जिंदगी जिंदाबाद
    No Result
    View All Result
    No Result
    View All Result
    जिंदगी जिंदाबाद
    No Result
    View All Result

    बाबुजींची बंदुक सतिशअण्णांच्या खाद्यांवर !

    admin by admin
    October 16, 2016
    in Uncategorized
    0
    बाबुजींची बंदुक सतिशअण्णांच्या खाद्यांवर !


    khadse-photo-123जळगाव
    जळगाव जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महसूलमंत्री ना.एकनाथराव खडसे यांनी पुढाकार घेतल्यामुळे अनेकांना राजकीयदृष्ट्या पुनर्जीवीत होण्याची आयती संधी चालून आली तर अनेक जण यामुळे अस्वस्थ झाले. परंतु थेट नाथाभाऊंना विरोध करण्याची हिंमत सध्यातरी कुणी करेल असे चित्र आतापर्यंत नव्हते. परंतु तरी देखील अनेक जण खा.ईश्‍वरबाबूजी जैन यांच्याकडे आस लावून होते. परंतु विरोधी पक्षनेते असलेले नाथाभाऊ आपल्या विरोधकाला कसे जेरीस आणतात हे संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे आता सत्तेत असलेल्या नाथाभाऊंसोबत कोणी ‘दोन हात’ करेल ही शक्यता आजच्या घडीला जरा दुरापास्तच होती.तशात सागवान घोटाळा आणि महावीर पतसंस्थेतील गैरव्यवहार या दोन्ही गोष्टीमधील भविष्यातील अडचणी ओळखून नाथाभाऊंच्या सुरात सुर मिळविण्यापलिकडे बाबुजींच्याकडे सध्यातरी पर्याय नव्हता. विधानपरिषदेच्या वेळी देखील बाबुजींनी ‘मनिष माझे ऐकत नाही’ म्हणून अलगद बाजुला राहत यातून अंग झटकण्याचा प्रयत्न केला होता. आतादेखील ते याच प्रकारे आपण बिनविरोधसाठी तयार असलो तरी पक्षाचा/पदाधिकार्‍यांचा निर्णय असल्याने नाईलाज झाल्याचे ते सांगून स्वतःला सेफ करण्याचा प्रयत्न करतील.
    प्रस्थापितांनी बाजूला सरकत दुसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांना संधी दिली जात असेल तर बिनविरोध करायला हरकत नाही, असे सांगून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतिश पाटील यांनी जिल्हा बँकेच्या बिनविरोध होणार्‍या निवडणुकीत बॉम्बगोळा टाकत राष्ट्रवादी स्वतंत्र पॅनल उभे करू शकते याचे संकेत दिले आहेत. अर्थात निवडणुकीला लागणारा भरमसाठ आर्थिक तरतूद लक्षात घेता अण्णांना पक्षातील अन्य नेत्यांनी पाठबळ दिल्याशिवाय ते असे बोलू शकतील असे शक्य दिसत नाही.त्यामुळे बाबुजींनी बंदुक सतिश अण्णांच्या खांद्यावर दिली की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. यातच आ. गुलाबराव पाटील हे देखील त्यांच्या साथीला येण्याची शक्यता नाकारता येत नाही,शेवटी त्यांना देखील आव्हानीतील आव्हान परतून लावायचे आहे.यासोबत नाथाभाऊंशी थेट विरोध घेण्यापेक्षा चिमणराव पाटील व सतिश पाटील यांच्यातील वैर लक्षात घेता जिल्हा बँकेच्या बिनविरोध निवडणुकीत माशी शिंकणारच हे बाबुजी ओळखुन असावे. त्यामुळे त्यांनी सुरवातीच्या चर्चेदरम्यान नमतेच घेतले. परंतु आता बिनविरोध होत असतांना चिमणराव पाटील यांना पुन्हा बँकेत संधी नको, असा पावित्रा सतिश पाटलांकडून घेणे आज ना उद्या अपेक्षितच होता. कारण त्यांच्या तालुक्यात यावेळी सर्वाधिक ठराव त्यांच्या गटाचे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बिनविरोधच्या चर्चेसाठी नेमलेल्या समितीच्या बैठकीपासून आण्णा लांबच राहीले.
    आ.सतीश पाटील यांनी नुकतीच राष्ट्रवादी कार्यालयात चिमणराव पाटील यांच्यावर प्रत्यक्ष तर स्वकीय असणारे माजी ख़ासदार मोरे काका यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.त्यांच्या बोलण्यातून राष्ट्रवादीच्या गोटात या निवडणुकी संदर्भात बरेच काही ठरून गेले असल्याचे जाणवत होते.अर्थात बाबूजींना देखील ही बिनविरोध निवडणूक नाथाभाऊंच्या नेतृत्वात होत असल्यामुळे आतून नकोशीच वाटत होती.कारण महावीर पतसंस्थेचे जिल्हाबँके मार्फत घेतलेले कर्जाच्या मुद्द्यावरून नाथाभाऊ त्यांना भविष्यात कधीही अडचणीत आणू शकतील हे बाबूजी चांगलेच ओळखून आहेत. उगाचच आपली गुंडी दुसऱ्याच्या हातात ते कशाला येवू देतील.परंतु सध्याची राजकीय मजबुरी लक्षात घेता त्यांनी पध्दतशीरपणे आण्णांच्या खांद्यावर बंदुक ठेवली असल्याचे स्पष्ट आहे. कारण जिल्हा बँकेची निवडणुकीसाठी लागणारी मोठी आर्थिक तरतुदीचा शब्द त्यांनी दिल्याशिवाय सतिशअण्णा स्वतंत्र पॅनल तयार करण्याची योजना आखु शकत नाही. जिल्हा बँकेत मराठा नेत्यांचे असलेले प्राबल्य लक्षात घेता सतिश आण्णांना समोर आणून बाबूजी नाथाभाऊना जातीय गणितात अडचणीत आणू पाहत आहेत. यासर्वांसाठी भाजपमधील एक गट बाबूजींना अंतर्गत ताकद  पुरवण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही.कारण जिल्हाबँक बिनविरोध झाली तर नाथाभाऊ यांची जिल्ह्यावर पर्यायी राज्यावरची पकड यामुळे घट्ट होण्यास आणखी मदत मिळेल.दुसरीकडे आव्हाणीच्या वाळु ठेक्यावरून शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील व ना.खडसे यांच्यात सुरू असलेला वादाचा फायदा घेत बाबुजी त्यांना जवळ घेवू शकतात.कारण मंत्रीपद न मिळण्यामागे नाथाभाऊ यांनीच प्रमुख आडकाठी घातली असा गुलाबराव यांचा देखील समज आहे.शिवाय शासकीय मदतीत पद्धतशीरपने त्यांचा मतदारसंघ नाथाभाऊ यांनी लांब ठेवला होता.त्यावरून आ. गुलाबराव पाटील यांनी जाहीर नाराजी देखील व्यक्त केली आहे.  तसेच अमळनेरचे आ.शिरीष चौधरी हे देखील शड्डू ठोकुन तयार आहेत.त्यांची राजकीय प्रबळ इच्छाशक्ती बघता ते निवडणुकीतून माघार घेतील असे दिसत नाही.त्यांना भाजपच्या अनिल पाटलांचा विरोध असल्यामुळे ते देखील राष्ट्रवादीच्या गोटाकडून निवडणूक लढवू शकतात.अर्थात बाबुजींच्या गटाकडून खेळला गेलेला हा ‘मास्टर स्ट्रोक’ नाथाभाऊ कशा पध्दतीने परतवून लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

