देशाने सध्यापेक्षा मोठा धार्मिक तणाव अनेकदा अनुभवला आहे. बाबरी, गुजराथ दंगली आणि युपी दंगल यांचे प्राथमिक स्वरुपात उदाहरण देता येतील. यातील बाबरी आणि गुजराथ दंगलीनी तर जागतिक पातळीवर भारताच्या ’सर्व धर्म समभाव’च्या प्रतिमेला मोठा तडा गेला होता.असहिष्णू वातावरण काही महिन्यात तयार झाले नाही.त्याला कित्येक वर्षाचा इतिहास आहे.त्यामुळे काही विशिष्ट लोकांच्या बोलण्याने देशातील वातावरण असहिष्णू झाले आहे यावर शिक्कामोर्तब होत नाही. अमीर खान म्हणतो देशातील सध्याचे वातावरण बघून त्याच्या पत्नीने त्याला देश सोडण्याचा सल्ला दिला होता. एक नंबरची मूर्ख आहे ती बया…तिला हे माहितच नाही की, या देशातील हिंदू-मुस्लीम, दलित, ख्रिश्चन, पंजाबी, गुजराथी, बंगाली या सारख्या अनेक जाती धर्माच्या लोकांनीच आमीरला सुपरस्टार बनविले आहे.आमीर तुझ्या बयेला सांग…तू या देशामुळेच ‘आमीर खान’ आहेस रे !
या देशातील प्रमुख तीन आघाडीचे हिरो हे मुस्लीम आहेत.(आमीर, सलमान, शाहरुख) जर देशातील वातावरण देश सोडून जाण्या इतपत खराब राहिले असते तर, या तिघा हिरोंची सिनेमे देशातील ८० टक्के हिंदुनी बघितले असते का ? मुळात या देशातील प्रत्येक धर्माचा माणूस आपल्या देशाला आपल्या मातेचा दर्जा देतो. आपल्या आईला संकट काळात आपण कसे सोडून जावू शकतो. आमीरने देश सोडून जाण्याची भाषा न करता खर्या भारतीया प्रमाणे देशाची परिस्थिती कशी सुधारेल यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. आमीरला जर असहिष्णूतेचा अनुभव आला असेल तर त्याने तो जरूर सांगावा. त्यावर चर्चा देखील होवू शकते. परंतु त्यासाठी पूर्ण देशाच्या एकंदरीत वातावरणाला दोष देणे योग्य नाही. आमीरच्या बयेला एक प्रश्न आहे. जर देशातील वातावरण खरच असहिष्णू राहिले असते तर, आमीरला दोन्ही बायका या हिंदू कशा मिळाल्या असत्या ? सलमान खानने त्याच्या दोन्ही बहिणी या हिंदू मुलांच्या घरात दिली आहेत,मग देशात वातावरण असहिष्णू कसे ? सैफअली खानची बहिणीने कुणाल खेमू सोबत लग्न केले आहे मग देशातील वातावरण असहिष्णू कसे ? सैफअलीच्या दोन्ही बायका पंजाबी आहेत मग मग देशात वातावरण असहिष्णू कसे ? लग्नासाठी धर्म बदलवून पुन्हा आपल्याच धर्मात धर्मेंद्र आणि हेमा मालिनी राहत आहेत मग देशात असहिष्णू वातावरण कसे ? ज्या ‘पिके’ सिनेमातून आमीरने हिंदू धर्माच्या धार्मिक मुद्द्यांवर टीका केली,त्या सिनेमातून अमीरने कोट्यावधी कमविले विशेष म्हणजे कोट्यावधी हिंदुनी तो सिनेमा पहिला देखील मग देशातील वातावरण असहिष्णू कसे ? जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लाची मुलगी सचिन पायलट यांच्या सोबत कित्येक वर्षापासून सुखाचा संसार करत आहेत मग देशातील वातावरण असहिष्णू कसे ? याचा खुलासा आमीरच्या बयेने केला तर बर होईल.
राहिला साहित्यिक,विचारवंतांचा विषय. अहिंसेच्या मार्गाने प्रत्येकाला आपला निषेध व्यक्त करण्याचा अधिकार आपण तात्विक मुद्यांच्या जोरावर हिरावू घेवू शकत नाही.याआधी असे झाले…त्यावेळी पुरस्कार का परत केले नाही ? हा वैचारिक चर्चेचा मुद्दा होवू शकत नाही.याआधी केले नाही म्हणून आता पण त्यांनी करूच नये असे म्हणणे विचार लादण्या सारखे आहे. सुरुवातीला मला देखील हा मुद्दा पटायचा परंतु आता मला असे वाटते की,ज्याला त्याला आपल्या इच्छे प्रमाणे वागू द्या. भारत सरकारने या गोष्टी सकारात्मक दृष्टीने घेतल्या पाहिजेत. याआधी अनेक गंभीर तणाव झाल्यानंतर देखील कथित साहित्यिक,विचारवंत आणि अभिनेते यांनी प्रतिक्रिया नोदाविल्या नव्हत्या. याचाच अर्थ विद्यमान सरकारवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. ते देशातील परिस्थिती ते बदलवू शकतात.त्यामुळे भारत सरकारने त्या दृष्टीने भरीव प्रयत्न केले पाहिजे. राहिला इतर विचारवंतांचा विषय त्यांनी आपल्या पद्धतीने निषेध नोंदविला आहे फक्त पुरस्कार परत करतांना पुरस्काराची रक्कम व्याजा सकट परत करा म्हणा…त्या पैशाचा वापर देशातील असहिष्णूता दूर करण्यासाठीच्या उपक्रमांसाठी करता येईल म्हणाव…!