जेष्ठ पत्रकार तथा जनशक्ती मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विक्रांत पाटील यांनी मंगळवारी व्हाट्अपवर एक पोस्ट टाकली. भारतीय अदानी समूहाच्या बाबतीत स्टोरी कव्हर करणाऱ्या ऑस्ट्रेलियन पत्रकाराला आलेले अनुभव त्यांनी थोडक्यात परंतु आपल्या खास शैलीत मांडले.शोधपत्रकारीता करणाऱ्या जगप्रख्यात ऑस्ट्रेलियन एबीसी न्यूजच्या पत्रकारांला भारतात झालेला त्रास त्यांनी आपल्या शब्दात सांगितला आणि त्या वेबसाईटची लिंक भारतात डाऊन होण्याची भीती देखील व्यक्त केली.त्यामुळेच ती डॉक्युमेंट्री पटकन डाऊनलोड करून घेतली.डॉक्युमेंट्री बघितली आणि थक्कच झालो.’डीगिंग इन टू अदानी’ ही डॉक्युमेंट्री धाडसी पत्रकारितेचा उत्कृष्ट नमुना आहे.त्यामुळे आपण सर्वांनी एकदा बघितलीच पाहिजे.
भारतातील अदानी समूह ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये 16.5 अब्ज डॉलर्सचा कोळसा खाण प्रकल्प सुरू करण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पाला ऑस्ट्रेलिया सरकारने पाठिंबा दिला आहे. परंतु तेथील पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविल्यानंतर शोधपत्रकारीता करणाऱ्या ऑस्ट्रेलियन ‘फोर कॉर्नर’ रेडियोच्या अधिकृत ABC न्यूज पोर्टलवर अदानी समूहाचे स्टिंग ऑपरेशन करत नुकताच पर्दाफाश केला.४६ मिनिटांच्या डॉक्युमेंट्रीत ‘फोर कॉर्नर’ रेडियोने अनेक धक्कादायक परंतु वस्तुनिष्ठ गोष्टींचा खुलासा केला आहे.परंतु डॉक्युमेंट्री तयार करणाऱ्या पत्रकारांना चक्क भारतीय पोलिसांकडून धमकाविण्यात आल्यामुळे आपल्या न्यायव्यस्थेची जगात नाचक्की झाली आहे.
‘फोर कॉर्नर’च्या स्टीफन लॉग या पत्रकाराने शोध पत्रकारीतेच्या माध्यमातून आपल्या सहकाऱ्यांसह ही डॉक्युमेंट्री बनवली आहे.गोव्यामधील वास्को-द-गामा शहरातील अडाणी समूहाच्या कोळसा खदाणीमुळे पर्यावरणाचा झालेला ऱ्हास आणि मानवी शरीरावर झालेले भयंकर परिणाम येथून या डॉक्युमेंट्रीची सुरुवात होते.वास्को-द-गामा शहरात राहणाऱ्या सॅड्रा कोरिया आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना अडाणी समूहाच्या कोळसा खदाणीमुळे जडलेले आजार बघतांना अंगावर काटा येतो.विशेष म्हणजे कोरिया यांच्या परिवाराने यासंबंधी अनेक तक्रारी करून देखील कुठलीही कारवाई झाली नसल्याची खंत देखील याठिकाणी ते व्यक्त करतात.
एबीसी न्यूज पोर्टलने आपल्या साईडवर म्हटले आहे की,’फोर कॉर्नर’ची टीम भारतात आल्यानंतर त्यांनी अदाणी समूहाच्या हालचाली आणि कार्यशैलीबाबत चौकशी करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना या ग्रुपची खरी राक्षसी शक्ती कळली.पत्रकार स्टीफन लॉग याने भारतात आल्यानंतर त्याचे काही कटू अनुभव देखील येथे सांगितले आहेत.स्टीफन सांगतो की,अदाणी समूहाच्या कारभारा विषयी ‘फोर कॉर्नर’ टीमने माहिती गोळा करायला सुरुवात करताच त्यांचे कॅमेरे जप्त करण्यात आले.शुटींग केलेले फुटेज डिलिट करायला भाग पाडण्यात आले.एवढेच नव्हे तर स्थानिक पोलिसांनी बघून घेण्याची धमकी देण्यात आली.पोलिसांच्या दबावामुळे अदाणी समूहाची चौकशी न करताच त्यांना त्याठीकाहून निघून जावे लागले.परंतु अखेर चार महिन्याच्या अथक परिश्रमानंतर ‘फोर कॉर्नर’ टीमने अदाणी समूहाच्या काम करण्याच्या पद्धतीची पाळमुळे खोदून काढली.त्यानुसार आपल्या कोर्पोरेट लॉबिंगच्या माध्यमातून अदानी समूह ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात मोठी कोळसा खाण प्रकल्प सुरु करण्यासंदर्भातली धक्कादायक माहिती समोर आली. क्वीन्सलँड येथील कोळसा खाण प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो स्थानिक भूमिपुत्रांना नौकऱ्या मिळणार असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले.परंतु या प्रस्तावित खाण प्रकल्पाबाबत अनेक वादविवाद आहेत.त्यामुळे अदानी समूहाची नौकरी संदर्भात प्रभावित करणारी भारतातील आकडेवारी बघण्याआधी ऑस्ट्रेलिया सरकारने त्यांच्याबाबत अधिकची माहिती घेणे गरजेचे असल्याचे मत ‘फोर कॉर्नर’च्या टीमने व्यक्त केले.
