जिंदगी जिंदाबाद
    No Result
    View All Result
    No Result
    View All Result
    जिंदगी जिंदाबाद
    No Result
    View All Result

    अमळनेर रेड लाईट एरिया आणि वेदनांचे वास्तव !

    admin by admin
    August 22, 2018
    in Uncategorized
    19
    अमळनेर रेड लाईट एरिया आणि वेदनांचे वास्तव !

    प्रतीकात्मक

    प्रतीकात्मक

    जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा रेड लाइट एरिया अमळनेरात आहे. मागील किमान 100 वर्षापासून येथे देहविक्रीचा व्यवसाय चालतोय. येथे ८६ कुटुंबातील साधारण ५५० सदस्य राहतात. ही सर्व कुटुंब हरदासी समुदायाशी संबंधित आहेत. थोडक्यात देहविक्री म्हणजे या समुदायाचा पारंपारिक व्यवसायच आहे. सध्याच्या घडीला येथे स्थानिक व बाहेरील पकडून साधारण २०० ते ३०० सेक्स वर्कर आहेत. येथील प्रत्येक सेक्स वर्करमध्ये आपल्याला अनेक कथा मिळतील. या कथा जाणून जिंदगी इतकी निर्दयी,अपमानास्पद आणि बेईमान, असू शकते यावर आपला विश्वासच बसणार नाही. नियतीने पिचलेला हा शोषित घटक आज दोन वेळेच्या अन्नालाही मोहताज झालाय. नैतिकतेच्या नावाखाली काही जणांनी लाथाळून भूकमरीसाठी त्यांना वाऱ्यावर सोडून दिलेय.

     

    अमळनेर ‘रेड लाईट एरिया’ तील बंदीच्या वेदनांचे वास्तव अत्यंत भयानक आणि तेवढेच विचार करायला भाग पाडणारे आहे. येथे फक्त आणि फक्त राजकारणातल्या इगोसाठी कमजोरांना चिरडले जातेय. मुळात धंदा बंद करण्याआधी त्यांच्या हाताला रोजगार दिला असता तर, याच सेक्स वर्कर महिलांनी आयुष्यभरासाठी आशीर्वाद दिला असता. परंतु भीतीपोटी कोणी माणुसकी धर्माबद्दलही बोलायला तयार नाहीय.

     

    खरा खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
    जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
    तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
    जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
    तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे !

     

    साने गुरुजींची ही कविता आज फक्त पुस्तकातच जिवंत असल्याचे दिसून येतेय. वास्तवाच्या दुनियेत कुणीही कवितेचा अर्थ समजून घ्यायला तयार नाहीय. कोणत्याही रेड लाईट एरियातील सेक्स वर्करसाठी उजाडणारा प्रत्येक दिवस एक नवीन कथा जन्माला घालत असतो. तिच्याकडे येणारा प्रत्येक ग्राहक मनावर एक वेगळी जखम सोडून जातो. अमळनेरमधील सेक्स वर्करसाठी काम करणारी आधार संस्थेच्या माध्यमातून मिळालेली माहिती ऐकून तर मन सुन्न होऊन जाते. येथील प्रत्येक मुलीची हृदयपिळून कहाणी एक आहे. तुम्ही जसं-जसं त्यांची आपबिती समजून घेतात, तसं-तसं माणुसकीवरील विश्वासच उडत जातो. येथे एक मजबूर शरीर आणि प्रतीदिवसाला त्याचा उपभोग घेणारे किमान दहा जण असतात. तरी देखील स्वतःचे पोट भरेल एवढेच पैसे हातात उरतात. हृदयाने मेलेल्यांना आता शरीरानेही मारण्याची तयारी सुरु आहे. तसं बघायला गेलं तर या महिलांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठीची खऱ्या अर्थाने हीच योग्यवेळ आहे.

     

    अमळनेरातील अजंता टाॅकीजच्या मागील बाजूस असलेल्या रेड लाइट एरियात देश-विदेशातून आलेल्या अनेक महिला आणि मुलींचा समावेश होता. त्यात खास करून बांग्लादेश,नेपाल आणि राजस्थान,बिहार, उत्तर प्रदेशसह अनेक छोट्या-मोठ्या राज्यातील बहुतांश मुली होत्या. नौकरी किंवा प्रेमाच्या बहाण्याने या मुली या धंद्यात कुठे तरी अडकवलेल्या होत्या. तर उर्वरित बहुसंख्य मुली आपल्या कौटुंबिक जबाबदारीमुळे या धंद्यात यायला मजबूर झालेल्या. असो…प्रत्येक रेड लाईट एरियात कमी अधिक प्रमाणात या कहाण्या सारख्याच असतात. त्याचे कुणालाही फारसे सोयरेसुतक नसते.

