तसं थोडा उशीरच झाला… नियोजन तर फार दिवसांचे होते पण नेहमी प्रमाणे… काहीच ध्यानी मनी नसताना मागील एक वर्षांपूर्वी अचानक फ्री ब्लॉगर वर ब्लॉग सहकाऱ्यांच्या सह्कार्याने तयार केला.तोपर्यंत फेसबुकवर होतो त्यामुळे येथील बऱ्याच गोष्टी माहित नव्हत्या काही दिवसांपूर्वी अचानक आमच्या शेखर पाटील साहेबांनी मला गिफ्ट दिले.ते गिफ्ट होते,माझ्या स्वतःच्या नावाचे डोमेन (www.vijaywaghmare.com ) अर्थात त्यांचा फोलोअर असल्यामुळे त्यांच्या मागे ब्लॉगर वरून स्वतःच्या ब्लॉगवर येणारच होतो.परंतु डोमेन नेम कसे घ्याचे त्यासाठी काय करावे लागते हे माहित नव्हते,परंतु शेखरभाऊमुळे आज ते पण सहज शक्य झाले.एक छोटेसे स्वप्न पूर्ण झाल्याचा भास तर होतच आहे,परंतु स्वतःच्या नावाचे डोमेन असणारे जळगाव मधील काही निवडक पत्रकार मित्रांच्या पंक्तीत जावून बसल्याचा आनंद मन भारावून सोडणारा आहे. ब्लॉगच्या विश्वात नवीन असल्यामुळे मित्र हो… थोडं सांभाळून घ्या !
Best Wishes