जिंदगी जिंदाबाद
    No Result
    View All Result
    No Result
    View All Result
    जिंदगी जिंदाबाद
    No Result
    View All Result

    एसपी बलजीतसिंग…लढवय्या पोलिस जातकुळीची प्रेरणा !

    admin by admin
    October 7, 2016
    in sp baljitsing, Uncategorized, एसपी बलजितसिंग
    0
    एसपी बलजीतसिंग…लढवय्या पोलिस जातकुळीची प्रेरणा !

    27-1438004676-slain-sp-baljeet-singhपाकिस्तानियों, दम है तो सामने आकर लड़ो, जैसे मैं खुलेमें खड़ा हूं्| जवाब मिला- हम तो ऐसे ही लड़ेंगे| बलजीत ने कहा- ‘तो फिर ठीक है, चुन-चुनकर मारेंगे | जहां भी छिपना है, छिप जाओ !  एसपी बलजीतसिंग यांनी युद्धभूमीत दहशतवाद्यांना समोरासमोर आव्हान देत चार तास सळो की,पळो करून सोडले होते.पित्याप्रमाणे दहशतवाद्यांशी लढताना शेवटी एक सच्चा देशभक्त युद्धभूमीवर शहीद झाला.लढवय्या पोलिस जातकुळीची प्रेरणा ठरलेल्या त्यांच्या या देशभक्तीला सलाम आहे; सलाम !
    पोलीस अधीक्षक बलजितसिंग,हेमंत करकरे,अशोक कामटे, तुकाराम ओंबळे यांच्या सारखे मर्द पोलिसवाले जोपर्यंत आपल्या देशात आहेत.तापर्यंत या आतंकवाद्यांना म्हणावं, सैनिक तर लांबच राहिले ;तुमच्यासाठी आमचे पोलिसच पुरेसे आहेत.नामर्दांसारखे पाठीमागून हल्ला करणार्‍यंानो बलजितसिंग यांच्यासारखे देशासाठी छातीवर गोळ्या झेलणारे देशभक्त तुम्हाला भारतात गल्लोगल्ली मिळतील.एकदा समोर येऊन लढा तर खर…,काश्मीर तुम्ही जिंकता की,अख्खा पाकिस्तान पुन्हा भारतात विलीन होतो, हे तुम्हाला तेव्हा कळेल.त्यांच्यासोबत लढणार्‍या एका स्वात टीमच्या कमांडोने बलजितसिंग यांच्या बहादुरीचा किस्सा सांगितला आहे.पंजाबच्या गुरदासपुरमध्ये आतंकवाद्यांनी  थेट हल्ला चढवल्यानंतर साधारण सकाळी ८ वाजता दीनानगर पोलिस स्टेशनच्या दुसर्‍या मजल्यावर तीन दहशतवादी लपले असल्याचे कळल्यानंतर एसपी बलजीतसिंग समोरच्या एका रुग्णालयाच्या इमारतीवर चढले तेथून त्यांनी दहशतवाद्यांवर गोळीबार सुरु केला.स्वात टीमचे कमांडो इमारतीच्या खालून दहशतवाद्यांवर फायरिंग करीत असतांना जिगरबाज पोलीस ऑफिसर बलजीतसिंग यांनी चार तास दहशतवाद्यांना समोरासमोर कडवी झुंज दिली.रुग्णालयाच्या टेरेसवर असलेल्या पाण्याच्या टाकीमागे बलजितसिंग दहशतवाद्यांपासून  केवळ ३५-४० फुट अंतरावर उभे राहत एका सैनिकाप्रमाणे आतंकवाद्यांचा सामना करीत होते.यावेळी आतंकवादी ‘पाकिस्तान जिंदाबाद’सह इतर घोषणा देत होते. त्यावर,बलजीतसिंग दहशतवाद्यांना खुले आव्हान देत म्हणाले की, पाकिस्तानियों ,दम है तो सामने आकर लड़ो, जैसे मैं खुले में खड़ा हूं्! जवाब मिला- हम तो ऐसे ही लड़ेंगे| बलजीत पुन्हा म्हणाले, ‘तो फिर ठीक है, चुन-चुनकर मारेंगे| जहां भी छिपना है, छिप जाओ !’यावरून बलजितसिंग यांच्यातला देशभक्त किती कडवा होता हे स्पष्ट होते.
    यावेळी बलजितसिंग यांच्यासोबत दहशदवादी पंजाबी भाषेतून बोलत असल्यामुळे ते दहशतवाद्यांना म्हणाले, तुम्ही पंजाबी आहात असे वाटते. पण तुम्हाला माहिती नाही खरे पंजाबी कसे असतात. हे आज आम्ही तुम्हाला दाखवू. तुम्ही येथे येऊन चुक केली आहे. तुमचे वय २०-२२ वर्षांचे वाटते. मी तुमच्यापेक्षा दुप्पट वयाचा आहे. तरीही येथे उभा आहे. हिंमत असेल तर समोर येऊन लढा यानंतर आतंकवाद्यानी पुन्हा एकदा तुफान गोळीबार सुरु केला.याच दरम्यान बलजीतसिंग हे टाकीच्या आसर्‍याला उभे असतांना इमारतीच्या खालून फायरिंग करणार्‍या एका स्वात कमांडोने त्यांना खाली येण्याची विनंती केली.परंतु मैदांतून मागे सरकतील ते बलजितसिंग कसले? आतंकवादी कुठे लपले आहेत ते कळाले असल्याचे कमांडाने सांगूनदेखील बलजितसिंग मागे सरकले नाहीत.त्यांनी कमांडोला सांगितले की,लढाई छुप के नही लडी जाती जवान,जो आगे बढता है,जीत उसीकी होती है ! आप  देखो…मै इन्हे जिंदाही पकडूंगा,आपभी आगे बढते रहो ! यावेळी आतंकवाद्यांच्या गोळ्या बलजितसिंग यांच्या आजुबाजूने भिरभिरत होत्या.बलजितसिंग यांचा आत्मविश्वास कमालीचा होता.दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार होत असतांना व तब्बल चार तास  दहशतवाद्यांशी मुकाबला सुरु असतांना त्यांनी एका मर्दाप्रमाणे दहशतवाद्यांना पुन्हा-पुन्हा आव्हान दिले.यादरम्यान एक गोळी बलजीतसिंग यांच्या डोक्याला लागल्यानंतर ते जबर जखमी झाले,अशा परिस्थितीतही बलजितसिंग यांचे शेवटचे वाक्य होते,मै इन्हें खदेड़केही दम लूंगा…!
    हा जांबाज पोलिस अधिकारी एकीकडे आपल्या मुलीच्या लग्नाची तयारी करीत होता.परंतु आतंकी हल्ला झाल्याचे कळताच थेट युद्ध मैदानावर गेला.शेवटी बलजितसिंग  आपल्या पित्याप्रमाणेच वतनपे जान कुर्बान करणार्‍या जातकुळीचेच होते ना ! त्यांचे वडीलही खलिस्तानवादी दहशतवाद्यांशी लढत शहीद झाले होते. अकाली पित्याचे छत्र हरवल्यावर बलजितसिंग यांनी कुटुंबासाठी खस्ता खात आपली कारकिर्द घडवली होती.देशभक्तीचा जुनून रक्ताच्या प्रत्येक थेंबातून जगाला दाखवून देणारा हा पंजाबी शौर्याचे मूर्तीमंत प्रतिक ठरलेला पोलिस अधिकारी प्रखर देशभक्तीच्या संस्काराला प्राणपणाने जपताना अतिरेक्यांना पुरुन उरला.प्रत्यक्ष संघर्षाची एक बाजू लावून धरत त्यांनी बाकीच्या जवानांचे मनोबल खचू दिले नाही.पंजाबमधील व देशातीलही नव्या पिढीला ९० च्या दशकातील दहशतवाद फारसा ज्ञात नसला तरी बलजितसिंग यांचे हौतात्म्य नवी प्रेरणा देणारे ठरेल.देशासाठी वीरमरण पत्करणार्‍या एका सच्चा मर्द पोलीसवाल्याला मानाचा सलाम !