    jdcc bank symbol.jpg1

    Tags: eknath khadsemla satish patilmp ishwarlal jainvijay waghmare journalistआ.सतीशअण्णा पाटीलएकनाथराव खडसेखा.ईश्वरबाबूजी जैनविजय वाघमारे पत्रकार जळगाव
    Previous Post

    जखम बेंबीला…मलम शेडीला !

    Next Post

    मोदीजी बहुत बढीया !

    Next Post
    मोदीजी बहुत बढीया !

    मोदीजी बहुत बढीया !

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    No Result
    View All Result

    Recent Posts

    • सोहराबुद्दीन चकमक : रक्तरंजित धुकं !
    • गुजरात फाईल्स : राजकारण्यांचा बेगडी बुरखा फाडणारं पुस्तक !
    • हरेन पांड्या खून प्रकरण : मोदींवर आरोप ते सुप्रीम कोर्टाचा निकाल…!
    • सोहराबुद्दीन बनावट चकमक : अनेक अनुत्तरीत प्रश्नांची मालिका !
    •  ‘अत्त दिप भवं’ ! 

    Recent Comments

    • मनोहर चौधरी on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • Harshal Talele on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • अमोल पाटील on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • Vasudeo Borole on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • पाटील चंद्रशेखर on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !

    Archives

    • November 2019
    • September 2019
    • July 2019
    • June 2019
    • May 2019
    • April 2019
    • February 2019
    • January 2019
    • December 2018
    • November 2018
    • October 2018
    • September 2018
    • August 2018
    • July 2018
    • June 2018
    • May 2018
    • April 2018
    • March 2018
    • February 2018
    • January 2018
    • December 2017
    • November 2017
    • October 2017
    • September 2017
    • April 2017
    • March 2017
    • January 2017
    • December 2016
    • October 2016
    • September 2016
    • August 2016
    • July 2016
    • June 2016
    • May 2016
    • April 2016
    • March 2016
    • February 2016
    • January 2016
    • December 2015
    • November 2015
    • October 2015
    • August 2015
    • July 2015
    • June 2015
    • May 2015
    • April 2015
    • March 2015
    • February 2015
    • January 2015

      © 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

      No Result
      View All Result

        © 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.