     

    सध्या अमळनेर रेड लाइट एरिया एका नवीन कारणामुळे चर्चेत आलाय. एका स्थानिक असलेल्या कथित राजकारणी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत निवडणुकीच्या काळात वाद झाल्यामुळे सध्या ‘रेड लाइट एरिया’ हटाव मोहिमेला लोकचळवळीचे नाव दिले जातेय. अर्थात याला नैतिक आणि अनैतिकतेची जोड दिल्यामुळे समाजासमोर फक्त एकच बाजू मांडली जातेय. परंतु प्रत्येक गोष्टीच्या नाण्यांला दोन बाजू असतात. मुळात नैतिकतेच्या गप्पा हाकणाऱ्यांनी इतक्या वर्षात आपली नैतिकता कुठे गहाण ठेवली होती? हा खरा प्रश्न आहे. देहविक्रीच्या व्यवसायाची पाठराखण कुणीही करणार नाही. परंतु शोषित महिलांवर दबंगगिरी करून आपली राजकीय ताकद सिद्ध करू इच्छिणाऱ्यांविरुद्ध प्रत्येक सुज्ञ नागरिक आक्षेप नोंदविलाच पाहिजे.

     

    अजंता टाॅकीजच्या मागील बाजूस असलेल्या रेड लाइट एरियात एका सेवा निवृत्त महसूल कर्मचारीच्या मालकीच्या अनेक खोल्या याठिकाणी आहेत. एका खोलीत साधारण ५ ते ६ महिला राहतात. असो…मूळ मुद्द्यावर येतोय, पालिका निवडणुकीच्या काळात होणाऱ्या किरकोळ वादावादीला आता इगो पाॅईंट केला जातोय. “सब कुछ करना था, लेकीन जयकांत शिक्रे का इगो हर्ट नही करने का था ! ” सिंघम चित्रपटातील या संवादातच अमळनेर रेड लाईट एरियाचे सर्व गुपित दडलेले आहे. या भागात निवडणुकीच्या (निवडणूक कोणती? हे मुद्दाम सांगत नाहीय ) काळात सेक्स वर्कर असलेल्या काही महिलांनी मुलभूत गरजा आणि नागरी असुविधांचा पाढा वाचला. आपल्या जीवावर धंदा करतात आणि वरतून आपल्यालाच जाब विचारायची हिम्मत करतात. या एका विषयाने निवडणुकीनंतर इर्षेचे रूप घेतले आणि रेड लाईट एरीयाचे बुरे दीन सुरु झालेत.

     

    बोरी नदी काठील अतिक्रम काढण्याच्या नावाखाली या महिलांना बेघर करण्याचा डाव आखला गेला. मुळात शहरात शेकडो अतिक्रमित घरं आणि वास्तू असतांना फक्त विशिष्ठ २५-३० घरं पाडण्याचा अट्टहास धरला गेला. परंतु आधार संस्थेच्या भारती पाटील मॅडमने जिल्हाधिकाऱ्यांकडून स्टे मिळविला. परंतु खानदानी दुष्मनी असल्यागत जिद्दीवर पेटलेल्यांनी एका रात्रीतून घरं पाडली,जाळली आणि आपली कॉलर अखेर टाईट करून घेतली. वास्तविक काही कथित नेत्याशी संबंधित कार्यकर्त्यांनीच या महिलांकडून घरं भाडे कित्येक दिवसापासून वसूल करीत होती. ही बाब मात्र, सोयीस्कररित्या दुर्लक्षित करण्यात आली. असो…वरवर यामागे ‘इगो पाॅईंट’ दिसत असला तरी, आणखी काही इतर कारणे देखील आहेत.

     

    रेड लाईट एरियाचे दादा म्हणणाऱ्यांनी जणू तेथे येणाऱ्या प्रत्येक पोरीला फुकट भोगण्याचे लायसन्स काढलेले होते. मनाला पटली तिला…पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तितके दिवस उचलून न्यायचे आणि आपली लैंगिक विकृती भागवायची. त्यातून पोलिसात काही महिन्यापूर्वी लिखापढी देखील झाली होती. आपल्या जीवावर धंदा करणाऱ्या रांडांनी आपल्याला पोलीस चौकी आणले, यावरून देखील काहींची तळपायाची नस मस्तकात गेली होती. त्यामुळे त्यांना धडा शिकविण्यासाठी आता नैतिकतेचे डोस पाजत या वेश्या गावातच नको, असा नारा दिला जातोय.

