नागपुरातील एका महिलेला तिच्या पतीने टपालाने नुकताच ‘तलाक’ दिला आहे.त्यामुळे पुन्हा एकदा इस्लामधील तलाक देण्याची पद्धत आणि नियमावली बाबत चर्चा सुरु झाली आहे.वास्तविक बघता कुरआनमध्ये तलाकची प्रक्रिया आणि अवधी स्पष्ट करण्यात आला आहे.त्यामुळे एका दमात तीन तलाकचा प्रश्नच निर्माण होत नाही.पत्र लिहून किंवा फोन,फेसबुक वरून एकतर्फी तलाकची परवानगी इस्लाम देत नाही.एका बैठकीत किंवा एकाचवेळात तीन तलाक देने गैर-इस्लामी मानले जाते.संपूर्ण चार महिन्यात चाळीस-चाळीस दिवसांच्या अंतराने तीन तलाक बोलले जाणे गरजेचे आहे.जेणेकरून त्या दरम्यान समेट घडविण्यासाठी संधी त्यांच्या हितचिंतकांना मिळावी.इस्लामनुसार तलाक समेट घडविण्यासाठी असतो, नातं तोडण्याकरिता नव्हे ! हेच आज काही जण समजून घेत नाही आणि तलाकचा दूरुउपयोग करतात.
धर्मातील उपलब्ध तरतुदीचा गैरफायदा घेतल्यामुळे अनेक मुस्लीम स्त्रीयांना याधीही हा अन्याय सहन करावा लागला आहे.आज संपूर्ण देशात तीन तलाक संदर्भात जोरदार चर्चा सुरु आहे.खरं म्हणजे तलाक़ (घटस्फोट) काही चांगला प्रकार नाही.कोणत्याही जाती-धर्माच्या समुदायात या गोष्टीला चांगले म्हटले जात नाही.एवढेच नव्हे तर इस्लाममध्ये देखील तलाकला वाईटच म्हटले गेले आहे.परंतु विभिन्न मानवी स्वभाव लक्षात घेता,हा प्रकार कोणत्याही धर्मातून नष्ट करणे शक्य नाहीय.पती-पत्नीत विशिष्ट कालवधी नंतर देखील समजोता होत नसेल तर जीवनात अधिक मानसिक त्रास सहन करण्यापेक्षा त्या दोघांनी एकमेकापासून वेगळे होणे कधीही चांगले.त्यामुळे जगातील प्रत्येक देशात आणि धर्मात तलाक़ (घटस्फोट) अस्तित्वात आहे.परंतु सध्या तीन तलाकच्या नावाखाली महिलांचे आयुष्य उद्धवस्त करण्याचे काम सुरु आहे.त्यासाठीच आता तीन तलाकचा कायदा आपल्याला समजून घेणे क्रमप्राप्त झाले आहे.
इस्लाममधील तीन तलाक पद्धत समजून घेतांना किंवा त्यावर चर्चा करतांना सर्वात आधी आपल्याला निगाह (विवाह)ची पद्धत आणि नियम समजून घ्यावे लागतील.इस्लामनुसार लग्न सात जन्माचे नाते नाही.फक्त एक पक्का समजोता असतो.जो एक पुरुष आणि एक स्त्रीच्या सामाईक मान्यते नंतरच होणे शक्य असतो.इस्लाममध्ये पति-पत्नीला हा करार निभावण्यासाठी अनेक प्रकारच्या सूट देण्यात आल्या आहेत.एक पुरुष व स्त्री या विवाहाच्या बंधनात अडकल्यानंतर त्यांनी कुटुंब बनवावे आणि आयुष्याच्या अखेर पर्यंत एकमेकासोबत राहावे यासाठी इस्लामी शरीअतमध्ये अनेक प्रयत्न करण्यात आले आहे.कुरआनमध्ये विवाहला मीसाक-ए-गलीज़ (अर्थात एक मजबूत समजोता) मानलेले आहे.परंतु सोबत राहत असतांना अनेक वाद-विवाद किंवा टोकाचे मतभेद होतात.ज्यामुळे एकत्र राहणे शक्य होत नाही.एवढेच नव्हे तर एकत्र राहण्यासाठी करण्यात आलेलेसर्व प्रयत्न देखील संपुष्टात येतात तेव्हाच इस्लाममध्ये वेगळे होण्याची परवानगी देण्यात आली आहे.म्हणूनच इस्लामध्ये नैतिक कामांच्या यादीत तलाकला सर्वात वाईट काम ठरविण्यात आले आहे.त्यामुळेच जेव्हा पति-पत्नीचे भांडण वाढतांना दिसतो त्यावेळी अल्लाह(परमेश्वराने) ने कुरानमध्ये त्यांच्या नातेवाईकांना दोघांचे भांडण मिटविण्याचे निर्देश दिले आहेत.
