दिल्लीतील निर्भया सामुहिक बलात्कारावर बीबीसीने काही वर्षांपूर्वी ‘डॉटर ऑफ इंडीया’ नावाची साधारण १ तासांची डॉक्युमेंटरी तयार केली होती. परंतु न्यायालयाच्या आदेशान्वाये नंतर भारतात तिच्यावर बंदी घालण्यात आली होती. त्याच धर्तीवर कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणासंबंधी ‘आसिफा : अ फ्लॉवर क्रश्ड’ नामक एक १५ मिनिटांची काळीज चिरून टाकणारी शॉर्ट डॉक्युमेंटरी नुकतीच प्रदर्शित झाली आहे. सांगायचा मुद्दा एवढाच की तेवढ्या लवकर ही डॉक्युमेंटरी बघून घ्या, अन्यथा तीच्यावर देखील बॅन येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या डॉक्युमेंटरीत मयत आसिफाच्या आई-वडील आणि इतर काही जणांचे सविस्तर म्हणणे घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्या सर्वांनी फक्त त्यांच्यासोबत घडलेला प्रकार कथन केलाय. कुठल्याही धार्मिक किंवा विचारधारेच्या असहिष्णूतेबद्दल भाष्य केलेले नाही. डॉक्युमेंटरी ‘द अॅन्टस्’ समूहाने बनविली आहे. ही डॉक्युमेंटरी पाहून खूप अस्वस्थ झालोय. खरचं या जगातील हाडामासाची माणसं इतकी क्रूर असू शकतात का? असा प्रश्न मला पडलाय. असिफासोबत कुठे आणि कोणी अत्याचार केलेत,यावर भले वाद असतील. परंतु असिफा सारख्या कोवळ्या मुलीवर अत्यंत पाशवी अत्याचार झालय,हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. आपल्या परिवारातील कोणत्या मुलीसोबत असं झाले तर? असा विचारही अंगाचा थरकाप उडवून जातो. त्यामुळे अशा संवेदनशील विषयांवर तरी माणुसकी जपली पाहिजे एवढेच.
कठुआ येथील मोहम्मद युसुफ आणि त्यांची पत्नी नसीमा बीबी हे अगदी सर्व सामान्य कुटुंबातील पती-पत्नी. दोन वेळेचे जेवण कमविणे याच्या पलीकडे त्यांचे विश्व नाही. त्यामुळे राजकारण किंवा धर्मांधता वैगैरे…वैगैरे गोष्टींशी फार काही देणे-घेणे नाही. २००२ मध्ये यांच्या दोन मुलांसह आईचा एका अपघातात मृत्यू मृत्यू झाला. त्यानंतर मोहम्मद युसुफ यांना फक्त मुलगा उरला. काही दिवसांनी त्यांना पुन्हा एक मुलगा झाला. परंतु मुलगी मयत झाल्यामुळे परिवार अपूर्ण असल्याच्या भावनेने दोघं पती-पत्नी दु:खी होते. त्यामुळे त्यांनी आपल्या बहिणीकडून आसिफाला मोठ्या लाडाने दत्तक घेतले. आसिफा लहानपणापासून खूप खोडकर असल्यामुळे आपल्या मामा-मामीची अर्थात अम्मी-अब्बांची खूप-खूप लाडकी होती. असिफा म्हणजे कोणत्या अन् कोणत्या आपल्या खोडकर उपद्व्यापांनी दिवसभर आपल्या अम्मी-अब्बाला हसवत राहणारी. सहा महिन्याची घरात रेंगाळणारी असिफा कधी आपल्या पायांवर चालायला लागली हे त्यांना देखील कळलेच नाही.
बघत-बघत असिफा आता आठ वर्षांची झाली होती. असिफा आता कमी खोड्या करायची. परंतु अमुक-पाहिजे ढमुक पाहिजे म्हणून आपल्या अम्मी-अब्बाला प्रत्येक आवडीची गोष्ट घायला लावायचीच. असिफाला सलवार कमीज,अनारकली ड्रेस आणि कोल्हापुरी बुट घालायला खूप आवडायचे. अर्थात लाडकी असल्यामुळे पोटाला चिमटा देत आवडीची प्रत्येक गोष्ट आसिफाला घेऊन दिली जायचीच. असिफाचे लाड पूर्ण करायला मोहम्मद आणि नसीमा यांना खूप आवडायचे. कारण अपघातात मरण पावलेली पोटाची पोरगीच त्यांना असिफामध्ये दिसायची.
