धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील एका नराधम बापाने आपल्या पोटाच्या मतीमंद मुलीला तब्बल तीन वेळेस गर्भवती केले तर दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यात पाचवीत शिक्षण घेणार्या नऊ वर्षांच्या मुलीला निर्दयी माता, पुतण्या, मावशी व मानलेल्या वडिलाने तिला देहविक्रीत ढकलून अडीच लाख रुपये कमविले, छी…थू…हरामखोर कुठले ! यावरून एक सिद्ध होते की, हतबल मुलींच्या इभ्रतीचे लचके तोडणारा माणूस नावाच्या प्राण्याला जात आणि नातं नसतं हो ! तो फक्त अन फक्त लिंगपिसाट नराधम असतो.मित्रांनो आज धुळे आणि औरंगाबाद येथील बातमी वाचल्यानंतर खरचं खूप अस्वस्थ झालो. मनुष्य म्हणून जन्माला आल्याची आज लाज वाटली.माणूस हा पशुपेक्षाही हीन झाला आहे का ? त्याला जात-धर्म तर सोडाच पोटाच्या मुलीसोबतचे नातं देखील कळत नाही,एवढी विकृती प्राण्यांमध्ये देखील राहत नाही हो…! ती देखील आपली जातकुळ ओळखतात.हिंसेचे समर्थन नाही परंतु खरंच सांगतो अशा हरामखोरांची मुडके छाटून त्यांची हत्याच केली पाहिजे.अशा घटनांवरून होणारे जातीपाताचे राजकारण देखील चुकीचे वाटते कारण खैरलांजी,धुळे,औरंगाबाद असो की कोपर्डी अशा घटनांमधील हरामखोरांना जात आणि नातं नसतेच.
बापाच्या नात्याला काळीमा
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पासून जवळच असलेल्या घोड्यामाळ परिसरातील १७ वर्षातील अपंग आणि मतिमंद तरूणी आई वारल्यापासून आपल्या व्यसनाधीन बापासोबत राहत होती. ज्या बापाच्या अंगखांद्यावर खेळली त्याच बापाकडून तिच्या इभ्रतीचे लचके तोडले जातील. याचा तीने स्वप्नात देखील विचार केला नसेल. आई गेल्यानंतर जिने दोनवेळेच जेवण बनवून बापाला खावू घातले. तोकडी का असेना परंतु घराची जबाबदारी पेलली. अवघ्या १३ वर्षाची असतांना तिच्यावर पहिल्यांदा गोमा डोंगर भोवरे या आपल्या जन्मदात्या बापाकडून बलात्कार झाला. झालेला प्रकार नेमका काय? हे देखील तिला पुर्ण कळलेले नव्हते. दररोजच लैंगिक शोषण तिच्या समजण्याच्या पलिकडचे होते. यातूनच १४ व्या वर्षी तिच्यावर अनैसर्गिक मातृत्व लादले गेले अन् तिने एका मुलीला जन्म दिला. शरिराने अपंग आणि बौद्धीक दृष्ट्या कमकुवत असल्यामुळे तिला या गोष्टीचे गांभिर्य कळलेच नव्हते. नराधम बापाची विकृती काही केल्या कमी होत नव्हती. त्या चिमुकलीचे लचके तोडण्याचा प्रकार दररोज सुरू होता. साधारण वर्ष भरानंतर पुन्हा एकदा तिने एका मुलीलाच जन्म दिला. अपंग आणि मतिमंद असल्याचे कारण दाखवत तिला घराबाहेर पडू दिले जात नव्हते. एकंदरीत सर्वच हालचाली परिसरातील लोकांना संशयीत वाटायच्या परंतु एक बाप आपल्या पोटाच्या मुलीच्या पदरावर हात घालत असेल असे कुणी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. परंतु एकेदिवशी मोनिका मालचे या सामाजिक कार्यकर्ते असणार्या महिलेला सर्व हकिकत कळाली. पिडीत मुलीला तिसर्यांदा चार महिन्याची गर्भवती असल्याचे बघितल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली.
