आसाम राज्यातील मुस्लिम समाजातील अवघ्या सोळा वर्षीय गायिका नाहीदा आफरीनला नुकतेच तेथील तब्बल 46 मौलवींनी फतवे काढून गाणे गाण्यास मनाई केली आहे.त्यामुळे खरचं इस्लाममध्ये मौसीकी अर्थात संगीत हराम आहे का ? याचे उत्तर शोधण्याची गरज आहे.कुराणचा थोडा अभ्यास केल्यास लक्षात येते की, कुराणमधील एकपण आयातमध्ये संगीतला वाईट म्हटलेले नाही.परंतु काही मौलवी धर्माच्या नावाखाली समांतर न्यायव्यवस्था टिकवून ठेवत आपले महत्व अजरामर करण्याच्या प्रयत्नात आजच्या तरुणाईला संभ्रमित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
काही मौलवी हदीसच्या आधारावर मौसीकी (संगीत) फक्त विशिष्ट गोष्टी आणि वेळीच वैध मानतात.तर काही संगीत पूर्णपणे वर्जित असल्याचे सांगतात.ज्या ठिकाणी स्त्री स्वातंत्र्याचा आणि आधुनिकतेचा विषय येतो त्याच ठिकाणी कट्टरतावाद का उभा केला जातो? आसाममधील किती मुस्लीम तरुणांच्या विरुद्ध गाणे गाण्यास मनाई करण्याचे,शिक्षण,विकास,निरक्षतता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दहशदवादी विचारसरणी पासून दूर राहण्या संबंधीचे किती फतवे या मौलवींनी आतपर्यंत काढलेले आहेत? हे देखील विचारण्याची वेळ आता आली आहे.
आपण काही हदीसचा अभ्यास केल्यास लक्षात येते की,संगीत विषयीचे चित्र अस्पष्ट आहे.परंतु असे एकही हदीस नाही जे स्पष्टपणे संगीताला प्रतिबंधित करते.त्याचप्रकारे संगीत विरोधी कुराणमध्ये एकही आयत नाही.त्यामुळे संगीत निषेध नसल्याच्या गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे.या पृथ्वीतलावर आजपर्यंत १ लाख २४ हजार पैगंबर आलेत.त्यापैकी चार पैगंबरांना अल्लाहने विशेष ताकत आणि गुणसंपन्नता दिली होती.पैगंबर मुसा यांना काठीच्या एका वारने समुद्राचे दोन तुकडे करण्याची तर पैगंबर इसा यांना मेलेल्या माणसांना जिवंत करण्याची शक्ती दिली होती.पैगंबर दाऊद यांना मौसीकी म्हणजेच संगीताची गुणसंपन्नता दिली होती.त्यानुसार पैगंबर दाऊद यांना गोड आवाज दिला होता.त्याच्या गोड आवाजात राग,संगीतवर प्रचंड पकड होती.त्यांच्या आवाजाच्या गोडव्यामुळे पहाड देखील नाचायला लागायचे.जगातील सर्व पशु-पक्षी त्यांच्या आवाजाच्या दिशेने ओढले जायचे.एवढी शक्ती पैगंबर दाऊद यांच्या गोड आवाजात होती.एवढेच नव्हे तर काही ठिकाणी पैगंबर दाऊद यांच्याबाबतीत आणखी काही स्पष्ट उल्लेख आढळतात.त्यानुसार पैगंबर दाऊद यांनी कुठले राग,संगीतावर गाणे म्हणत अल्लाह(परमेश्वराची) आराधना करायचे या बाबत माहिती मिळते.त्यामुळे अल्लाह आपले गुणगान हराम(वर्ज) पद्धतीने कसे ऐकेल आणि आपल्या पैगंबराला हराम कलागुणाने कसे संपन्न करेल ? असा प्रश्न साहजिक उभा राहतो.एवढेच नव्हे,तर काही ठिकाणी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणतात,हजरत आयेशांना विचारा की,ज्या ठिकाणी बारात जात आहे,ते अन्सार आहेत आणि अन्सार हे संगीतप्रेमी असतात असे म्हटले आहे.त्यामुळे मौसीकी इस्लामनुसार निषिद्ध ही संकल्पना चुकीची आहे.
या जगात प्रत्येक मनुष्याच्या अंगी संगीताची क्षमता सारखी दिलेली नाही.संगीताबाबत नैसर्गिक गुण नसलेल्या व्यक्तीला कुठलेही प्रशिक्षण देवून कुणालाही चांगला गायक किंवा संगीतकार बनविले जावू शकत नाही.त्यामुळे संगीत हे अल्लाह-परमेश्वराने दिलेले वरदान आहे.विशेष गोष्ट म्हणजे अल्लाहने काही लोकांमध्ये संगीताची विशेष क्षमता व योग्यता ही त्याच्या उपयोगासाठी दिली आहे.त्यामुळे या योग्यतेचा वापर न करणे म्हणजे अल्लाहने प्रदान केलेल्या शक्तीचा एकप्रकारे अवमान करण्यासारखे आहे.जे लोक आपल्या स्वतःच्या मर्जीने अशा काही गोष्टी प्रतिबंधित करून घेतात अशा लोकांवर कुराणमध्ये अल्लाहने स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे.अल्लाहने मौसीकी निषिद्ध केलेली नसतांना मनुष्य स्वतःहून ती बंदी अल्लाहच्या नावाने लादून घेत असेल तर तो एकप्रकारे हुकुमशाहीच्या दिशेने त्याचा प्रवास असल्याचे म्हणावे लागेल.संगीत अल्लाह-परमेश्वराने दिलेला एक सुंदर उपहार आहे.त्यामुळे संगीत स्वेच्छेने हराम करार देणे चुकीचे आहे.
