जिंदगी जिंदाबाद
    No Result
    View All Result
    No Result
    View All Result
    जिंदगी जिंदाबाद
    No Result
    View All Result

    कुरआन – शांतता आणि प्रेमाने जीवन जगण्याचा आदर्श मार्ग !

    admin by admin
    October 16, 2016
    in Uncategorized
    0
    कुरआन – शांतता आणि प्रेमाने जीवन जगण्याचा आदर्श मार्ग !

    quran
    काही जण मी इस्लामचा प्रचार करीत आहे,जगात एवढ्या निष्पाप लोकांची हत्या होत असतांना हा कोणत्या विषयावर लिहित आहे.या सारखे  अनेक प्रकारच्या टीका,आरोप माझ्यावर करण्यापूर्वी स्पष्ट करू इच्छितो की, माझ्या मते जगातला कुठलाही धर्म चुकीच्या गोष्टी शिकवीत नाही.सध्या जगातील दहशतवादी घटना बघता इस्लाम आणि सर्वच मुस्लीम धर्मीयांबद्दल निर्माण झालेले गैरसमज यानिमित्ताने काही प्रमाणात का असेना दूर होऊ शकतील ही अपेक्षा ठेवूनच हे लिहिण्याचे ठरविले होते.

    मित्रांनो काही दिवसांपूर्वी ‘इस्लाम खरा आणि खोटा’  वर लिहित असतांना नेट सर्चिंग करीत असतांना नौशाद उस्मान यांचा ब्लॉग पहिला या ठिकाणी कुरआन-सार वाचायला मिळाले. कुरआन हे खर्‍या अर्थाने परिपूर्ण जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक आहे.परमेश्वराने मानवी जीवनाला सर्वोच्च पद्धतीने परमेश्वराने आखून दिलेल्या चौकटीत नैतिकता आणि प्रेमाने कशाप्रकारे जगता येते याचा आदर्श मार्ग कुरआन सांगते. कुरआन-सार वाचत असतांना ज्यावेळी त्याच्या पहिल्याच खंडात प्रेषित येशू खिस्तांचा उल्लेख वाचून चकितच झालो.खंड ४ मध्ये प्रेषित येशू खिस्तांची कुमारीका आई मरियम (मेरी) यांची आई, मेरींचा जन्म, त्यानंतर येशू खिस्तांचा कुणीही पिता नसतांना असामान्य जन्म याविषयी विवेचन करण्यात आले असून यात मदर मेरी यांच्या चारित्र्यावर शिंतोळे उडविणार्‍यांना त्या चारित्र्यवान असल्याचे सांगून चोख उत्तर देण्यात आले आहे. तसेच प्रेषित येशू खिस्तांचा उल्लेख कुराणात चोविसपेक्षा जास्त ठिकाणी आढळतो. यानिमित्ताने दुसर्‍या धर्मातील देवतांबद्दलचा आदर देखील कुरआनमध्ये आपणास दिसून येतो.यावरून लादेन असो कि अन्य कुणी कथित मुस्लीम ठेकेदारांची ख्रिस्ती धर्माबद्दलची कट्टरता किती निरर्थक आणि इस्लाम विरोधी आहे हेच सिद्ध होते. ईश्वरी प्रेमापोटी आपल्या नातेवाईकांची, गोरगरिबांची, अनाथांची, प्रवाशांची मदत करणे आणि पददलितांच्या मूक्तीसाठी मदत करणे जास्त पुण्याईचे काम असल्याचा संदेश देखील इस्लाम देतो.पवित्र कुरआन हा ग्रंथ समस्त मानव जातीकरिता असून तो कुठल्याही एका समुदायापुरता मर्यादित नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
    आज आपण सर्वत्र भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणावर बोकाळला आहे हे उघड डोळ्यांनी पाहत आहे.त्याच भ्रष्टाचाराबद्दल साधारण १४००वर्षापूर्वीच कुरआनमध्ये लिहिलेले असल्याचे पाहून माणूस थक्कच होतो. भ्रष्टाचार करून किवा अधिकार्‍यांना लाच देऊन एकमेकांचा माल हराम पद्धतीने बळकावण्यास तीव्र शब्दात मनाई करण्यात आली आहे. जगात आज इस्लामच्या नावाखाली दहशदवाद माजविणारे खरे इस्लामचे दुश्मन असल्याचे देखील यावेळी आपल्याला कळते. कारण कुरआननुसार अल्लाह (परमेश्वर)अतिरेक्यांना पसंत करीत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले असून हिंसा वाईट असली तरीही मात्र आंतक हा हिंसेपेक्षा जास्त वाईट असल्याचे म्हटले आहे.विशेष म्हणजे गैर इस्लामिक असल्याच्या कारणावरून आज हजारो,लाखो निर्दोष लोकांची इस्लामच्या नावाखाली हत्या करणार्‍या दहशतवाद्यांना कुरआनमध्ये स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की, कुराण कोण्या एका समुदायाची मिरासदारी नसून तो समस्त जगतवासियांकरिता आहे. फक्त अरबी किंवा उर्दू बोलणार्‍यांसाठी नव्हे तर मराठी, इंग्रजी, जापानी सगळ्या भाषा बोलणार्‍यांंकरिता हा उपदेश आहे आणि सर्वांना त्याचा परिचय करून देण्याची जबाबदारी मुसलमानांची आहे, ती त्यांनी पार पाडायला हवी असे सांगण्यात आले आहे. मात्र,दुर्दैवाने या दहशदवाद्यांनी कोणते कुरआन वाचले आहे हे त्यांनाच माहित.
    मानवाची निर्मिती, त्याला भाषेवर दिलेलं प्रभुत्त्व, धरती-आकाशातले चंद्र, ग्रह, तारे सर्व एका नियमानुसार शिस्तीने आपापल्या कक्षेत फिरत आहेत, विश्व हे संतुलित बनविण्यात आले आहे. लोकांनीही संतुलन राखावं अशी इथे अप्रत्यक्षपणे अपेक्षा कुरआनमध्ये व्यक्त केली गेली आहे.म्हणूनच मग सामाजिक संतुलन बिघडवणारे हे काफिर नाही तर कोण आहेत असा प्रश्न स्वाभाविक उपस्थित होतो.आज जगात मुस्लीम वस्त्या जवळपास सर्वच ठिकाणी वेगळे राहत असल्याचे आपल्या निदर्शनास येते,अर्थात काही तथाकथित कट्टर मुस्लीम धर्मगुरु यांनी मुसलमान हा इतरांपासून वेगळा असल्याचे सांगून इस्लामच्या नावावर त्यांच्या मनात काही चुकीच्या गोष्टी बिंबवून त्यांना इतर धर्माच्या लोकांपासून अप्रत्यक्षरित्या वेगळे राहण्यापासून किवा अंतर ठेवण्यास भाग पाडतात.परंतु  सर्वसाधारण चांगल्या मनाच्या मुस्लीमेतरांशी सदाचाराने वागण्याची तसेच त्यांच्याशी बंधुभावाचे संबंध बनविण्याची कोणतीही मनाई इस्लाममध्ये करण्यात आलेली नसल्याचेदेखील आपल्याला कुरआन-सारमध्ये वाचण्यास मिळते.
    संक्षिप्त कुरआन सार वाचण्यासाठी नौशाद उस्मान यांच्या ब्लॉगची लिंक
    (https://naushadusman.wordpress.com/2013/05/22/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%86%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A9%E0%A5%A6-%E0%A4%96/)