असिफा आठ वर्षाची झाल्यामुळे आता थोडी समजूतदार देखील झाली होती. आपल्या अम्मीला घरकाम करण्यापासून रोखायची. असिफा म्हणायची अम्मी ‘तुम आराम करो, मैं खाना,चाय बनाया करूंगी’, तुम्हारा बिस्तर भी लगाया करूंगी. असिफाचे हे बोलणं एक माय म्हणून नसीमा बीबी यांना खूप सुकून द्यायचे. सामुहिक बलात्कार होण्याच्या काही दिवसांपूर्वी आसिफा आपल्या आईकडून चपातीचे पीठ कसे मळतात हे शिकून घेत होती. विशेष म्हणजे काही दिवसातच ती खूप चांगल्या प्रकारे स्वयंपाक बनवायला लागली होती.
एकदिवस अचानक असिफा बेपत्ता झाली. पोलीसात तक्रार दिल्यानंतर पोलीस घरी येऊन चौकशी करून गेलेत. परंतु काहीच तपास लागला नाही. सात दिवसांनी अचानक जगदीश नामक व्यक्तीने मोहम्मद युसुफ यांना आसिफाचा मृत देह सापडल्याची माहिती दिली. आसिफा पहाडावरून पडल्याचे सांगण्यात आले. ही मनहूस खबर ऐकून मोहम्मद युसुफ यांच्यावर आभाळ कोसळले. परंतु नियती एवढ्यावर थांबणार नव्हती. मोहम्मद यांच्या हृदयावर तलवारी सारखे घाव घालण्यासाठी तिने पुढे आणखी क्रूर कहाणी लिहून ठेवली होती.
मोहम्मद काही जणांनासह घटनास्थळी गेल्यावर आसिफाचा मृतदेह अत्यंत जखमी अवस्थेत पडलेला दिसला. तिच्या शरीराचे जणू कुत्र्यांनी लचके तोडल्यागत मृतदेहाची अवस्था. दोन्ही हाताचे मनगट अर्धवट जळालेले होते. तोंडात आणि छातीच्या भागात पूर्णपणे माती कोंबलेली होती. चेहरा आणि हातावर ओरबरडल्याच्या जखमा होत्या. पुढील दोन दात देखील पडलेले होते. गुप्तांगावर देखील गंभीर जखमा होत्या, हे दृश्य बघताच मोहम्मद यांनी एकच हंबरडा फोडला. मृतदेहाची अवस्था बघून परिसरातील नागरिक प्रचंड चिडले. त्यांनी काही वेळ रस्तारोको आंदोलन देखील केले.
असिफाच्या शरीरासोबत मृत्यूपूर्वी झालेला छळ अद्याप पूर्ण झालेला नव्हता, म्हणूनच की काय, तिच्या मृतदेहाला स्थानिक स्मशानभूमीत दफनविधी करण्यास काही जणांनी मनाई केली. मोहम्मद युसुफ यांनी तसेच इतर लोकांनी समजावून देखील काही परिणाम झाला नाही. त्यामुळे शेवटी दुसऱ्या ठिकाणी असिफाचा दफनविधी झाला. अर्थात नियती एक बाप म्हणून मोहम्मद यांच्या मनावर आपल्या कोवळ्या असिफाचा मृतदेह नेतांना खोलवर जखमा कोरत होती. कारण तिला कदाचित माहित नसावं की ‘छोटे जनाजे अकसर भारी होते हैं’.
आसीफाचा मृत्यू नैसर्गिक झाला असता तर कदाचित आम्ही स्वतःला सावरू शकलो असतो. परंतु मोठ्या लाडाने दत्तक घेतलेल्या असिफाचा मृत्यू हा आमच्यासाठी मृत्यूसम पिडादाई आहे. आमचा परिवार पुन्हा एकदा अपूर्ण झालाय. तिच्या आई-वडिलांना आम्ही काय उत्तर द्यावे, स्वतः कसे जगावे हेच कळत नसल्याची भावना अश्रूंना वाट मोकळी करून देत मोहम्मद आणि नसीमा बीबी सध्या प्रत्येकाजवळ व्यक्त करताय. असिफासारखं कुणासोबत घडू नये यासाठी दोषींना कडक शिक्षा व्हावी,एवढीच त्यांची मागणी आहे.
