जिंदगी जिंदाबाद
    No Result
    View All Result
    No Result
    View All Result
    जिंदगी जिंदाबाद
    No Result
    View All Result

    एस्केप फ्रॉम तालिबान : लढा एका मर्दानीचा

    admin by admin
    December 11, 2016
    in चित्रपट समीक्षण
    0
    एस्केप फ्रॉम तालिबान : लढा एका मर्दानीचा

    escapetalibanआंधळ्या प्रेमाच्या ओढात देश, धर्म सोडून स्वप्नाच्या जगात राहण्याचा इरादा उराशी बाळगुन कोलकत्त्यातून थेट अफगणिस्तानात जाणारी एक तरूणी आणि त्याच काळात तालिबानिंचा होणारा उदय, त्यांच्या सोयीनुसार लागू केलेला शरीयत कायदा,या सर्वांसोबत लढून भारतात परतणार्‍या एका मर्दानीचा लढा ‘एस्केप फ्रॉम तालिबान’ या चित्रपटातून दाखविण्यात आला आहे.

    हा चित्रपट काल्पनिक नसून कोलकत्त्याच्या प्रसिध्द लेखिका सुष्मिता बॅनर्जी यांच्या जिवनातील सत्य घटनेवर आधारीत पुस्तक ‘एक काबुलीवाला की बंगाली पत्नी’ वरून बनविण्यात आला आहे. चित्रपटाची कथा पश्‍चिम बंगालमधील कलकत्ता शहरात १९८८च्या दशकात सुरू होते. एका मध्यमवर्गीय परिवारातील तीन भावांची एककुलती एक बहिण असणारी सुष्मिता एकेदिवशी जाबाज खान नामक तरूणाला भेटते. अफगणिस्तानातून व्यापार करण्यासाठी भारतात आलेला जाबाज काही दिवसातच सुष्मिताच्या जवळ पोहोचतो. प्रत्येक प्रेम कहाणीनुसार यांच्यातही प्रेमाच्या आणाभाका होतात. सैन्यात असलेले सुष्मिताचे वडिल या विवाहाच्या विरोधात जातात. त्यामुळे जाबाज सुष्मितासमोर अफगणिस्तानातील खोटे चित्र उभे करत तिला थेट आपल्या देशात नेतो. अफगणिस्तान व पाकिस्तानच्या सिमेलगत असलेल्या पटीया गावात दोघे जात असतांनाच रस्त्यात तालिबानी आणि स्थानिक नागरिकांसोबत सुरू असलेल्या युध्दाचा सामना सुष्मिताला करावा लागतो. एखादं खंडहर प्रमाणे असणार्‍या गावात प्रवेश केल्यानंतर जाबाजच्या भावांकडून सुष्मिताच्या स्वागतासाठी बोकडाची मान छाटत तिच्या पायाजवळ फेकून तिला रक्ततिलक लावण्याचा प्रयत्न होतो. भेदरलेल्या सुष्मिताला जाबाजने अफगणिस्तानचे खोटे चित्र आपल्यासमोर रंगविल्याची जाणीव होते. जाबाजचे तीन भाऊ त्यांच्या पत्नी व गुलगुटी नामक महिला राहत असते. अनेकवेळा विचारून देखील सुष्मिताला घरातील कोणीही गुलगुटीबाबत काही एक सांगत नाही. एकेदिवशी आपल्या पतीला गुलगुटीसोबत शरीरसंबंध करतांना सुष्मिता रंगेहात पकडते, गुलगुटी ही जाबाजची पहिली बायको असल्याचे माहित पडल्याबरोबर पायाखालची जमीनच सरकते. येथूनच जाबाज आपला खरा रंग दाखवायला सुरूवात करतो. एका छोट्या खोलीत सुष्मिता बाजूला झोपलेली असतांना गुलगुटीसोबत शरीरसंबंध ठेवतो. या घटनेमुळे सुष्मिता कमालीची हताश होते. शेवटी आत्महत्या करण्याचा प्रयत्नदेखील करते. परंतु त्यातदेखील जाबाजदेखील तिला यशस्वी होऊ देत नाही. काही दिवस असे सहज निघत असतांना गावात हळूहळू तालिबानी आपले हातपाय पसरायला सुरूवात करत असतात. जाबाज पुन्हा एकदा भारतात व्यापारासाठी परतलेला असतो तर दुसरीकडे सुष्मिताचा तालिबानीतून बाहेर पडण्याचा संघर्ष सुरू होतो. गुलगुटीबद्दल सुष्मिताच्या मनात सहानुभूती असते. कारण रूढी, परंपरा आणि धर्माच्या नावाखाली तिचा प्रचंड छळ होत असतो. याच दरम्यान जाबजचा भाऊ कालाच्या पत्नीला मुलगी होते.गर्भपातामुळे मातृत्व गमवलेली सुश्मिताला या मुलीला दत्तक घेते.टीन्नी हळू-हळू मोठी होते.यानंतर अफगणिस्तानमधून बाहेर पडण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर दुसर्‍या प्रयत्नात सुष्मिता अर्थात साहिब कमाल थेट पाकिस्तानात पोहचते. परंतु त्या ठिकाणाहून पुन्हा तीला जबरीने अफगणिस्तानात आणले जाते. या काळात कट्टरत्यावाद्यांच्या विरूध्द सुष्मिता उघड भूमिका घेत असते. शरीयतच्या कायद्याचा हवाला देत महिलांवर केल्या जाणार्‍या अत्याचाराविरूध्द ती बंड करते. अनेकदा तालिबानीसोबत तीची चकमक उडते. याच दरम्यान तीला काफीर घोषीत करून तालिबानी आणि गावातील काही मौलवी कोडे मारण्याची शिक्षा देतात. मर्दानी असलेली सुष्मिता हा अत्याचार सहन न करता त्या ठिकाणाहून तीन तालिबान्यांची हत्या करून जाबाजच्या मोठ्या भावाच्या सहकार्याने अफगणिस्तानातून पुन्हा भारतात येते. एखादं स्त्रीला तालिबान्यांसोबत लढत असल्याची काल्पनिक कहाणी आपण ऐकली असेल. परंतु वास्तविक जीवनात क्रुरकर्मा तालिबान्यांसमोर टिकाव धरणे किती कठीण असते हे सुष्मिताच्या संघर्षावरून जाणवते.
    सुष्मिताचा साहिब कमाल होण्यापर्यंतचा प्रवास अभिनेत्री मनिषा कोईरालाने पुर्ण ताकदीने निभावला आहे. चित्रपटाची गती काही ठिकाणी मंदावते, परंतु रिऍलिस्टीक सिनेमा बघतांना या गोष्टी फारशा अडथळा आणत नाहीत. मनिषा कोईरालाच्या अभियनाने या चित्रपटात कमालीची जान ओतली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक यु.चॅटर्जी यांनीही आपली पुर्ण ताकद लावली आहे. परंतु कमर्शिअल अँगल ठेवल्यामुळे काही ठिकाणी चित्रपट रेंगाळतो. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी कमालीची आहे. वेगळ्या धाटणीचे आणि सत्य घटनेवर आधारीत कलाकृती बघण्याची इच्छा असेल तर ‘एस्केप फ्रॉम तालिबान’ हा चित्रपट बघण्यासारखा आहे.
    सुष्मिता बॅनर्जी या भारतात परत आल्यानंतर आपल्या जिवनातील अनुभव ‘एक काबुलीवाला की बंगाली पत्नी’ या पुस्तकातून जगासमोर मांडले.२००३मध्ये या पुस्तकावरून हा चित्रपट बनविण्यात आला होता.२०१३ मध्ये आपल्या पतीसोबत पुन्हा एकदा सुष्मिता बॅनर्जी या पुन्हा अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या हिताचे कार्य करण्यासाठी गेल्यानंतर ४ सप्टेबर रोजी तालिबान्यांनी घरात घुसून त्यांची हत्या केली होती.