    Tags: quran sharifvijay waghmare journalistइस्लामकुराणविजय वाघमारे पत्रकार जळगाव
    Previous Post

    इस्लाम – खरा आणि खोटा !

    Next Post

    खडसेंना एकटे पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा डाव !

    Next Post
    खडसेंना एकटे पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा डाव !

    खडसेंना एकटे पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा डाव !

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    No Result
    View All Result

    Recent Posts

    • सोहराबुद्दीन चकमक : रक्तरंजित धुकं !
    • गुजरात फाईल्स : राजकारण्यांचा बेगडी बुरखा फाडणारं पुस्तक !
    • हरेन पांड्या खून प्रकरण : मोदींवर आरोप ते सुप्रीम कोर्टाचा निकाल…!
    • सोहराबुद्दीन बनावट चकमक : अनेक अनुत्तरीत प्रश्नांची मालिका !
    •  ‘अत्त दिप भवं’ ! 

    Recent Comments

    • मनोहर चौधरी on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • Harshal Talele on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • अमोल पाटील on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • Vasudeo Borole on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • पाटील चंद्रशेखर on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !

    Archives

    • November 2019
    • September 2019
    • July 2019
    • June 2019
    • May 2019
    • April 2019
    • February 2019
    • January 2019
    • December 2018
    • November 2018
    • October 2018
    • September 2018
    • August 2018
    • July 2018
    • June 2018
    • May 2018
    • April 2018
    • March 2018
    • February 2018
    • January 2018
    • December 2017
    • November 2017
    • October 2017
    • September 2017
    • April 2017
    • March 2017
    • January 2017
    • December 2016
    • October 2016
    • September 2016
    • August 2016
    • July 2016
    • June 2016
    • May 2016
    • April 2016
    • March 2016
    • February 2016
    • January 2016
    • December 2015
    • November 2015
    • October 2015
    • August 2015
    • July 2015
    • June 2015
    • May 2015
    • April 2015
    • March 2015
    • February 2015
    • January 2015

      © 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

      No Result
      View All Result

        © 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.