भारतात काही दिवस घालवल्यानंतर ‘फोर कॉर्नर’च्या टीमने भारतीय अदानी समूहाचे आर्थिक आणि पर्यावरण गुन्हेगारीमधील वादग्रस्त कॉर्पोरेट इतिहास परीक्षण करायला सुरुवात केली.त्यानुसार एक लक्षात येते की,’फोर कॉर्नर’ ची ही डॉक्युमेंट्री अदानी समूहाच्या अपारदर्शक आर्थिक कार्यप्रणालीचे विश्लेषण आणि त्यांच्या ऑस्ट्रेलियन ऑपरेशन प्रकरणांची सखोल तपासणी करते.या चौकशीअंती लक्षात येते की,रोजगार मिळवण्यासाठी घाईघाईने आणि खनन उद्योगाच्या किनाऱ्यावर, ऑस्ट्रेलियन राजकारणी अदानी समूहाला व्यवस्थित तपासणी करण्यास अयशस्वी ठरले आहेत.त्यांना आता आपल्या प्रकल्पासाठी 1 अब्ज डॉलर्स पर्यंतच्या करदात्याकडून अनुदानित कर्ज प्राप्त करण्याची आशा आहे.
‘फोर कॉर्नर’च्या मते ऑस्ट्रेलियन सरकारने पर्यावरणविषयक काळजीपूर्वक काम केले पाहिजे होते,जे केलेले दिसत नाही.कारण आर्थिक धोरण निश्चयपूर्वक करावे लागते.आर्थिक बाजू व पर्यावरणीय दोन्ही बाजूंसाठी दोन्ही आवश्यक परिश्रम आवश्यक असतात.म्हणूनच स्थानिक पर्यावरण कार्यकर्ते अदानी समूहाला या प्रकल्पासाठी कर्ज मिळू नये याकरिता बँकांवर दबाव टाकत होते.तसेच सरकारने दिलेल्या मंजुरीला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देखील दिले होते.त्यामुळेच जगातील सर्वांत मोठी कोळसा खाण ऑस्ट्रेलियामध्ये सुरू करण्याच्या अदानी समूहाच्या मनसुब्यांना ऑगस्ट 2015 मध्ये मोठा धक्का बसला.या खाणींना तेथील पर्यावरण मंत्रालयाने दिलेली परवानगी न्यायालयाने रद्द केली होती.या प्रकल्पाच्या उभारणीमुळे अनेक दुर्मिळ प्रजातींच्या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याचा इशारा पर्यावरणतज्ज्ञांनी दिला होता. पण ऑस्ट्रेलियाच्या पर्यावरणमंत्र्यांनी याचा फारसा गांभीर्याने विचार केलेला दिसून येत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने त्या वेळी नोंदविले होते.दुसरीकडे कोळशाच्या किंमतीतील घसरण आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सुरु असलेले आंतरराष्ट्रीय प्रयत्न लक्षात घेता बँकादेखील या प्रकल्पास अर्थसाह्य करणार नाहीत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
भारताचे माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांची ‘फोर कॉर्नर’च्या टीमने मुलाखत घेतली.या मुलाखतीत रमेश यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियाच्या सरकारने क्वीन्सलँडमधील कार्मिचेलच्या कोळसा खाणीसाठी अदानी समूहाला हिरवा कंदील दिला आहे.परंतु अदानी समूहाचा भारतातील पर्यावरण व्यवस्थापनावरचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ भयानक आहे.एवढेच नव्हे तर,अदानी एक जबाबदार पर्यावरणवर्धक व्यक्ती असेल असे,मला अजिबात वाटत नसल्याची स्पष्ट प्रतिक्रिया त्यांनी दिली.ग्रेट बॅरियर रीफवर (हवामानातील बदलाचा परिणाम) चे आता दस्तऐवजीकरण झाले आहे.