आज सकाळच्या अंकात आमचे मित्र रईस शेख यांची शहरात तीन दिवसापासून ड्रोनच्या मदतीने टेहळणी होत असल्याची बातमी वाचली, यांच्या आधीही रईसभाईंने गणपती विसर्जनच्या ड्रोनच्या सहाय्याने मिरवणुकीवर नजर ठेवली जात असल्याची बातमी सर्वात आधी दिली होती. खर या बातम्या वाचल्यानंतर भारतात ड्रोनला उडविण्याची परवानगी आहे का? ड्रोन उडवित असतांना अपघात झाला तर ? ड्रोन उडविणार्यांनी प्रशिक्षण घेतले आहे का? आकाशात टेहाळणी करणारे ड्रोन उडण्यासाठी योग्य आहेत का? अस अनेक प्रश्न मनात निर्माण झाले. गुगलाई केल्यानंतर नागर विमानन मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर पोहचलो, मंत्रालयाने प्रसिध्द केलेले एक नोटीफीकेशन वाचले आणि धक्काच बसला कारण, आपल्या जळगावच्या आकाशात ड्रोनची बेकायदा उड्डाने होत असल्याचे यानिमित्ताने माझ्या समोर आले होते.
गेल्या वर्षभरा पूर्वी आमचे कार्यकारी संपादक शेखर पाटील साहेब यांच्या सोबत ड्रोन घेण्याबाबत माझे ठाम मत झाले होते. पाटील साहेबांचा ड्रोनच्या बाबतीत असलेला गहन अभ्यास थक्कच करणारा आहे. आपल्या देशात कुठल्याही सिव्हीलीयन माणसाच्या ड्रोनच्या वापरावर स्पष्टपणे निर्बंध असल्याचे समजल्यामुळे ड्रोन घेण्याचा बेत त्यावेळी आम्ही रद्द केला होता. मुंबई पोलिसांनी मागील वर्षी जुलै महिन्यात दहशतवाद्यांकडून पॅराग्लायडर्स, रिमोटद्वारे उडणारे छोटे विमान किंवा ड्रोन यांचा वापर केला जाण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मुंबईच्या अकाशात कुठेही ड्रोन, रिमोटद्वारे चालणारे छोटे विमान उडविण्यास आणि पॅराग्लायडिंग करण्यास बंदी घालण्यात आली. दुसरीकडे मात्र जिल्हा पोलीस दलाने या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सुरक्षतेच्या दृष्टीने शहरात ड्रोनच्या मदतीने टेहाळणी केली. त्याचप्रकारे डॉ.उल्हास पाटील यांच्या घरी असलेल्या विवाह सोहळ्यात देखील ड्रोन आकाशात उडत होते.महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी देखील ड्रोन आकाशात घिरट्या घालत होते. आपल्या देशासह जगात ड्रोणच्या सदोष उड्डाण व उडविणार्याच्या अज्ञानामुळे अनेक छोट्या-मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. ड्रोनद्वारे टेहाळणी करत असतांना अपघात किंवा काही दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण ? ड्रोनचा मालक कि,उडविणारे ? जगाच्या कोणत्याही देशात ड्रोनच्या विक्रीवर बंदी नाही.त्याच पद्धतीने आपल्या भारतातही ड्रोन सहज मिळते.परंतु त्याला उडविण्याची परवानगी कुणालाही नाही.खरा प्रश्न असा आहे की,ड्रोन उडविण्याचे प्रशिक्षण कोणी मान्यता प्राप्त संस्थेतून घेतले आहे का ? ड्रोनच्या तंत्रज्ञानाविषयी माहिती नसलेल्या व्यक्तीने ड्रोन अशा पध्दतीने गर्दीच्या ठिकाणी उडविणे कितपत योग्य आहे. आकाशात घिरट्या घालणारे ड्रोन किती उंचीवरुन व कशा पध्दतीने उडण्या योग्य आहे याचे प्रमाणपत्र कोण देणार? देशाची सेना वगळता इतरांकडून ड्रोनच्या उड्डाणावर कायदेशीर बंदी आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस दलाकडून ड्रोणचा झालेला वापर कितपत योग्य होता. याबाबत शासनाकडून निर्देशन मागविल्यानंतरच खुलासा होवू शकतो.
जिल्ह्यातील संवेदनशिल ठिकाणे धोक्यात
आपल्या जिल्ह्याला सिमीसारख्या दहशतवादी संघटनेची पार्श्वभूमी आहे. मुंंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी जळगावच्या एका तरुणाला नुकतीच फाशीची शिक्षा झाली आहे. जळगावलगत असलेल्या धुळे जिल्ह्यातून इसिसच्या प्रभावाखाली असलेल्या तरुणांना देखील नुकतीच अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यात भुसावळ आयुध निर्माणी,दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्प,भुसावळ मिल्ट्री कॅम्प,वाघुर व हतनूर धरणसारखे संवेदनशील ठिकाण असतांना अशा उघडपणे ड्रोनचा वापर भविष्यात खूप धोकादायक ठरु शकतो. इतक्या स्वस्तात उपलब्ध होणारे हे तंत्रज्ञान वापर दहशतवादी संघटना किवा मनोविकृत लोकांकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शत्रूच्या प्रदेशात टेहळणी करण्यासाठी वापरले जाणारे ड्रोन आता थेट हल्ला करणारी शस्त्रस्त्रे वाहून नेण्यात तरबेज झाले आहेत हे देखील विसरून चालणार नाही.
काय म्हटले आहे नागर विमानन मंत्रालयाने नोटीफिकॅशनमध्ये
नागर विमानन मंत्रालयाने ७ डिसेंबर २०१४ रोजी File no.05-13/2014-ED à‘mUo (Use of Unmanned erial Vehicle (UV) Unmanned ircraft Systems (US) for Civil pplications) म्हणजे मानवरहित हवाई वाहन व मानवरहित हवाई वाहन प्रणाली (ड्रोन) या विषयाला धरून एक नोटीफीकेशन काढले आहे.त्यात त्यांनी वरील प्रणालीच्या सर्वसामन्य नागरिकाच्या व्यावसायिक,व्ययक्तीक व मनोरंजनात्मक वापरावर स्पष्टपणे बंदी घातली आहे.नागर विमानन मंत्रालयाने मानवरहित हवाई वाहन प्रणालीच्या सुरक्षित वापर तसेच सुरक्षतेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे नमूद केले आहे.त्याच्यामुळे आकाशात विमानांसोबत अपघात होण्याच्या धोका असल्याचे देखील सांगितले आहे. मानवरहित हवाई वाहन प्रणाली (ड्रोन)चा कोणताही नागरी उपयोग करण्याआधी वापराबाबत नागर विमानन मंत्रालय,संरक्षण मंत्रालय,गृह मंत्रालय तसेच संबंधित सुरक्षा यंत्रणेकडून परवानगी घेणे आवश्यक आहे.नागर विमानन मंत्रालयाचे डायरेक्टर जनरल (DGC) हे सध्या मानवरहित हवाई वाहन व मानवरहित हवाई वाहन प्रणाली यांच्या बाबत एक व्यापक धोरण तयार करीत आहेत.यांच्या वापराबाबत शासनाचे धोरण लवकरच निश्चित होणार आहे.तो पर्यत मात्र,गैरसरकारी संस्था किवा व्यक्ती खाजगी पातळीवर देखील याचा उपयोग करू शकत नाही.
नागर विमानन मंत्रालय नोटीफिकॅश लिंक
(http://dgca.nic.in/public_notice/PN_UAS.pdf)
https://www.youtube.com/watch?v=Z4EE7Vv_RdM