत्रे हलली,हे स्पष्ट आहेत.त्याच्याशिवाय गृहखाते इतकी गोपनीयता पाळूच शकत नाही.मुख्यमंत्र्यांना विषय माहित असून देखील त्यांनी त्याबाबत प्रचंड गोपनीयता पाळली हे उघड आहे.अर्थात आपला सहकारी तथा राज्याच्या प्रमुख नेत्याच्या अंगावर पोलिसांच्या मदतीने शिंतोडे उडवतील याची फडणवीस यांना पूर्ण जाणीव होती.एवढी मोठी कारवाई करीत असताना मुख्यमंत्री असलेले गृहमंत्री अनभिज्ञ असतील हे खर्या अर्थाने कोणालाही न पटल्यामुळे अखेर फडणवीस यांना हे प्रकरण माहित असल्याचे कबुल करावे लागले.मुख्यमंत्री फडणवीस हे जर खडसे यांना अडचणीत आणून अस्थिरता संपविण्याचा प्रयत्न करत असतील तर,त्यांची ही भविष्यातील सर्वात मोठी चूक आणि आत्मघातकी खेळी ठरू शकते.अधिवेशनात विरोधकांचे मोठ्यात मोठे हल्ले परतवून लावण्याची ताकद आणि कसब असलेला नेता जर बाजुला सारला गेला तर भविष्यात मुख्यमंत्र्यांवर विरोधकांकडून होणार्या हल्ल्यांमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.कोणी कितीही नाकारले तरी फडणवीस सरकारला अडचणीत आणण्यापासून आतापर्यंत वाचविण्याची सर्वात मोठी जबाबदारी खडसे यांनीच पेलली आहे. वास्तवित बघायला गेले तर विरोधकांच्या मनात खडसे नावाची भितीच अधिवेशन आजही चालवून नेते.खडसे यांच्याकडे आजही अनेक विरोधकांच्या फाईली पडून आहेत.विरोधी पक्षनेता असतांना मंत्र्यांना जेरीस आणणारा माणूस सत्तेत आल्यावर तर काहीही करू शकतो ही भीती देखील अनेक विरोधकांना आहे.त्यामुळे खडसे समोर उभे असे पर्यंत त्यांना अंगावर घेण्याची कुणी हिम्मत करत नाही,हे उघड सत्य नाकारता येत नाही.विरोधकांना तोंडघशी पाडण्याची ताकद आणि शिवसेनेसारख्या आक्रमक मित्र पक्षाला अंगावर घ्यायची धमक आजच्या घडीला भाजपातील राज्याच्या एकाही नेत्यात नाही. खडसे जर यानिमित्ताने सरकारमधून बाजुला सरकले तर अडचणीच्या काळात फडणवीसांना आधार देण्यापेक्षा त्यांच्या उरावर बसणार्यांची संख्या वाढलेली असेल.अर्थात त्यावेळी खडसे यांच्या गटाकडून देखील आज सारख्या बातम्या पद्धतशीरपणे पेरण्यात येतील यात शंका नाही.तसे बघितले तर लाच प्रकरणात खडसे यांच्यावर आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री गटातील अनेकांना गुदगुल्या होणे स्वाभाविक आहे.परंतु मंत्रालयात होणारी रेकी किंवा एखाद्या मंत्र्यावर झालेले आरोप याला संबंधिताप्रमाणे ‘टीम लीडर’ म्हणून मुख्यमंत्र्यांवर देखील नैतिक जबाबदारी निश्चित केली जावू शकते हे सोयीस्करपणे विसरले जात आहे.
याप्रकरणात मूळ जळगावचा असलेला स्वप्नील भंगाळे याचे समोर आलेले नाव म्हणजे लेवा समाज एकगठ्ठा खडसे यांच्या पाठीमागे नाही आणि करण्यात आलेले आरोप बहुजन समाजातूनच झाले आहेत त्यामुळे यात फडणवीस यांचा हात नाही,हे पटविण्याचा मुख्यमंत्री गटाचा प्रयत्न दिसत आहे.वास्तविक बघता सिमकार्ड, क्रेडीटकार्ड, एटीएम कार्ड यांचे क्लोन बनवून दुरुपयोग करणे तांत्रिकदृष्ट्या फार अवघड नाही.त्यामुळे दाउद प्रकरणाची उद्या सखोल चौकशी केली तर अनेक धक्कादायक माहिती आणि नावे समोर येण्याची शक्यता आहे.पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रातून भारतात येणारा प्रत्येक फोन हा संशयाच्या नजरेने बघितला जातो. त्यामुळे अशा फोन कॉल्सवर आयबी, रॉ सारख्या यंत्रणा लक्ष ठेवून असतात. या यंत्रणांकडे आजच्या घडीला कुख्यात आतंकवादी दाऊदचे सर्व दूरध्वनी व लॅण्डलाईन क्रमांक आहे. त्यामुळे दाऊद हा एकनाथराव खडसे यांच्या संपर्कात आल्याबरोबर याबाबतची संपूर्ण माहिती पंतप्रधान व रक्षामंत्री यांना दुसर्याच मिनिटाला मिळाली असती. एवढेच नव्हे तर त्यांचे संभाषण देखील रेकॉर्ड झाले असते.त्यामुळे खडसेंवरील हा आरोप ‘बुमरँग’ होण्याची देखील शक्यता आहे.दुसरीकडे कथित लाच प्रकरण उघड झाल्यानंतर खडसे यांचे मोबाईल सीडीआर रेकॉर्ड मागविण्यात आले होते.खडसे यांचा आक्रमक स्वभाव बघता त्यांच्याकडून गृहमंत्री असलेल्या फडणवीस यांच्यावर आगपाखड होण्याची शक्यता होती.त्यामुळे खडसेंवरील दाऊदसोबतचे संभाषण हा आरोपही ठरवून लावल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. यानिमित्ताने खडसे आपल्या मोबाईलचा सीडीआर काढण्याला विरोध करणार नाही व यातूनच गजमल पाटील याच्यासोबत झालेले काही संभाषण सापडावे, यासाठी हा सर्व खटाटोप असू शकतो.
