” है सुना ये पुरी धरती तू चलाता है
मेरी भी सुनले अरज मुझे घर बुलाता है…
भगवान है कहा रे तू ….ये खुदा कहा है तू…. ! “
परमेश्वराच्या शोधात जगातील सर्वच लोक आहेत,अर्थात प्रत्येकाचा परमेश्वर वेगळा आहे,त्याचे नाव देखील वेगळे आहे,’पीके’ चित्रपट पहिल्या नंतर कदाचित आपापल्या परमेश्वराचा शोध संपेल असे मला वाटते. नि:पक्षपणे आणि कुठल्याही धर्माच्या बाजूची मानसिकता ठेवून हा चित्रपट पाहायचा नाही असे ठरवूनच गेलो होतो.त्यामुळे मी जे पहिले त्यावर लिहिताना माझ्यावर कुठलाही वैचारिक दबाव नाही,कदाचित पोस्ट वाचल्यानंतर अनेक जण माझ्यावर टीका करतील हे गृहीत धरूनच लिहित आहे.
पीके कुठल्याही एका धर्मावर टीका करीत नाही,प्रातिनिधिक स्वरुपात कुठल्यातरी एका धर्मातील चुकीच्या गोष्टी अधिक ठळक दाखवायच्या व त्यातून सर्व धर्मियांना संदेश देण्याचा प्रयत्न ‘पीके’के तून केला गेला आहे.हिंदू धर्माच्या बाबतीत अधिक दाखविण्यात आले हे मान्य आहे,परंतु हिंदू धर्मातच सर्वाधिक कर्मकांड अधिक असल्यामुळे त्या बद्दल जास्त दाखविणे स्वाभाविक आणि चित्रपटाच्या कथानकाच्या मागणीला धरून असल्यामुळे ‘पीके’वरील आरोप मला खोटे वाटतात.या धर्माच्या बाबतीत का दाखविले, त्या धर्माच्या बाबतीत का दाखविले नाही,असा सवाल उभे करणारे मला पक्षपाती लोक वाटतात.यावरून त्यांची वैचारिक पातळी देखील दिसून येते.टीकाकार आमीर खानला डोळ्यासमोर टीका करीत आहेत,परंतु या टीकाकरांना माझा थेट सवाल आहे, पीके पेक्षा अधिक तीव्रतेने आणि गंभीरपणे ‘ओह माय गॉड’मध्ये हिंदू धर्मातील कर्मकांडांवर टीका करण्यात आली त्यावेळी हि मंडळी कुठे होती ? कलाकाराचा धर्म पाहून टीकेचा निर्णय घेणार आहोत का आपण ? लक्षात घ्या ‘पिके’चा मानवनिर्मित परमेश्वराला विरोध आहे,मानवाला निर्माण करणाऱ्या परमेश्वराला नाही…! ‘पीके’ने हिंदू धर्माप्रमाणेच मुस्लीम धर्मातील चुकीच्या गोष्टींवर देखील टीका केली आहे.मातममध्ये घायाळ होणारी तरुण काय साध्य करतात ? असा सवाल देखील पीकेच उभा करतो.मशीदमध्ये दारू घेवून जातांना ‘पीके’च्या रेडीओमध्ये गालिब यांची गजल वाजते ….पिने दे गालिब मजीद मै बैठ कर….या वो जगा बता, जहा खुदा नही …! लक्षात रहाते असेच दृश्य आहे.’पीके’च्या भाषेत समजावयाचे झाले तर….तथाकथिक धर्मगुरुनी आपल्याला रॉंग नंबर लावून दिला आहे.त्यामुळे आपल्याला तेच दिसते आणि ऐकू येते जे त्यांना दाखवायचे अन ऐकवायचे आहे.याच मुद्यावर तर चित्रपटाचा शेवट होतो.आपल्याला मुस्लीम विरोधी रॉंग नंबर लहानपना पासून लावून दिलेला असतो त्यामुळे ‘पीके’वरील आरोप प्रथमदर्शी आपल्याला खरे देखील वाटतात.म्हणून म्हणतो पूर्वमत तयार करून ‘पीके’ पाहुच नका.तुम्हाला मजाच येणार नाही,’प्लेन माईड’णे बघा…तुम्हाला देखील विचार करायला भाग पाडेल पीके !
पीके आणखी एक महत्व पूर्ण संदेश देतो…तो म्हणजे आपली मुस्लीम धर्मियांच्या बाबतीत असणारी वैचारिक कट्टरता , लव जिहादच्या नावाखाली देशात धार्मिक अस्थिरता निर्माण झालेली असताना, आपण हा चित्रपट जरूर पाहावा असाच आहे,काही प्रकरणात खरे घडले असेल म्हणून सर्व मुस्लीमाना त्या नजरेने पाहायचे का ? हे चुकीचे आहे…” तुम्हुको किसने बताया कि, वो मुसलमान है….तो धोका करेगा “या संवादातून पीके आपले परखड मत मांडतो. ठरविल्या प्रमाणे चित्रपट पाहण्याआधी ऐकलेल्या बातम्यावरून ‘ओह माय गॉड’सोबत ‘पीके’ची तुलना करायची नाही हे ठरवून टाकले होते.त्यामुळे त्याच्या चांगल्या बाजू मांडता येत आहेत.शेवटी एकच सांगेल पीके सर्व धर्मांना सारख्याच नजरेने पाहतो.त्याचे विचार आणि नजर विशिष्ट धर्माकडे झुकलेली नाही.मुळात त्याला कोणता धर्मच कळत नाही…तो ज्या वेळी विरोध करतो, तो विरोध विशिष्ट धर्माला नाही तर सर्व धर्मांतील त्याच प्रकारच्या चुकीच्या गोष्ठीसाठी असतो. माझ्या मते आपल्या सर्वांमध्ये असाच एक पीके कुठे तरी लपून बसलेला असतो तो यानिमित्ताने आपल्याला दिसेल.
(विजय वाघमारे,8180949855)