वाट पाहणे किवा पाहायला लावणे हे खरच एवढे सोपे असते का हो ?.पण हि क्रिया मुळात एवढी किचकट आहे कि,वाट पाहताना नेमके काय करावे हेच कळत नाही. चित्रपटातील काही गाणी ऐकवित कि,कविता करण्याचा प्रयत्न करायचा हेच मोठे संकट पडते…काही हि म्हणा वाट पाहण्या सारखी अफलातून क्रिया माझ्या मते कोणतीच नाही… काम काहीच नसते पण रिकामपण सुद्धा क्षणाचे नसते.ते झुरणे,घड्याळ पाहणे,पुन्हा-पुन्हा त्याच रस्त्याकडे पाहणे…. का आला नाही यार ! म्हणत स्वतःला मुर्खासारखे प्रश्न विचारणे
भेटण्याची देलेली वेळ निघून गेल्या नंतरही प्रत्येक क्षणाला ती किवा तो येणारच…. त्याला यावेच लागेल….तो अस करूच शकत नाही….तो शेवटी येत नाही आणि मनातल्या गोष्टी मनात राहून जातात आणि देवून जातात त्या आठवणी दुसरी ठरलेली भेट होण्या पर्यंतच्या….पण या आधुनिक पद्धतीच्या जीवनात कुणाला वाट पाहायला देखील आता वेळ नाही…तो किवा तो येत नाही म्हटल्यावर लगेच जाऊ दे कोण वाट पाहिलं म्हणत घरचा रस्ता पकडला जातो….परंतु जीवनाच्या धुक्यात प्रेमाचा उजेड पाहण्यासाठी हि काही वेळ थांबावेच लागते हे आजकाल कुणाला कस कळत नाही….!