    sss

    एस्केप फ्रॉम तालिबान चित्रपटाची लिंक

    https://www.youtube.com/watch?v=92y6FQs7i10

    Tags: afganistancivil codemoviesushmita banarjitalibanvijay waghmare journalistअफगाणिस्तानतालिबानबोल पाकिस्तानी चित्रपटविजय वाघमारे पत्रकार जळगावसमान नागरी कायदा आणि गैरसमज
    Previous Post

    ओसामा : स्वःअस्त्विाची हारलेली लढाई

    Next Post

    शरियत कायदा आणि मुस्लीम समाज !

    Next Post
    शरियत कायदा आणि मुस्लीम समाज !

    शरियत कायदा आणि मुस्लीम समाज !

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    No Result
    View All Result

    Recent Posts

    • सोहराबुद्दीन चकमक : रक्तरंजित धुकं !
    • गुजरात फाईल्स : राजकारण्यांचा बेगडी बुरखा फाडणारं पुस्तक !
    • हरेन पांड्या खून प्रकरण : मोदींवर आरोप ते सुप्रीम कोर्टाचा निकाल…!
    • सोहराबुद्दीन बनावट चकमक : अनेक अनुत्तरीत प्रश्नांची मालिका !
    •  ‘अत्त दिप भवं’ ! 

    Recent Comments

    • मनोहर चौधरी on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • Harshal Talele on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • अमोल पाटील on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • Vasudeo Borole on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • पाटील चंद्रशेखर on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !

    Archives

    • November 2019
    • September 2019
    • July 2019
    • June 2019
    • May 2019
    • April 2019
    • February 2019
    • January 2019
    • December 2018
    • November 2018
    • October 2018
    • September 2018
    • August 2018
    • July 2018
    • June 2018
    • May 2018
    • April 2018
    • March 2018
    • February 2018
    • January 2018
    • December 2017
    • November 2017
    • October 2017
    • September 2017
    • April 2017
    • March 2017
    • January 2017
    • December 2016
    • October 2016
    • September 2016
    • August 2016
    • July 2016
    • June 2016
    • May 2016
    • April 2016
    • March 2016
    • February 2016
    • January 2016
    • December 2015
    • November 2015
    • October 2015
    • August 2015
    • July 2015
    • June 2015
    • May 2015
    • April 2015
    • March 2015
    • February 2015
    • January 2015

      © 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

      No Result
      View All Result

        © 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.