     

    परंतु या वैश्यांना व्याजाचे पैसे कोणाची माणसे देत होती? एखादं पैसे परत न करता पळून गेली तर तिचा मनमाड, मुंबईपर्यंत पिच्छा कोण पुरवत होते. व्याज आणि मुद्दल पूर्ण परत न करेपर्यंत तिला अमळनेर का सोडू दिले जात नव्हते? दबंगगिरी करणाऱ्या संबंधित लोकांना माहित आहे की, शेवटी या धंद्यावाल्या बाया आहेत. यांच्या बाजूने कोण बोलणार? कुणी बोललेच तर त्याच्यावर अनैतिक किंवा आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप करून त्यालाही गप्प बसवू. असो…बारा भानगडी पिसण्यात काही अर्थ नाही. मुळात धंदा बंद केलाय आता त्यांच्या हाताला रोजगार देखील देण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे.

     

    मुळात येथील सेक्स वर्कर आता वेळेसोबत चालायचा प्रयत्न करू लागल्या होत्या. देहविक्रीच्या व्यवसायाची परंपरा हळूहळू त्यांच्या परिवारांमधून खंडित व्हायला सुरुवात झाली होती. आधार नामक संस्था या ठिकाणी यासंदर्भात खुप चांगले काम करतेय. भारती पाटील आणि त्यांच्या सहकारी महिलांचे काम प्रभावित करणारे आहे. परंतु स्वतःला राजकीय,सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घ्यायचं आणि वरतून या महिलांकडून दरमहा हप्त्याची अपेक्षा ठेवायची, अशी मंडळी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. देहविक्री करणाऱ्या महिला किंवा घरमालकीणने पैसे देण्यास आनाकानी केल्यास लगेच विविध ठिकाणी तक्रारी अर्ज करायचे. मागील काही महिन्यांपूर्वी अशाच तक्रारी अर्जांवरून पोलिसांनी एके रात्री तेथे रेड टाकली आणि अनेकांना ताब्यात घेतले.

     

    विशेष म्हणजे येथील महिला आपल्या सुनेला कधीही या व्यवसायात टाकत नाही. हा अलिखित नियम शेकडो वर्षापासून हा समुदाय प्रामाणिकपणे पाळतोय. परंतु त्या रात्री घरातील सुनांना देखील पोलीस स्थानकात नेण्यात आले. दुसरीकडे आता या समुदायात शिक्षणाचे महत्व आताकुठे वाढायला लागले आहे. परंतु त्या रात्री माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींना देखील रात्रभर पोलीस स्थानकात बसवून ठेवण्यात आले. टोकाच्या हालअपेष्टा सहन करून मुलींना या व्यवसायापासून लांब ठेवण्याचे स्वप्न यामुळे एका रात्रीतून संपले. कारण त्यांच्या बालमनावर काय परिणाम झाले असतील, हे वेगळे सांगायला नको.

     

    महागाईच्या या काळात ५० रुपयाची फार काही किंमत नाही राहिलेली. परंतु तुम्हाला वाचून धक्काबसेल की, येथील सेक्स वर्कर आजच्या तारखेत अवघ्या ५० रुपयात देखील आपले शरीर विकायला तयार आहेत. या पैशातून पोटाच्या पोरांना दोन वेळेचे पोटभर जेवण देखील देता येत नाहीय. गावाबाहेर पुलाखाली झाडाझुडपांमध्ये त्या सध्या आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी दररोज संघर्ष करताय. मोटार सायकलवर कुणीही यायला लागला तर त्यांच्या आशा पल्लवित होतात. या ग्राहकाने ठीकठाक पैसे दिले, तर किमान आज तरी पोटभर खायला भेटेल. पण तो सरळ निघून गेल्यावर मात्र, एकमेकींकडे बघून डोळ्यातील पाणी पुसण्याशिवाय त्यांच्या हातात काहीही उरत नाही. पन्नासच देईन, शंभरच देईन असं म्हणून येणारा प्रत्येक जण सध्या त्यांना नडून बघतोय. पण परिस्थितीच बिकट असल्यावर करणार तरी काय? आपले नाही किमान पोरांचे तरी पोट भरेल म्हणून त्या पन्नास रुपयात देखील तयार होताय.