त्यामुळे जे काही घडत आहे त्याबद्दल मी पूर्णपणे थक्क झालो आहे.ग्रेट बॅरिअर खडक ऑस्ट्रेलियात असतो, पण तो मानवजातीच्या एक सामान्य वारसा आहे आणि ते जगाचे आहे.त्यामुळे अदानी कारमाइकल कोल खाण ग्रेट बॅरिअर खडकातील बदल परिणामच्या दृष्टीने एक आपत्ती ठरेल,अशी प्रतिक्रिया देखील ‘फोर कॉर्नर’च्या टीम जवळ जयराम यांनी दिली. कार्मिचेल ही ऑस्ट्रेलियातील सर्वांत मोठी कोळसा खाण असेल.सहा खुले खड्डे तसेच असंख्य भूमिगत खाणी आहेत अशी अपेक्षा आहे. कोळसा 200 किलोमीटर शहरातील ग्रेट बॅरिअररीफ जवळ अॅबॉट पॉईंट येथे टर्मिनलवर पाठविला जाईल आणि ती फक्त सुरुवात असेल.परंतु दुसरीकडे काही दिवसापूर्वी हवामानविषयक परिषदेने सांगितले की, नूतनीकरण क्षेत्रातील संधींची पूर्तता करतांना ग्रेट बॅरिअर खडकाची खाण लोकांच्या आरोग्यासाठी आणि उष्णता हवामानासाठी एक नैसर्गिक आपत्ती ठरेल.मी अतिशय आश्चर्यचकित आहे की, ऑस्ट्रेलियन सरकारने कुठल्याही प्रकारची चौकशी न करता हा प्रकल्प सर्वसमावेशक बसत असल्याचे प्रमाणपत्र अदानी समूहाला का दिले.
दरम्यान,काही महिन्यांपूर्वी ‘फोर कॉर्नर’ची टीम अदानींच्या घरी एक दिवसापेक्षा कमी वेळ होती,त्यावेळी पत्रकार स्टीफन लॉग यांनीत्यांना आलेले काही कटू अनुभव या डॉक्युमेंट्रीत सांगितले आहे.स्टीफन लॉगने सांगीतले की,आम्ही सुमारे पाच तास चौकशी केली आणि काम बंद केले.त्यानंतर हॉटेलमध्ये पोलीसांशी सामना झाला.त्यावेळी एक वरिष्ठ पोलीस बाहेर जात असतांना त्यांच्या मोबाईलवरून एखाद्याशी बोलत असे आणि जेव्हा-जेव्हा तो परत यायचा तेव्हा प्रश्न विचारत होता आणि हे करीत असतांना आमचे शत्रुत्व वाढेल अशी त्याची भाषा होती,हे स्पष्ट होते की त्यांना माहित होते आम्ही तिथे कशासाठी आलो होतो. परंतु ‘ए’ (अदानी) शब्द वापरुन सर्वजण विषय पद्धतशीरपणे टाळत होते. पोलीस अधिकाऱ्याने स्टीफन लॉगला सांगितले की,जर तुम्ही इथे राहिलात तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला भेटायला तीन वेगवेगळ्या भारतीय गुप्तचर संस्थांचे अधिकारी येणार आहेत.एवढेच नव्हे,तर आम्ही जिथे जाऊन आलो आहोत,तिथे गुन्हेगारी पथकाचे आणि स्थानिक पोलिसांची निगराणी असणार आहे.एका प्रकरे फोर कॉर्नरची टीम तिथून घाबरून पळून जावी यासाठी सर्व उद्योग सुरु होता.
‘फोर कॉर्नर’ची ओळख
‘फोर कॉर्नर’चे एबीसी हे न्यूज पोर्टल १६९१ पासून पत्रकारितेत असून त्यांनी आतापर्यंत अनेक घोटाळे आणि हायप्रोफाईल चौकशींवर वादळी चर्चा घडवून आणलेली आहे.आतादेखील सर्वसामन्य जनतेच्या हिताच्यादृष्टीने या वृत्त समूहाचे कार्य सुरूच आहे.पत्रकारितेतील भन्नाट कामगिरी आणि सिनेमाच्या माध्यमातून त्याची एक वेगळी आंतरराष्ट्रीय ओळख आहे.या समूहाला आतापर्यंत ४४ वाक्ली आणि १६ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
( डीगिंग इन टू अदानी डॉक्युमेंट्रीची लिंक )
http://www.abc.net.au/4corners/digging-into-adani/9008500