निर्दयी मातेने पोटच्या पोरींला विकले
औरंगाबाद येथील पाचवीत शिक्षण घेणार्या नऊ वर्षांच्या मुलीला निर्दयी माता, पुतण्या, मावशी व मानलेल्या वडिलांनी देहविक्रीत ढकलून अडीच लाख रुपये मिळविल्याची खळबळजनक घटनेने पुन्हा एकदा मन सुन्न झाले. जिने नऊ महिने पोटात जागा दिली तिने ताटात जागा नसल्याचे सांगत लचके तोडणार्यांच्या हाती तिला विकले. पाचवीत शिक्षण घेणार्या नऊ वर्षीय मायाच्या (नाव बदललेले आहे) शाळेला एप्रिलमध्ये सुट्ट्या लागल्या. त्यामुळे तिची आई व नितीन रोकडे हे बालगृहात येऊन मायाला घेऊन गेले. जूनमध्ये नितीन रोकडे व तिच्या आईने मुंबईला राहणार्या मावशीच्या मदतीने राजस्थानस्थीत एजंटांशी बोलणी केली. मुकुंदवाडीत घरी आल्यानंतर मायची आई आणि नितीन रोकडेने मायाला दाखविले.तेथेच तिचा व्यवहार ठरवून तीन लाख रुपयांत विकले गेले.याच वेळी मायाची मोठी बहीण पूजा (नाव बदलले आहे) तिचाही व्यवहार ठरला.पण मायालाच राजस्थानातील रामनगर (जि. बुंदी) येथे नेण्यात आले.तेथे तिला अक्षरश: एका कुंटणखान्यात देहविक्रीसाठी ठेवण्यात आले.याच कुंटणखान्यावर राजस्थान पोलिसांनी छापा घातला, त्या वेळी माया पोलिसांच्या हाती लागली.बालवयातील मुलगी पाहून पोलिसही काहीसे चक्रावले,तिची चौकशी केली असता, ती औरंगाबादेतील असल्याचे स्पष्ट झाले.
जातीपाचे राजकारण करणारेही बलात्कारीच
आज आपल्या जातीच्या तरुणीवर बलात्कार झाला,त्यांच्या जातीच्या मुलीवर अन्याय झाला तर कसे बोंबा मारतात.पूर्ण महाराष्ट्र डोक्यावर घेतात.आपण आपल्या जातीची ताकद दाखवून दिली पाहिजे किंवा जातीच्या नावावर खाली दाखविले जाते,आपल्यावर नेहमीच अन्याय होतो, वैगैरे…वैगैरे सांगून तरुणांची माथी भडकावयाची आणि राजकारण करायचे.त्या पिडीत तरुणीचे लचके तोडणारे नराधम आणि तिच्यावर अन्याय झाला म्हणून आपल्या जाती-धर्माची पोळी भाजणारे भांड, हे त्या बलात्कार्यांपेक्षा कमी गुन्हेगार आहेत का ? तो नराधम एकदा तिची इभ्रत लुटतो परंतु असे राजकीय भांड दररोज, न्याय, अन्याय, भेट, मदत अशी शब्द वापरून त्या पिडीतेची इभ्रत प्रसिद्धीच्या माध्यमातून दररोज थोडी थोडी विकत असतात. आपल्या जातीतील तरुणीवर अत्याचार झाला नाही ना…म्हणून अनेक घटनांवर गप्प बसणारे जातीचे ठेकेदार आणि आपण तेवढेच दोषी नाहीत का ? ज्या ठिकाणी अशा प्रकारे अन्याय झाला तेथे आपण जात-धर्म पलीकडे जात एकवटायला नको ? मित्रांनो हात जोडून विनंती करतो पुरोगामी महाराष्ट्राने या आधी अनेक जातीय आणि धार्मिक दंगली पहिल्या आहेत.त्यातून अनेक पिढ्या बरबाद झाल्या आहेत.अनेक माध्यामतून सवर्ण-मराठा वाद कसा वाढेल अशा पद्धतीच्या बातम्या दिल्या जात आहेत किंबहुना सोशल मिडियातुन पसरविल्या जात आहेत. खैरलांजीमध्ये दलित तरुणीवर सवर्ण समाजातील तरुणांनी बलात्कार,निर्घृण हत्या केली म्हणून संपूर्ण सवर्ण समाजातील तरुणांना ज्याप्रकारे दोष देत येत नाही त्याच प्रकारे कोपर्डीच्या घटनेवरून संपूर्ण दलित समाजाला दोषी धरता येणार नाही.म्हणून मित्रांनो पुन्हा हात जोडून विनंती करतो थोडे सावध रहा.अनेक समाजकंटक धार्मिक ध्रुवीकरणाचा घाट घालत आहे. हिंदू-मुस्लीम वाद सध्या सहज पेटत नाही, त्यामुळे त्यांची राजकीय भाकर करपण्याआधी कदाचित दलित-सवर्ण वाद उभा करून राजकीय पटलावरची भाकरी फिरविण्याचा डाव राजकारण्यांचा असू शकतो.त्यामुळेच म्हणतो जातीपातीचे राजकारण करणारेही बलात्कारीच आहेत,फक्त फरक एवढाच की बलात्कारी शरीराचे लचके तोडता आणि जातीपातीचे राजकारण करणारे राजकीय भांड फुले-शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे !
वास्तव आहे