     

    बोरी नदीच्या पुलाखालील साप-विंचू सारखे विषारी प्राणी त्यांच्या हाता-पायाला दररोज खेटून जाताय. पण मृत्यू काय माहित त्यांना कशासाठी आणि कुणासाठी चकवा देतोय. अरे यमा एकदा सोबत घेऊन जा सोबत ह्यांना…या नरकातून कायमची सुटका तरी कर बिचारींची. मानवी शरीराचे एवढे हाल कशासाठी? सुधारायचे म्हटले तरी, कथित समाजसेवक सबंधित लोकांकडे जाऊन तुम्ही अशा चारित्र्यहीन बाईला कामावर का ठेवताय म्हणून डोस दिले जाताय. ‘आम्ही माफी मागतो, मायबाप काही चुकलो असू तर पाठीवर मारा,पोटावर मारू नका’, अशा विनवण्या केल्यानंतरही ‘तुम्ही लय पैसा कमावलाय, आता घरीबसून त्याच्यावरच पोट भरा’ असं सांगून हाकलून लावले जातेय. एकंदरीत ना जगू देताय ना मरू देताय. त्यामुळे आता या महिलांनी करायचे तरी काय? याचे उत्तर कुणी तरी शोधून त्यांना द्यावेच लागणार आहे.

     

    एक सत्य कहाणी सांगतो…आई-वडिलांच्या विरोधात जात लग्न करणारी काजल मोठ्या आशेने सुखी संसाराची स्वप्ने रंगवीत होती. परंतु तिच्यावर जीव देणारा प्रियकर हा पती होताच षंड पुरुषात रुपांतरीत झाला. तिच्या ताटात दोन वेळेचे अन्न देखील टाकण्याची देखील त्यात ताकद नसेल, असे काजलने स्वप्नात देखील विचार केला नव्हता. अखेर एकेदिवशी त्याने काजलला टाकून दिले. अशा कठीण परिस्थितीत तिला कुणीच आधार दिला नाही. अगदी जन्म देणाऱ्यांनी देखील तोंड फिरवून घेत ‘भोग कर्माचे फळ’ म्हणून हाकलून लावले. पोटाची आग भल्याभल्या मर्दाना झुकायला मजबूर करते. काजल तर अवघ्या २० वर्षाची कोवळी पोरगी होती. सुशिक्षित परिवार तथा नौकरदार बापाची पोरगी असतांना देखील काजलला शेवटी इच्छा नसूनही देहविक्रीच्या धंद्याच्या चिखलात उतरावे लागले.या एका निर्णयाने तिच्या संपूर्ण आयुष्याची राखरांगोळी झालीय. आता तर उतार वयात कसं होईल? याची चिंता दिला दररोज हळूहळू मरतेय.

     

    दुसरीकडे कंपनीत नौकरी करते सांगून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणाऱ्या किती तरी मुली देखील या ठिकाणी आहेत. कुणाचे वडील तर कुणाची आई असाध्य आजाराने ग्रस्त तर अनेकींवर लहान भाऊ किंवा बहिणीचे शिक्षण, लग्नाची जबाबदारी आहे. प्रत्येक जण कुठल्या अन् कुठल्या ओझ्याखाली असल्यामुळेच या नरकात राहण्यास मजबूर असतात. परंतु त्यांच्या दु:खाशी कुणाला काय देणे-घेणे? अशा बायांचे शरीर फक्त पुरुषी मस्ती जिरवण्यासाठीच असतात, अशी नीच मानसिकता असणाऱ्यांची संख्या या जगात कमी नाहीय.

     

    समजा एखाद मुलीने एक ग्राहक केला तर तिला ५०० रुपये मिळतील. परंतु या ५०० रुपयात निम्मे अर्थात २५० रुपये घरमालकीणला द्यावे लागतात. आपले शरीर विकून तिच्याकडे उरले अवघे २५० रुपये. या २५० रुपयात तिला जेवणापासून तर मेकअप,कपड्यांपर्यंतचा आपला सर्व भागवायचा आहे. ग्राहकाला खुश करून मिळणारी वरकमाई देखील मालकीणबाईच्या नजरेतून सुटत नाही. त्यामुळे दिवसाला दहा ग्राहक केले तरी खर्च वजा सात-आठशेपेक्षा अधिक कमाई नाहीच. त्यात ती काय ठेवणार आणि घरी काय पाठवणार? हा एक मोठा प्रश्न असतोच. आता तर सर्वच मार्ग बंद झालेय, इच्छा मरणाशिवाय यांच्या हाती काहीही नाहीय.

