आई-वडिल, भाऊ सर्व जण आपल्या लाडक्या छकुलीसाठी वराचा शोध घेण्याच्या तयारीत, माझ्या मैत्रिणीप्रमाणे माझेही लग्न धुमधडाक्यात होणार, मी पण सासरी जाणार आपल्या लग्नाच्या स्वप्नात रंगलेली एक तरूणी आणि अचानक तिच्यावर होणारा सामूहिक बलात्कार, बदनामी नको म्हणून कुणाला काहीही एक न सांगता मुलाचा शोध सुरू ठेवणारी कुटुंबातील सदस्य.एका तरूणासोबत तिचे लग्न ठरविताना याबाबत त्या मुलाला व त्याच्या कुटुंबियांना काहीही सांगितले जात नाही.परंतु ज्याच्यासोबत पवित्र अग्नीसमोर सात फेरे घ्यायचे आहेत, आयुष्यभर ज्याच्यासोबत राहायचे आहे, अशा व्यक्तीसोबत खोटे बोलून आयुष्याची सुरूवात नाही करायची, म्हणून आपल्या भावी पतीला सर्व खरं सांगुन टाकणारी तरुणी.यात तुझा काय दोष म्हणत तो तरूणही आपले लग्न ठरलेल्यावेळी आणि दिवशीच होणार असे सांगत त्या तरूणीच्या मनावरील घाव भरण्याचा प्रयत्न करणारा तरुण.एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच कथा आहे ना मित्रानो,परंतु हे सर्व खरंच घडले आहे.नेहमी प्रमाणे नेटवर एबीपी माझा या वृत्त वाहिनीच्या वेब साईटवर बातम्या वाचत असतांना आज जितेंद्रची खरी कहाणी डोळ्यासमोर आली आणि स्वतःला लिहिण्यापासून रोखूच शकलो नाही.
दररोज पेपर हातात घेतल्यानंतर देशभरात कुठेतरी घडलेली बलात्काराची एक कहानी आपल्याला वाचायला मिळतेच.सायंकाळी कुठल्यातरी एका वृत्तवाहिनीवर तावातावाने बोलणारी लोकं दिसतात. अशा विषयांवर पान भरून लेख, बातम्या देणारे राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि कथीत समाज सुधारक यांच्यापैकी एकही जण पिडीत तरूणीला स्विकारण्यासाठी पुढे येत नाही किंवा आपल्या कुटुंबातील सदस्याला तसे करण्यास प्रोत्साहित करत नाही.अमुक कायदा झाला पाहिजे,कारवाई झाली पाहिजे,दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, समाजात विकृती वाढत चालली आहे, अशी मोठमोठी फक्त भाषणे ठोकतात.परंतु हरियाणातील जिंद जिल्ह्यातील जितेंद्र छत्तर या २९ वर्षीय तरूण शेतकर्याने आजपर्यंत कुणी दाखविली नाही, अशी हिंमत या पठ्ठ्याने केली आहे. आपल्या भावी पत्नीवर सामुहिक बलात्कार झाल्याचे माहिती असून देखील जितेंद्रने लग्न केले.आज खर्या अर्थाने एका रिअल हिरोला यानिमित्ताने बघायला मिळाले.मित्रा जितेंद्र, सलाम… सलाम… तुला त्रिवार सलाम…! अशी हिंमत नैतिक पातळीवर सच्चा असलेला एक सज्जन व्यक्तीच दाखवू शकतो.बोलण्यातून नव्हे तर, आपल्या कृतीतून भाई…तु एक आदर्श निर्माण केला आहे.
गेल्या डिसेंबर महिन्यात जितेंद्रच्या भावी पत्नीवर एका खाजगी क्लास चालकाने आपल्या साथीदाराच्या मदतीने सामुहिक बलात्कार केला होता. याची वाच्यता केल्यास जिवेठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे तरूणी आपल्या कुटुंबियांचे म्हणणे ऐकत गप्पच राहिली.परंतु आयुष्याची सुरुवात खोट्याने करायची नाही.एका निष्पाप तरूणाला फसवून आपण स्वत: आयुष्यभर कसे सुखी राहणार. आपले लग्न मोडले तरी चालेल, परंतु कुणाला फसवायचे नाही म्हणून तिने जितेंद्राला सर्व हकीकत सांगितली आणि त्याला दुसरीकडे लग्न करण्याचा सल्ला दिला. परंतु जितेंद्रने यात तुझा काय दोष म्हणत,तिच्यासेाबत लग्न केले.ऐवढेच नव्हे तर पोलीसात तक्रार देत त्या नराधमांना अटक करावयास भाग पाडले.त्यानंतर जितेंद्रने देशातील बलात्कार पिडीत तरूणींना न्याय मिळावा म्हणून ‘यूथ अगेन्स्ट रेप’ ही मोहिम हाती घेत आपल्या पत्नीला कायद्याच्या अभ्यास क्रमाला प्रवेश घेवून दिला आहे.बलात्कार पिडीतसाठी तिने आयुष्यभर काम कराव असं जितेंद्र म्हणतो. तर जितेंद्रसारखा पती हा सर्वांच्या नशिबात नसतो, म्हणूनच मी स्वत:ला नशिबान समजते, अशी त्याची पत्नी सांगते.
खरच मित्रांनो, बलात्कार पिडीतांना आपली सहानभूती फक्त शरीरावरच्या जखमा भरण्यास मदत करते.तिच्या मनावरील जखमा मात्र आयुष्यभर तशाच राहतात.अशा प्रकरणांमध्ये समाजातील लोक नव्हे तर काय घरातील मंडळीही पिडीत तरुणीच्या वागणुकीला किंवा कपड्यांना दोष देतात.यामुळे या अपमानासोबत जीवन जगणे तिला कठीण होऊन बसते. परंतु जितेंद्रने समाजासमोर आज एक आदर्श निर्माण केला आहे.मला तर वाटते, शासनाने जितेंद्रचा सत्कार करत त्याच्या ‘युथ अगेन्स्ट रेप’ या मोहिमेला मदत केली पाहिजे.
(एबीपी माझा बातमीची लिंक )
http://abpmajha.abplive.in/india/haryana-man-marries-gang-rape-victim-enrols-her-in-law-course-to-seek-justice-259092
ञिवार मानाचा मुजरा ….पुढिल वाटचालीस शुभेच्छा जितेंद्
waghmare sir good