जन्माच्या वेळी तोंडात सोन्याचा चमचा असलेला मुलाच्या घरात एक काळ असा येतो कि,तीन -तीन दिवस चूल पेटत नाही. वडिलांच्या मृत्यदेहावर माती लोटून दुसऱ्या दिवशी पेपर द्यावा लागतो,जिल्हापरिषद सदस्य होई पर्यंत पायात घालायला चप्पल नसते,अंगात मयत वडिलाची कपडे घालून समाजात वावरायला खरच वाघाच काळीज लागत… आणि म्हणूनच आबांच्या मातोश्रीनी त्यांचा मृतदेह पाहून “मया वाघ्या गेला” अस म्हणत हंबरडा फोडला असावा !
आबांच्या बाबतीत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करतांना आबांनी माझे हे काम केले,आबांनी माझे ते काम केले असे अनेकांनी सांगितले मात्र ,माझे काम आबांनी केले नाही आणि तरी देखील मला त्यांचा सार्थ अभिमान आहे असे सांगणारा कदाचित मी पहिला व्यक्ती असेल.कारण आबांच्या या पारदर्शी धोरणामुळेच सातविश्वाचे दारिद्र्य असणारी अनेक तरुण त्यानंतर मी पोलीस झालेली पहिली होती.ज्यावेळी आबा गृहमंत्री होते त्यावेळी मी गोरेगाव येथे पोलीस भरतीसाठी गेलो होतो.त्याचदरम्यान माझे मोठे बंधू दीपक वाघमारे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष तथा धरणगाव नगरपरिषदेचे उपाध्यक्ष होते,भाऊ म्हणून त्यांची माझ्यासाठीची तळमळ स्वाभाविक होती.त्यांनी एक दिवशी सरळ मंत्रालय गाठत आबांची भेट घेतली,त्याआधी एक-दोन वेळेस भेट झालेली असल्यामुळे त्यांना जास्त वेळ लागला नाही मुळ विषयावर यायला,भाऊनी आबांना विनंती केली कि आबा माझा लहान भाऊ गोरेगाव येथे भरतीसाठी आला आहे,त्याची मैदानी चाचणी,लेखी परीक्षा तसेच तोंडी मुलाखत झाली आहे,फार नाही एक चार – पाच मार्कांची अडचण येईल,आपण थोडी मदत केली तर बर होईल,त्यावर आबांनी आधी चहा-पाणी घ्या मग आपण बोलू सांगितले,चहा झाला भाऊ म्हणाले, आबा जरा बघा काही करता आले तर….त्यावर आबांनी सांगितले,दीपक जसा तुझा लहान भाऊ भरतीसाठी आला आहे.तसेच अनेकांचे लहान भाऊ देखील आले असतील,तू पक्षाचा पदाधिकारी म्हणून माझ्या पर्यंत पोहचला मग…इतरांनी काय करावे…मी भरतीत घोळ केला म्हणून कितीही मोठा अधिकारी असला तरी,जागेवर निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत,आता त्याच अधिकारीना एकाचे काम करा असे कसे सांगू मी….एक काम सांगितले कि,ते अधिकारी दहा कामे माझ्या नावावर खपवून घेतील.तुझा भाऊ म्हणजे माझा भाऊ आहे….माझा आशीर्वाद त्याच्या सोबत आहे याठिकाणी नाही झाले तर दुसरीकडे तो यशस्वी होईल…काळजी करू नको माझा आशीर्वाद त्याच्या सोबत आहे.माझे भाऊ काही वेळ स्तब्ध झाले,अर्थात राज्याच्या गुहमंत्र्याने एका साध्या नगरसेवकाला एवढावेळ देवून समजूत घालणे त्यांना अपेक्षित नव्हतेच.ते एका शब्दात नाही जमणार सांगून जा म्हणू शकले असते,परंतु त्यांनी वेळ दिला समजवले,कार्यकर्त्याचे काम नाही झाले तरी त्याच्या मनात आपल्या पक्षाच्या किवा नेत्याबद्दल गैरसमज निर्माण होवू नये म्हणून त्यांनी घेतलेली ती काळजी होती.आबांच्या बाबतीत असाच एक किस्सा सांगतो धरणगाव राष्ट्रवादीचे शहरध्यक्ष धिरेन्द्र पुरभे हे माझ्या दुकानावर बसलेले होते त्यावेळी आबा नुकतेच प्रदेश अध्यक्ष झालेले होते.पुरभे यांनी मोबाईल काढत आबां को फोन लगाते है …देखते है फोन उठाते है या नही… फोन लावला…रिंग वाजली आणि तिसऱ्याच रिंगला आबांनी फोन उचलला,गडीला काय बोलू आणि काय नाही हेच उमजेना, आबा नमस्कार…मी धिरेन्द्र पुरभे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरध्यक्ष त्यावर आबा उत्तरले…बोला पुरभे काय म्हणता…बस आबा आपले अभिनंदन करायचे होते आणि एका शहरध्यक्षचा फोन प्रदेशअध्यक्ष उचलतो का नाही ते तपासायचे होते,आबा म्हणाले झाले समाधान…पुरभे हो म्हणाले…मग आबा म्हटले आता कामाला लागा आणि संघटन वाढवा ठीक आहे नमस्कार….! म्हणत आबांनी फोन ठेवला. आमचे मित्र पुरभे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला अनेकांना बोलवून त्यांनी चहा पाजला…मी आता आबांशी बोललो…त्यांचे अभिनंदन केले,मला त्यांनी संघटनेचे काम करायला सांगितले आहे….