पतीपत्नीचे वैवाहिक संबंध पूर्णपणे खराब झाले आहेत.त्यामुळे त्यांना आता एकत्र राहणे बिलकुल शक्य नाही.त्याचवेळी दोघांना इस्लामनुसार वेगळे होण्याची अनुमती आहे.परंतु तोंडी तीन तलाकच्या आधी दोघांना आपापल्या कुटुंबातील सदस्यांना त्याबद्दल माहिती देणे बंधनकारक आहे.पती-पत्नीच्या कुटुंबातून एक-एक हकम म्हणजेच पंच निवडावा लागतो.शक्यतो पंच हा आपला हितेशी किंवा जवळचा मित्र पाहिजे.ज्यांचा प्रामाणिक प्रयत्न खऱ्या अर्थाने दोघांमधील वाद-भांडण मिटविण्याच्या दृष्टीने असेल.तलाक कुठल्याही स्थितीत एकाच वेळेस दिला जाईल.दोन किंवा हजार वेळेस देता येणार नाही.जो कुणी असे करेल तर तो सर्वात मोठा गुन्हा करत असून इस्लाम विरोधी आहे.असे बोलणारा व्यक्ती इस्लामी शरियत आणि कुरआनची एकप्रकार टिंगल उडवीत आहे अशी मान्यता आहे.
विवाह संपुष्टात आणण्याची पद्धत आणि पायऱ्या
संपूर्ण चार महिन्यात चाळीस चाळीस दिवसांच्या अंतराने तीन तलाक बोलले जाणे आवश्यक आहे.कारण जेणेकरून त्या दरम्यान समेट घडविण्यासाठी संधी दिली जावी.इस्लामनुसार विवाह संपुष्टात आणायचे चार प्रकार आहेत.त्यात तलाक, तफवीज़-ए-तलाक़, खुलअ और फ़स्ख़-ए-निकाहचा समावेश आहे.विवाह संपुष्टात आणण्यासाठी पुरुषांना ज्या पद्धतीने तलाकचा अधिकार आहे.त्याच पद्धतीने महिलांना तफवीज़-ए-तलाक़, खुलअ और फ़स्ख़-ए-निकाह नुसार विवाह संपुष्टात आणण्याचे अधिकार आहे.खरं म्हणजे तलाक़चा संपूर्ण अधिकार पुरुषांना असणे हाच सध्याचा वादाचा मुद्दा आहे.परंतु तलाक देण्याच्या काही पायऱ्या आहेत.त्यात तलाक-ए-रजई, तलाक-ए-बाइन और तलाक-ए-मुगल्लज़ाचा समावेश आहे.पवित्र कुरआनमध्ये तलाकची प्रक्रिया खूप कठिन बनविण्यात आली असून तलाकची एक विस्तृत प्रक्रिया देण्यात आली आहे.परिवारामध्ये तलाकसंबंधी चर्चा करणे,पति-पत्नी दरम्यान संवाद आणि वाद मिटविण्यावर भर देण्यात आला आहे.जो पर्यंत शक्य होईल तोपर्यंत तलाक देवू नये आणि तलाक देणे गरजेचे होवून बसल्यास किमान त्याची प्रक्रिया ही न्यायिक व्हावी असे पवित्र कुरआनमध्ये म्हटले आहे.त्यामुळे पवित्र कुरआनमध्ये एकतर्फी आणि वाद मिटविण्याचा प्रयत्न न करता दिलेल्या तलाकचा उल्लेख कुठेही आढळत नाही.
तलाक-ए-रजई
तलाक-ए-रजई ही तलाकची पहिली पायरी आहे.कुरआनमध्ये सक्त निर्देश आहेत की,कोणताही पुरुष आपल्या पत्नीला सोडू इच्छित असेल तर तो आधी एकच तलाक देवू शकतो.हा तलाक माहवारी (मासिक पाळी)च्या वेळी तसेच गर्भवती असतांना देता येत नाही.पहिला तलाक दिल्यानंतर पती-पत्नी दोघं जणांनी गांभीर्याने त्याबाबत विचार करावा.यादरम्यान निर्णय बदलल्यास तलाक परत घेत पती आपल्या पत्नीसोबत पुन्हा संसार करू शकतो.परंतु निर्णय न बदलल्यास पतीला दुसऱ्या महिन्यात दुसरा तलाक देणे अनिवार्य आहे.दुसऱ्या महिन्यात देखील पुरुषाला अधिकार आहे की,तो तलाक परत घेवू शकतो.याला ‘लाक-ए-रजई’म्हणजे परत करणे असे म्हणतात.
तलाक-ए-बाइन
तलाक-ए-बाइन ही तलाकची दुसरी पायरी आहे.पहिल्या दोन महिन्यातील तलाक पतीने आपला तलाक परत घेतला नाही आणि तिसरा महिना सुरु झाला तर मात्र तलाक निश्चित मानला जातो.यालाच ‘लाक-ए-बाइन’ म्हटले जाते.या तलाक नंतर देखील पति-पत्नी एकत्र येवू शकतात. परंतु यासाठी पतीच नव्हे तर पत्नी देखील तयार असणे गरजेचे असते.दोन्ही तयार असल्यास पुन्हा निगाह (विवाह) होतो.
तलाक-ए-मुगल्लज़ा
तलाक-ए-मुगल्लज़ा हा तलाकची तिसरी आणि शेवटची पायरी आहे.तिसऱ्या महिन्यात जर पुरुष तिसर्यांदा तलाक देत असल्याचे पत्नीला सांगतो.त्याच वेळी त्यांचा विवाह संपुष्टात येतो.त्यालाच तलाक-ए-मुगल्लज़ा म्हणतात.यानंतर मात्र आता दोघांचा विवाह होवू शकत नाही.
छान माहिती, पण मुस्लिम लोकांना त्यांचा कृत्रिम पर्सनल लॉ बोर्ड संविधान पेक्षा जास्त श्रेष्ठ वाटतो.