पाकिस्तानात बंड होण्याची भिती असून जिहादी गटाने पाकिस्तानचा ताबा घेतला तर आत्मघातकी अणुबॉम्बर तयार होतील आणि याचा सर्वांत मोठा धोका भारताला असल्याची भिती अमेरिका अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रमुख उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी नुकतीच व्यक्त केली.या भितीकडे भारताने गांभीर्याने बघण्याची गरज आहे. कारण भारतासाठी पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून होणारे आत्मघातकी हल्ले नवीन नाही.अणुबॉम्बरचा आत्मघातकी हल्ला रोखण्यात आपण अयशस्वी झालो, तर भारतातीलच नव्हे जगातील पुढील शेकडो पिढ्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
जगात पहिल्यांदा अणुबॉम्बचा उपयोग अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी शहरावर केले.आजही नुसते कृष्णधवल फोटो बघून सुद्धा त्यावेळीच्या रक्तरंजीत युद्धाची परिस्थिती डोळ्यासमोर उभी राहते. मानवी जीवन आणि त्याच्या शरिराचे मुल्य किडे-किटकुलापेक्षा अधिक नाही असेच जाणवते.अणुबॉम्बसारखे महासंहार अस्त्र धर्माध दहशतवाद्यांच्या हाती लागले तर या जगाचा विणाष फार लांब नाही.आज भारताकडे हवेतून कुठलेही क्षेपणास्त्र नष्ट करण्याची ताकद आहे. परंतु आत्मघातकी अणुबॉम्बर रोखणे भारतासाठी सर्वात कठीण होऊन बसले आहे.त्यामुळे पाकिस्तानकडून मिळणार्या सततच्या अणुबॉम्ब स्फोटाच्या धमकीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 2003 मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेला इंडियन मुजाहिद्दीन संघटनेच्या गुजरातमधील सुरत शहरावर अणुबॉम्ब टाकण्याच्या कटाविषयी माहिती मिळाली होती. दहशतवादी यासिन भटकळकडूनच ही माहिती तपासदरम्यान समोर आली होती. यासिनने पाकिस्तानमधील रियाझ भटकळ याच्याकडे अणुबॉम्बची मागणी केल्याचे संभाषण पोलिसांच्या हाती लागले होते.कटाचा डाव हळू-हळू पुढे सरकत असतानांच यासिन पकडला गेल्यामुळे त्यांचा हा कट उधळला गेला होता. परंतु यानिमित्ताने दहशतवाद्यांचे हात अणुबॉम्बपर्यंत पोहचल्याचे सिद्ध झाले आहे.परंतु यानिमित्ताने दहशतवाद्यांचे हात अणुबॉम्बपर्यंत पोहचल्याचे सिद्ध झाले आहे.तसेच भारतात अणुबॉम्ब स्फोट घडवून आणण्याची त्यांची तीव्र इच्छा देखील यानिमित्ताने स्पष्ट झाली होती.
असा होऊ शकतो हल्ला
पाकिस्तान या देशाची राजकीय व सामाजिक परिस्थिती विनाषकारी परिस्थितीकडे जात आहे. ज्यापद्धतीने एकावेळेस लष्कराने पाकिस्तानी जनतेने निवडलेली सरकार उलथून लावत जनरल परवेज मुशर्रफ यांनी देश ताब्यात घेतला होता. त्याच पद्धतीने धर्मांध जिहादी आतंकवाद्यांनी पुन्हा एकदा येथील सत्ता उलथून लावत आपल्या ताब्यात घेण्याची क्षमता ठेवून आहेत.त्यामुळे या जिहादींच्या हाती अणुबॉम्ब लागायला फार वेळ लागणार नाही. भारताकडे आज ध्वनीच्या गतीपेक्षा अधिकक्षमतेने देशात येणारे कुठलेही अण्वस्त्र सज्ज क्षेपणास्त्र नष्ट करण्याची ताकद आहे.परंतु दहशतवाद्यांनी ज्या पद्धतीने मुंबई, पुणे, दिल्ली यासारख्या मोठ्या शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडविले.त्याच पद्धतीने ते अणुबॉम्ब भारतात घडवून आणू शकतात.दहशतवाद्यांनी छोटी-मोठी अणुबॉम्ब गटा-गटाने भारताच्या विविध शहरात आणून त्याचे एकत्रीकरण करीत स्फोट घडविल्यास भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगातील मानवजातीला त्याचे परिणाम भोगावे लागतील.मुंबईत लोकलमध्ये केलेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रमाणे देशातील अनेक शहरांवर एकाचवेळी हल्ला केला जाऊ शकतो.असे हल्ले घडवून आणल्यानंतर पाकिस्तान या बॉम्बस्फोटांपासून स्वत:ला वेगळे करत आंतरराष्ट्रीय पातळीवर हे कृत्य दहशतवाद्यांचे असल्याचे सांगून अंग झटकू शकेल. त्यामुळे भारताने पाकिस्तानकडून मिळणार्या सततच्या अणुबॉम्ब हल्ल्याच्या धमकीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.पाकिस्तानकडे आज भारतापेक्षा अधिक अणुबॉम्ब आहेत.त्याची संख्या साधारण १२० ते १३०च्या घरात आहे.दहशदवादी साधारण १० ते १५ किलो वजनाचा बॉम्ब भारतात गटातटाने आणू शकतात.त्यानंतर साखळी पद्धतीने या बॉम्ब कोणत्याही शहरात स्फोट घडवू शकतात.त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर याविषयावर मोठी चर्चा घडवून आणणे गरजेचे आहे.अन्यथा फक्त आपली ताकद दाखविण्याच्या विकृतीत पाकिस्तान संपूर्ण मानवजातीला धोक्यात आणू शकतो.