गडी दिवसभर सर्वाना आनंदाने फोनवरील संवादाचा शब्द नी शब्द सांगत होता.अर्थात ते स्वाभाविक देखील होते.एका छोट्या कार्यकर्त्याचा फोन उचलून त्याच्यात उर्जा निर्माण करण्याची कला फक्त आणि फक्त आबामध्येच होती. असाच एक भन्नाट अनुभव मला धरणगाव येथील माझे मित्र अमित शिंदे यांच्या फोटो स्टुडीओमध्ये आला.एका दिवशी सहज कामा निमित्त त्याच्याकडे गेलो.त्याठिकाणी आबांचा भला मोठा फोटो तयार करून ठेवलेला होता.मी त्याला सहज विचारले काय राजे… कोणी बनविला हा फोटो त्यावर त्याने सांगितेले कि, तालुक्यातील अनोरे येथील एका शेतकऱ्याने,मी थोडा आश्चर्य चकित झालो.. का बनविला यार फोटो…त्यावर त्यांनी सांगितले कि,आर.आर.आबांनी नुकतीच खाजगी सावकारांना कोपरा पासून तर ढोपरा पर्यंत सोलून काढण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे बाबाची अनेक वर्षापासून गहाण असलेली शेती खाजगी सावकार गपचूप परत करून गेला आणि विनंती केली कि,पोलिसात तक्रार करू नका म्हणून…व्याज वैगरे सर्व माफ….म्हणून घरात आबांचा फोटो लावणार आहे तो बाबा…आबांचा आणखी असाच एक किस्सा आमचे मोहन पाटील सर यांच्या समोर घडला आणि हा किस्सा सांगताना त्याच्या चेहऱ्यावर आबां बद्दल प्रचंड आदर दिसत होता.मंत्रालयात नेहमी प्रमाणे लोकांना भेटत असतांना आबांची नजर एका महिलेवर गेली त्या महिलेच्या हातात एक डब्बी होती त्यात सोन्याची जाडचटक चैन होती.आबांनी त्या महिलेला बोलावून घेतले व म्हणाले काय काम काढले ताई….त्यावर ती महिला म्हणाली काही नाही आबा माझे एक काम आपल्यामुळे झाले म्हणून एक छोटीशी भेट आणली होती.त्यावर आबांनी आपल्या गळ्यात घातलेला करडोळा दाखविला आणि म्हणाले हा माझ्या आईने घातलेला आहे. याच्यापुढे सर्व दागिने माझ्यासाठी कवडीमोल आहेत.यापुढे असे कुठलीही भेट आणू नका.आमचे मोहन पाटील सर एकदम चकित झाले…चैन नाकारली यापेक्षा आबांच्या मनात आईबद्दल किती आदर आणि प्रेम होते याचेंच त्यांना जास्त कौतुक वाटले.
आबांच्या अवेळी जाण्यामुळे महाराष्ट्रातील तरुण किती उदास झाला याचे उदाहरण मी नुकतेच अनुभवले टीव्ही काही तरुण आबांवर सुरु असलेले अंत्यसंस्कार पाहत होते.त्यांच्यातील एक जण म्हणाला काही खरे नाही यार आता पोलीस भरतीचे….त्यावर दुसरा म्हणाला पण आता आबा थोडी गृहमंत्री होते,त्यावर पहिला म्हणाला ते बरोबर आहे…पण यार त्यांचा धाक राहिला असता ना आताच्या गृहमंत्र्यावर…एवढा जबरदस्त प्रभाव मला नाही वाटत कुठल्या नेत्याचा असावा आजच्या तरुणाईवर.एखाद्या माजी गृह मंत्र्याच्या मृत्यूवर सलामी देत असतांना रडणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यानंतर महाराष्ट्राला पहावयास मिळतील कि,नाही याबद्दल मी साशंक आहे.डान्सबार बंदी,पारदर्शी पोलीस भरती,गावठी दारू बंदी असे अनेक धाडसी निर्णय आबांनी घेतले…म्हणूच आबांची आईच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाची आई जीचा मुलगा आज पोलीस भरतीची तयारी करीत आहे किवा पोलीस झाला आहे ती पण म्हणत असेल कि,माझा वाघ्या गेला…माझा वाघ्या गेला…! आबांना भावपूर्ण श्रद्धांजली
आजच्या तरुणाईने आवर्जून बघावा असाच व्हिडीओ आहे.
Abansarkha imandar rajkarni hone nahi.