जिंदगी जिंदाबाद
    No Result
    View All Result
    No Result
    View All Result
    जिंदगी जिंदाबाद
    No Result
    View All Result

    कासीम : बोथट संवेदनांचा बळी !

    admin by admin
    June 23, 2018
    in Uncategorized
    0
    कासीम : बोथट संवेदनांचा बळी !

     

    मिडिया विजीलने प्रसारित केलेल्या या वृत्तातील व्हिडीओ बघून प्रचंड अस्वस्थ झालोय. म्हणे…प्राण्यापासून माणसापर्यंतचा प्रवास हा नैसर्गिक होता. परंतु माणसापासून पुन्हा पशु…नुसता पशु नव्हे तर हिंसक पशु होण्याचे उलटे संक्रमण, हे विकृत विचारधारेचे द्योतग आहे. अरे…मरणाऱ्याला आपण साधं पाणी पाजत नाही,कुणीही त्याला मदत करत नाहीय, एवढ्या नीच दर्ज्याच्या विचारधारेमुळे तुमच्यातला माणूस कधीच मेलाय. आता तुम्ही फक्त हैवान आहात, फक्त हैवान !  बुद्ध- महावीरांच्या देशात पुन्हा एक कासीम बोथट संवेदनांचा बळी ठरलाय.

    कोणत्याही हिंसेचे समर्थन कुठल्याही परीस्थित होऊ शकत नाही. त्याच प्रकारे एका माणसाने दुसऱ्या हाडामासाच्या माणसाला मारण्यासाठी कधीच कुठलेही कारण योग्य ठरवले जाऊ शकत नाही. ज्या देशातून बुद्ध आणि महावीर यांनी अवघ्या जगाला शांतीचा संदेश दिला. त्याच देशात आज, अविवेकी लोकं झुंडशाहीच्या जोरावर धर्माची ताकद सिद्ध करू पाहताय. अशा हिंसेचे कोणताही संवेदनशील व्यक्ती समर्थन करूच शकत नाही. गो रक्षेच्या नावाखाली झुंडशाही करायची हे कुठला धर्म शिकवतोय. एक माणूस प्रचंड जखमी अवस्थेत पाणी-पाणी मागून मारतोय आणि काही जण व्हिडीओ काढताय. 

    उत्तर प्रदेशमधील हापूड येथील कासिमच्या या व्हिडीओमध्ये अनेक अल्पवयीन मुलं आजूबाजूला उभी असल्याची दिसताय. त्यामुळे आज आपण स्वतःला निश्चितच एक प्रश्न विचारण्याची गरज आहे. माझ्या परिवारातील माझा मुलगा, भाचा किंवा अन्य कुणीही अशा हिंसक झुंडचा भाग बनला पाहिजे का? जर तुमचे उत्तर नकारात्मक असेल तर, त्याला पुन्हा एकदा भारतीय सहिष्णुता आणि संस्कृती समजावून सांगा. कारण राजकीय उद्देश सफल करण्यासाठी कुणी तरी त्याचा मेंदूचा ताबा घेण्याचा धोका आहे. आपला पोरगा कुणाच्या विचारधारेने संमोहित होऊन कट्टरपंथी होण्याचीही शक्यता आहे. पण एक लक्षात घ्या, कुठल्याही पद्धतीच्या कट्टरतेचा प्रवास शेवटी हा विनाशाकडेच असतो.

    आपल्या देशात कुणालाही कोणताही विचार स्विकारण्याचे स्वातंत्र्य आहे. फक्त त्यांनी इतकाच विचार करणे गरजेचे आहे कि कोणतीही धार्मिक संघटना जो विचार मांडतात, तो खरच आपल्या भारतीय समाजाच्या भल्याचा आहे का ?, माझा मुलगा बुद्ध,महावीर यांच्या सहिष्णू पथावर चालणारा बनला पाहिजे की, गोडसेच्या हिंसेच्या मार्गावर गेला पाहिजे? अशा गंभीर प्रश्नांची उत्तरे प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने शोधण्याची गरज आज निर्माण झाली आहे.

    आपला भारत बुद्ध,महावीर आणि गांधी यांच्या नावाने जगात ओळखला जातो. काही चुकांमुळे आपण ही ओळख पुसत तर नाहीय ना? असा प्रश्न निर्माण व्हावा एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसेची विचारधारा आज देशात बघावयास मिळतेय. त्यामुळे जाती-जातीत, धर्मा-धर्मात भांडणे करून कुणाचे भले होणार आहे ? या निरर्थक संघर्षातून काय साध्य होणार आहे ? या गोष्टींचा विचार देखील प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.

    कुणी कितीही नाकारले तरी, हिंसा माणसाला विकृत बनवते,हे वैश्विक सत्य आहे. मुळात जिथे वैचारिक प्रतिवाद शक्य आहे तिथे तर हिंसेचा मागमूसही नको. शेवटी सर्वसामान्य भारतीयाला आजही त्याचा मुलगा खुनी किंवा विकृत म्हणून नव्हे, डॉक्टर,इंजिनिअर, शिपाई फार काही नाही तर हातमजुरी करणारा सज्जन व्यक्ती म्हणूनच देखील बघायला आवडतो.

     

    व्हिडीओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

    https://www.youtube.com/watch?v=geqiVJEnWuQ

    Tags: jalgaonvijay waghmare journalistकासिमगो रक्षाविजय वाघमारे पत्रकार जळगावहापुड़ उत्तर प्रदेश
    Previous Post

    पुनरुत्थान समरसता गुरुकुलम : उपेक्षितांच्या बालपणाला आकार देणारी शाळा !

    Next Post

    अमित शहांची बातमी अन् माध्यमांची मुस्कटदाबी !

    Next Post
    अमित शहांची बातमी अन् माध्यमांची मुस्कटदाबी !

    अमित शहांची बातमी अन् माध्यमांची मुस्कटदाबी !

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    No Result
    View All Result

    Recent Posts

    • सोहराबुद्दीन चकमक : रक्तरंजित धुकं !
    • गुजरात फाईल्स : राजकारण्यांचा बेगडी बुरखा फाडणारं पुस्तक !
    • हरेन पांड्या खून प्रकरण : मोदींवर आरोप ते सुप्रीम कोर्टाचा निकाल…!
    • सोहराबुद्दीन बनावट चकमक : अनेक अनुत्तरीत प्रश्नांची मालिका !
    •  ‘अत्त दिप भवं’ ! 

    Recent Comments

    • मनोहर चौधरी on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • Harshal Talele on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • अमोल पाटील on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • Vasudeo Borole on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • पाटील चंद्रशेखर on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !

    Archives

    • November 2019
    • September 2019
    • July 2019
    • June 2019
    • May 2019
    • April 2019
    • February 2019
    • January 2019
    • December 2018
    • November 2018
    • October 2018
    • September 2018
    • August 2018
    • July 2018
    • June 2018
    • May 2018
    • April 2018
    • March 2018
    • February 2018
    • January 2018
    • December 2017
    • November 2017
    • October 2017
    • September 2017
    • April 2017
    • March 2017
    • January 2017
    • December 2016
    • October 2016
    • September 2016
    • August 2016
    • July 2016
    • June 2016
    • May 2016
    • April 2016
    • March 2016
    • February 2016
    • January 2016
    • December 2015
    • November 2015
    • October 2015
    • August 2015
    • July 2015
    • June 2015
    • May 2015
    • April 2015
    • March 2015
    • February 2015
    • January 2015

      © 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

      No Result
      View All Result

        © 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.