    Tags: sp baljitsingvijay waghamre jalgaonvijay waghmare journalistएसपी बलजीतसिंग पंजाब
    Previous Post

    सलमान, याकुब आणि बेगडे देशप्रेमी…!

    Next Post

    आमदार हो…कहायले शोबाजी करता बे !

    Next Post
    आमदार हो…कहायले शोबाजी करता बे !

    आमदार हो...कहायले शोबाजी करता बे !

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    No Result
    View All Result

    Recent Posts

    • सोहराबुद्दीन चकमक : रक्तरंजित धुकं !
    • गुजरात फाईल्स : राजकारण्यांचा बेगडी बुरखा फाडणारं पुस्तक !
    • हरेन पांड्या खून प्रकरण : मोदींवर आरोप ते सुप्रीम कोर्टाचा निकाल…!
    • सोहराबुद्दीन बनावट चकमक : अनेक अनुत्तरीत प्रश्नांची मालिका !
    •  ‘अत्त दिप भवं’ ! 

    Recent Comments

    • मनोहर चौधरी on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • Harshal Talele on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • अमोल पाटील on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • Vasudeo Borole on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • पाटील चंद्रशेखर on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !

    Archives

    • November 2019
    • September 2019
    • July 2019
    • June 2019
    • May 2019
    • April 2019
    • February 2019
    • January 2019
    • December 2018
    • November 2018
    • October 2018
    • September 2018
    • August 2018
    • July 2018
    • June 2018
    • May 2018
    • April 2018
    • March 2018
    • February 2018
    • January 2018
    • December 2017
    • November 2017
    • October 2017
    • September 2017
    • April 2017
    • March 2017
    • January 2017
    • December 2016
    • October 2016
    • September 2016
    • August 2016
    • July 2016
    • June 2016
    • May 2016
    • April 2016
    • March 2016
    • February 2016
    • January 2016
    • December 2015
    • November 2015
    • October 2015
    • August 2015
    • July 2015
    • June 2015
    • May 2015
    • April 2015
    • March 2015
    • February 2015
    • January 2015

      © 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

      No Result
      View All Result

        © 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.