     

    कुठलीही रेड लाईट एरियाची वस्ती आख्खी रात्र चेहरा रंगवून जागते उभी असते. लाल-लाल ओठांसारखी रंगणारी रात्र येथे येणाऱ्या प्रत्येकाला इंद्रियांना चेतवानारीच वाटते. रात्र न् दिवस फक्त देहाची लचके तोडणारी कुत्री येथे भटकत असतात. मेलेले अंतरमन, श्वास घेणारा देह या पलीकडे मानवी जीवनाचे सत्य या ठिकाणी दुसरे काहीही नसते. तुम्हाला इथल्या धुंदीत…नशेत जगावं लागतं,नाही तरी शुद्धीत इथं जगणं जरा अवघडच असते. असो… जसं कीर्तनाने समाज सुधारत नाही,तसचं चित्रपटांनी देखील समाज बिघडत नाही,हे साधं सूत्र कसं समजावयाचे कथित समाजसेवकांना. ‘रेड लाईट एरिया’च्या चमक-धमकवर जाऊ नका. पृथ्वी तलावराचा नर्क म्हटले तरी कमी होईल,अशी शारीरिक पिडा आणि टोकाचे बत्तर जीवन सेक्स वर्कर याठिकाणी जगत असतात. रेड लाईट एरियाच्या नरकातून निघाल्यानंतरही त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न कायम आहे.

    Tags: jalgaonvijay waghmare journalistअमळनेर रेड लाईट एरियाविजय वाघमारे पत्रकार जळगाव
    Previous Post

    अंतरंगातल्या प्रवासाची अवस्थता !

    Next Post

    देशविघातक कृत्यात जळगावच्या तरुणांचा समावेश चिंताजनक

    Next Post
    देशविघातक कृत्यात जळगावच्या तरुणांचा समावेश चिंताजनक

    देशविघातक कृत्यात जळगावच्या तरुणांचा समावेश चिंताजनक

    Comments 19

    1. vilas says:
      7 years ago

      सरजी
      काय कमेंट करु….
      निशब्द झालो..

      हे सगळ लिहायला डेरींग लागते..
      आपल व भारती पाटील मँडमांच मनापासुन कौतुक करावस वाटत.
      ग्रेट..

      Reply
    2. VIJAYKUMAR SHUKLA says:
      7 years ago

      CONGRATULATIONS TO BHARTI PATIL MADAM,AADHAR,VIJAY WAGHMARE & ALL. 3 HATS & GREAT SALUTE TO ALL YOU.BEST OF LUCK…GOD BLESS YOU ALWAYS…..GOOD DAY…

      Reply
    3. Dr ..narendra thakur .. says:
      7 years ago

      भीषण वास्तव मांडले आपण…खुप धाडस लागते अश्या विषयावर लिहायला व बोलायला……….
      सिमीबद्दलचा ब्लोग पण भेदक होता ……..

      Reply
    4. Gajanan says:
      7 years ago

      वाघमारेजी आपले अभिनंदन. अमळनेरच्या खूप मोठ्या विषयाला हात घातला. अभ्यासपूर्ण मांडणी करून आपल्या धाडसाला सलाम…!

      Reply
    5. Sadanand, S,Patil says:
      7 years ago

      यथार्थ आणि मन सुन्न करणारे वास्तव लिखाण
      आपल्याला आणि भारतीजीनां सलाम.
      हे सर्व लिहण्यासाठी दम लागतो आणि तो तुमच्यात निश्चितच आहे ,हे तुमच्या लिखाणातून स्पष्टच होते .पण सांभाळून कारण या तथाकथित नामरद गुंडाचा काही भरवसा नसतो .

      Reply
    6. SHAIKH MUSTAQUEEM says:
      7 years ago

      Best job sir
      God bless you

      Reply
    7. उमाकांत पाटील says:
      7 years ago

      खरंच… मन सुन्न करणारी ही सत्य घटना आहे. भारत स्वतंत्र झाला आपण म्हणतो आणि आपल्याच भोवताली प्राण्यांपेक्षाही क्रूर कृत्य अशा वेदनादायी घटना घडत आहेत. विजुभाऊ आपण याला फोडलेली वाचा म्हणजे खरे लेखणीचे शिलेदार..!!! आपले अभिनंदन..