भारताचेच नव्हे, जगाचे नुकसान
1945 मध्ये जपानच्या हिरोशिमा शहरावर अमेरिकेने टाकलेल्या अणुबॉम्बचे वजन साधारण 15 किलो होते. या ‘लिटील बॉय’ नावाच्या बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर 12 ते 15 टीएनटी ऐवढी ऊर्जा निर्माण झाली होती. तर दुसरा अणुबॉम्ब ‘फॅट मॅन’ जपानच्या नागासाकी शहरावर टाकल्या नंतर त्यामधून 20 किलो टीएनटी ऐवढी प्रचंड ऊर्जा निर्माण झाली होती. या बॉम्बस्फोटांमुळे मेणबत्तीप्रमाणे माणसांचे शरीर वितळले होते.जगाच्या इतिहासात अशा पद्धतीने मानवी संहार कोणी पाहिलेला नव्हता. या बॉम्बस्फोटानंतर निघालेल्या किरणोत्सारांमुळे आज देखील या दोन शहरातील मूलं शारिरीक अपंगत्व घेवून जन्माला येतात. त्यावेळीच्या अणुबॉम्बच्या तुलनेत आज नवीन आणि अत्याधुनिक टेक्नोलॉजीमुळे अणुबॉम्ब हजारोपटीने घातक झाली आहेत.पाकिस्तानी धर्मांध दहशतवाद्यांनी भारत, बांग्लादेश, बलुचिस्तान, जम्मु-काश्मिर किंवा खुद्द पाकिस्तानात स्फोट घडविल्यास त्याचा परिणाम परिसरातील मानवी जीवनासह जमिन आणि जगाच्या वातावरणावर होऊ शकतो.या बॉम्बस्फोटामुळे ओझन वायुचा थर धोक्याच्या पातळीपर्यंत घटेल आणि जगाच्या वातावरणात गंभीर बदल होतील.आण्विक उष्णताही सुर्याच्या पृष्टभागावर असलेल्या उष्णतेपेक्षा 50 पट अधिक असते. त्यामुळे शेकडो मिलावरून अणुबॉम्बस्फोट नुसते बघुन देखील कायमचे अंधत्व येवू शकते.अणुबॉम्ब स्फोटानंतर होणार्या किरणोत्सर्गमुळे शेकडो वर्षापर्यंत मानवी डीएनएमध्ये बदल होऊ शकतात. यामुळे पुढील शेकडो पिढ्या मानसीक व शारिरीक रित्या अपंग जन्माला येतात.त्यामुळे विनाषकारी ताकद ठेवणारे अस्त्र चुकीच्या हातात पडू नये,यासाठी जगातील सर्व देशांनी एकत्रित कारवाई करण्याची गरज यानिमित्ताने निर्माण झाली आहे.आज पाकिस्तानमध्ये शाहीन आणि घौरी ही चीन आणि उत्तर कोरियाच्या मदतीने तयार केलेली क्षेपणास्त्रे आहेत.शाहीन-2 चा पल्ला हा 2500 किलोमीटरच्या आसपास आहे आणि घौरी 2 चा पल्ला हा साधारण 1800 किलोमीटर आहे.यामुळे भारतातील अनेक महत्वपूर्ण शहरे ही पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र पल्ल्यामध्ये आहेत.त्यात मुंबई,पुणे,नागपूर,कोलकत्ता,दिल्ली यांचा समावेश होतो.
हल्ला परतवून लावण्यास भारत सक्षम
पाकिस्तानने भारतावर कुठल्याही क्षेपणास्त्रच्या सहाय्याने केलेला अणुबॉम्ब हल्ला परवून लावण्यास भारत तंात्रिकदृष्टा सक्षम आहे. अमेरिका, रशिया आणि इस्त्राइल या देशानंतर फक्त भारताकडे अशा प्रकारची क्षेपणास्त्र आहे. ही क्षेपणास्त्र ध्वनीच्या गतीपेक्षा हजारोपटीच्या गतीने उड्डाण करून भारताच्या सिमेत येण्याआधिच कुठलेही क्षेपणास्त्र नष्ट करू शकतात.भारताकडे आज साधारण 90 ते 110 अणुबॉम्ब आहेत.अणुबॉम्ब जमिनीवरुन डागण्याकरिता वाहने पृथ्वी 1, 2,(350 कि मी), अग्नी 1 आणि अग्नी 2 (2000 किमी) ,अग्नी 3(3000कि मी) शस्त्र म्हणून भारतीय सैन्यात समाविष्ट आहेत.थोडक्यात आज आपल्याकडे जी क्षेपणास्त्रे आहेत त्यांच्या मदतीने आपण पाकिस्तानशी युद्ध करण्याकरिता पूर्णपणे सक्षम आहोत. मात्र चीनशी अणुबॉम्ब युद्ध करण्याकरिता अजून आपल्याकडे पुरेशी क्षेपणास्त्रे नाहीत हे सत्य आहे.त्यामुळे भारत-पाकच्या युद्धात चीन पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिल्यास भारताला कठीण परिस्थीतीचा सामना करावा लागू शकतो.