खडसे हे मुख्यमंत्री फडणवीस यांना वयानेच नव्हे तर अनुभवाने देखील वरिष्ठ आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या अनेक बैठकी खडसे बर्याचदा हायजॅक करून न्यायचे. एवढेच नव्हे तर अनेक वरिष्ठ अधिकारी मुख्यमंत्र्यांपेक्षा खडसे यांनाच अधिक दचकून असतात.या सर्व गोष्टी मुख्यमंत्री गटातील अनेकांना खटकत असावी.यातूनच दोघांमधील दुरावा अधिक वाढत असल्याच्या चर्चा देखील अनेकवेळा समोर आल्या.तशातच एकनाथराव खडसे हे शेवटची दोन वर्ष मुख्यमंत्री बनणार असल्याची जोरदार चर्चा जोर धरत असतांनाच त्यांच्यावर लाच आणि दाऊदसोबत संभाषण सारखे गंभीर आरोप झाले.मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेमुळे निर्माण झालेल्या अस्वस्थेतूनच मुख्यमंत्र्यांच्या गटाकडून खडसेंना अडचणीत आणण्याचा खेळ सुरू झाला हा खडसे समर्थकांच्या आरोप विचार करायला भाग पाडतो.परंतु खडसेंसारखा नेता मंत्रीमंडळात आहे तोपर्यंतच फडणवीसांच्या दृष्टीने सर्व आलबेल राहील.अन्यथा, हा खेळ फडणवीस यांच्या गटासाठी आत्मघातीच ठरणार एवढे निश्चित !
श्री पंत साहेब अशी चुक आपनाकङुन होत असेल तर आपल्या पार्टीचे भविष्य धोक्याचे आहे बहुजन समाज आपल्याला व सोबत्यांना कधीही माफ करणार हे लक्षात असु द्या श्री पंत साहेब तुमची आब्रु राखणारी एकमेव व्यक्ती असेल तर सर्वमान्य नेता एकनाथरावजी खङसे आणी खुमखुमीच आली असेल तर होऊन जाऊ मग कळे.
जिव झाला वेङा पिसा रात रात जागल
पुर दिसभर मी फिरतो माग मागण
जादु मंतरी कुणी सपनात जाग पणी
नशिबी भोग असा दावला
तुझ्या प्रितीचा हा ईंचु मला चावला
माग पळुन पळुन वाट ईची लागली
पण हाता मंधी हिच्या काही पङना
तुझा ईंचु आवर भाऊ
श्री पंत साहेब अशी चुक आपनाकङुन होत असेल तर आपल्या पार्टीचे भविष्य धोक्याचे आहे बहुजन समाज आपल्याला व सोबत्यांना कधीही माफ करणार हे लक्षात असु द्या श्री पंत साहेब तुमची आब्रु राखणारी एकमेव व्यक्ती असेल तर सर्वमान्य नेता एकनाथरावजी खङसे आणी खुमखुमीच आली असेल तर होऊन जाऊ मग कळे.
जिव झाला वेङा पिसा रात रात जागल
पुर दिसभर मी फिरतो माग मागण
जादु मंतरी कुणी सपनात जाग पणी
नशिबी भोग असा दावला
तुझ्या प्रितीचा हा ईंचु मला चावला
माग पळुन पळुन वाट ईची लागली
पण हाता मंधी हिच्या काही पङना
तुझा ईंचु आवर भाऊ
पिरती लेमन
विदारक सत्य
अगदी बरोबर आहे. कष्टकरी, प्रामाणिक, मेहनती समाजाचा भाग नसलेल्या फडणविसांकडुन याशिवाय आपण दुसरी अपेक्षा ती काय करु शकतो?
अचूक विश्लेषण