      Reply
    8. बी.आर.महाजन says:
      7 years ago

      नमस्कार भैय्या
      आपला लेख वाचला.. अंगावर शहारे येतात
      तुमचा लेख म्हणजे आजच्या पाखंडी समाजासाठी झणझणीत अंजन आहे. भारती पाटील मडम यांचे अभिनंदन तर आपण संवेदनशील विषयावर लिहायचं धाडसं केले.आपलेही मनापासून अभिनंदन……

      Reply
    9. raju dikshit says:
      7 years ago

      nirdhid patkarila salam

      Reply
    10. आशिष पाटील says:
      7 years ago

      साहेब शब्द देखील उरले नाहीत हो कमेंट करायला
      पण एवढं मात्र नक्की आपली ही ब्लॉक मी जास्तीत जास्त शेअर करेल

      Reply
    11. Vitthal Jondhale says:
      7 years ago

      निशब्द

      Reply
    12. Bindiya Nandedkar says:
      7 years ago

      Speechless …..

      Reply
    13. Mahendra patil says:
      7 years ago

      It’s too horrible and feeling very sad for these workers. If i got the chance surely I will try my best to help them.

      Reply
    14. pankaj patil says:
      7 years ago

      Lahan paanapasun amlner taalukyat aani parisraatil gaavaant firlo pan ek shbd dokyat kaaym firt raahycha to mhanje “Amalnercha Red light Aria ” aaj tyatil bhishan saty baaher aale .Bharti Tai sarkhya samaj sevakanchya kaamala maanacha mujara v aaple lekhan agdi vastav vaadi asun eka chitrapatachya peksha kami naahi .

      Reply
    15. Dr Nilesh says:
      7 years ago

      …..!

      Reply
    16. Alkesh Waghare says:
      7 years ago

      We sincerely congratulate you on all such problems that you are also working for women’s health in a better way.

      Reply
    17. Prashant Patil says:
      7 years ago

      Me block plesment la Astana tya bhagat kam kelay me va maza clasmet ase amhi dogh va sanstheche lok hya lekhat je mandlay Te amhi tya mahinyabharat agdi javalun pahilay ka kunas thauk pn kalij pilvandlay ki samajat kahi ghatak kharach kup vait paristithitun jat ahe an tyana pravahat ananya Sathi naitik vicharanchya mansanchi Farah ahe an sane gurujinchya karmbhumit Te haravliy ka ?
      An ase rajkarni ch Kay pn konalahi thara dyayla nako Jay Hind

      Reply
    18. Bhujang Bobade says:
      7 years ago

      Aaplya karyala Manhpurvak Salam Vijayji

      Reply
    19. भावना महाजन says:
      7 years ago

      Hats of sir ase wachle ki angawar kata yeto paristhiti khup bekar aste ti mansala kahihi karayla lavte. bharti patil mam and waghmare sir tumche karya kharokhar kautukaspad ahe.

      Reply

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    No Result
    View All Result

    Recent Posts

    • सोहराबुद्दीन चकमक : रक्तरंजित धुकं !
    • गुजरात फाईल्स : राजकारण्यांचा बेगडी बुरखा फाडणारं पुस्तक !
    • हरेन पांड्या खून प्रकरण : मोदींवर आरोप ते सुप्रीम कोर्टाचा निकाल…!
    • सोहराबुद्दीन बनावट चकमक : अनेक अनुत्तरीत प्रश्नांची मालिका !
    •  ‘अत्त दिप भवं’ ! 

    Recent Comments

    • मनोहर चौधरी on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • Harshal Talele on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • अमोल पाटील on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • Vasudeo Borole on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !
    • पाटील चंद्रशेखर on खडसेंविरूध्दच्या षडयंत्राचे ढीगभर पुरावे !

    Archives

    • November 2019
    • September 2019
    • July 2019
    • June 2019
    • May 2019
    • April 2019
    • February 2019
    • January 2019
    • December 2018
    • November 2018
    • October 2018
    • September 2018
    • August 2018
    • July 2018
    • June 2018
    • May 2018
    • April 2018
    • March 2018
    • February 2018
    • January 2018
    • December 2017
    • November 2017
    • October 2017
    • September 2017
    • April 2017
    • March 2017
    • January 2017
    • December 2016
    • October 2016
    • September 2016
    • August 2016
    • July 2016
    • June 2016
    • May 2016
    • April 2016
    • March 2016
    • February 2016
    • January 2016
    • December 2015
    • November 2015
    • October 2015
    • August 2015
    • July 2015
    • June 2015
    • May 2015
    • April 2015
    • March 2015
    • February 2015
    • January 2015

      © 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

      No Result
      View All Result

        © 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.