एवढेच नव्हे तर मुस्लीम तरुणीने गैर-मुसलीम तरुणाशी विवाह करू नये,तिला आपल्या मर्जीनुसार विवाह किंवा आपला पती निवडण्याचा हक्क नाही,दाढी ठेवणे ,मुस्लीम पेहराव अशा अनेक गोष्टींबाबत चुकीचे समाज मुस्लीम समाजात पेरले गेले आहेत.इस्लामनुसार मुस्लीम तरुणीने गैर-मुसलीम तरुणाशी विवाह करण्यास मनाई नाही,परंतु असे करू नये कारण अल्लाहाला ते पसंत नाही.परंतु अल्लाहला तर दारू आणि खोटे बोलणेही आवडत नाही,म्हणून हे कथित मौलवी अशा सर्वाना मुस्लीम धर्मातून बहिष्कृत करतात का ? नाही ना ! मग ज्या ठिकाणी स्त्री स्वातंत्र्या विषय येतो त्याच ठिकाणी कट्टरतावाद का उभा केला जातो? आसाममधील किती मुस्लीम तरुणांच्या विरुद्ध गाणे गाण्यास मनाई करण्याचे फतवे काढलेले आहेत.मुस्लिम समाजाची दुर्दशा, निरक्षरता,दहशतवादी कारवायांपासून दूर राहण्याचे फतवे यांनी कधी आणि किती वेळेस काढले हे आता विचारण्याची वेळ आली आहे.कुराण व शरीयतचा आधार घेऊन काही मौलवीं वाट्टेल तो फतवा जारी करतात.या फतव्यावर कुणाचे नियंत्रण नसते एवढेच नव्हे तर त्यांना विरोध किंवा त्यांची समीक्षा करण्याची हिंमत देखील कुणीच करत नाही.असे मौलवी आजच्या तरुणाईला इस्लामची अत्यंत चुकीची प्रतिमा दाखवीत आहेत.त्यामुळे इस्लामची जगात नकारात्मक प्रतिमा तयार होत आहे.याविरुद्ध आता मुस्लीम तरुणांनी एकवटले पाहिजे.अन्यथा धर्माच्या नावावर अशाच पद्धतीने त्यांना मूर्ख बनविण्याचा कार्यक्रम सुरूच राहील.
आता कुठे गेली,असहिष्णुतेच्या नावाखाली बोंबाबोंम करणाऱ्यांची टोळी
नजर,
नमाज,
नजरिया..
सब कुछ बदल गया…
एक रोज इश्क़ हुआ… और मेरा खुदा बदल गया..!!
प्रेमाची अनुभूती या कवीने काही ओळीत आणि समर्पक शब्दात स्पष्ट केली आहे.जणू त्याने आपले हृद्य काढून आपल्या प्रेयसी समोर ठेवून दिले आहे. असाच काहीसा किस्सा मुंबईतील भिवंडीत भर रस्त्यात प्रेयसीला लग्नाची मागणी घालतांना एका तरूणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही कथित धर्माच्या ठेकेदार कट्टरपंथीयांनी या तरुणाला अपहरणाची धमकी दिली.एवढेच नव्हे तर मुला-मुलीच्या कुटुंबियांना धमकावण्यास सुरूवात केली आहे.आता कुठे गेली,असहिष्णुतेच्या नावाखाली बोंबाबोंम करणाऱ्यांची टोळी.अरे…प्रेम कसे व्यक्त करावे हे देखील आता यांना विचारून ठरवायचे का ? वास्तविक, भिवंडीमधील या जोडप्याचे दोनच महिन्यांमध्ये लग्न होणार होते. पण लग्नापूर्वी त्याने आपल्या होणाऱ्या पत्नीला भररस्त्यात प्रपोज केल्याने कट्टरपंथीय भडकले.त्यामुळे त्यांनी त्या कुटुंबियांच्या घरावर मोर्चा काढून याचा निषेध नोंदवला.या प्रकारामुळे या जोडप्याचे कुटुंब हादरुन गेले आहे.मुलीच्या वडिलांची तर तब्येतच खराब झाली असून कट्टरपंथीयांनी तरुणाला जबरदस्तीने माफी मागण्यास भाग पाडत त्याचा व्हिडीओ व्हायरल केला आहे.दरम्यान, धर्माचा ठेका यांना दिला कुणी ? कोणताही धर्माने प्रेम कुठे, कसं व्यक्त करावे याची व्याख्या सांगितलेली नाही.’खुदा ही प्यार और प्यार ही खुदा की इबादत’.त्यामुळेच तर नमाजची वेळ झाली तर वेळ ठिकाण न बघता आपण खुदाची इबादत करतो.जर खुदाची इबादत चुकीची नाही तर प्रेमाची इबादत कशी चुकीची राहणार याचा तर विचार करा मित्रांनो !