मिटा सके जो दर्द तेरा
वो शब्द कहाँ से लाऊँ
चूका सकूं एहसान तेरा
वो प्राण कहाँ से लाऊँ
खेद हुआ है आज मुझे
लेख से क्या होने वाला
लिख सकूं मैं भाग्य तेरा
वो हाथ कहाँ से लाऊँ
देखा जो हालत ये तेरा
छलनी हुआ कलेजा मेरा
रोक सके जो अश्क मेरे
वो नैन कहाँ से लाऊँ
ख़ामोशी इतनी है क्यों
क्या गूंगे बहरे हो गए सारे
सुना सकूं जो हालत तेरी
वो जुबाँ कहाँ से लाऊँ
चिल्लाहट पहुँचा सकूं मैं
बहरे इन नेतावो को
झकझोर सकूं इन मुर्दॊ को
वो अलफाज कहाँ से लाऊँ
अरुण मिश्रा यांची ही कविता म्हणून कुणालाही विचार करायला भाग पाडणारी आहे. तसेच एक संवेदनशील व्यक्ती म्हणून प्रत्येकाला या काव्यातला ओळी अस्वस्थ करतात.
खुपच ह्रदयहद्रावक आहे. मन हेलावून गेल .निशब्द.
महिला व बालिकांवर बलात्कार ही नॉनस्टाप विकृती आहे.घटना घडली तर आपण त्यावर समाजकारण,राजकारण,काव्य,आक्रोश असे बरेच विधी करतो,करवून घेतो.पढ यावर प्रतिबंधक उपाय अजून मानवाला का गवसला नाही?अनेक दुर्धर आजारांवर मानवाने परिणामकारक,निर्मुलनकारक इलाज शोधले.मग बलात्कारावर का नाही?
माणूस ज्ञानी नाही काय?
माणूस बुद्धीमान नाही काय?
माणूस दखल घेत नाही काय?
मणूस हतबल आहे काय ?
माणूस गांभिर्याने घेत नाही काय ?
असे बरेच प्रश्न मला छेडतात.सतावतात.
आम्ही माणूस बलात्कारानंतर चौकसी ,निवाडा,शिक्षा देतो.तरीही बलात्कार का थांबत नाहीत ?
कारण त्या दिशेने प्रयत्न केला जात नाही.फ्रयत्न कशाला,विचार ही केला जात नाही.त्यामुळे दुख व्यक्त करणे,मातम मनवणे हे पुरेसे ठरत नाही.ती असते फक्त प्रतिक्षिप्त क्रिया.जसे कुत्र्याला दगड मारल्यावर तो दोन मिनीटे ओरडतो,नंतर नॉर्मल होतो. तसे आपले माणसांचे होत आहे.फक्त वेदना होतात,संवेदना नाही.म्हणून हे असे विकृत प्रकार थांबत नाहीत.
१)मुली व महिला पुरूषांच्या विकृतीपासून बचाव करण्यास सक्षम नाहीतळ
२)पुरूषांच्या मनातील पौरूषी मुजोरी ही महिला व मुलींना ओळखता येत नाही.
३)स्रीसुलभ शरीर कोठेही मिरवण्याचा महिलांचा खोटा विश्वास बाळगणे चुकीचा आहे.
४)स्री पुरूष मधील लैंगिक आकर्षण स्रिया दुर्लक्षित करतात.
५)पुरूषांची स्री भोग वृत्ती व प्रवृत्ती चे आकलन स्रियांना होत नाही.
६)पुरूषांची संख्या महिलांपेक्षा कमी आहे.महिलांचे सेक्स्युअल पोटेन्शियल कमी करते.
७)पुरूषांपेक्षा महिलांचा लैंगिक जीवन काळ निम्मा असतो.महिलांचे सेक्स्युअल पोटेन्शयल कमी करते.
८)प्रौढ महिलांची लैंगिक अनासक्ती मुली व इतर महिलांवर ” प्रेशर व इक्झीट ” या मनोवृत्ती नियमानुसार कुप्रभाव टाकते.
९)काही महिलांचे अश्लील प्रदर्शन व उच्छुंगलता ही पुरूषांना कुप्रभावीत करून इतर निष्पाप महिला व मुलींवर अगतिक होते.
१०)भौतिक चंगळप्रेमामुळे स्री पुरूष मधील नैसर्गिक प्रेम नष्ट करीत आहे.
११) पती पत्नी किंवा स्री पुरूषांमधील तेढ,राग,संताप सुद्धा पुरूषांना हैवान व स्रियांना भक्ष्य बनवते.